मिशन किरीस्तान !
मिशन किरीस्तान ! (भाग १)
आठ राज्यात हिंदूंना अल्पसंख्य घोषीत करण्याच्या बातम्या नुकत्याच चर्चेत आल्या आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या जुन महिन्यात होणा-या बैठकीत याचा विचार होणार आहे. मणिपुर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, पंजाब व जम्मुकाश्मिर हीच ती आठ राज्ये आहेत. जिथे कधीकाळी बहुसंख्यक असणारा हिंदू आज अल्पसंख्यक झाला आहे. ही तर धोक्याची घंटा आहे! पण ती कुणाकुणास ऐकु येते, कोण कोण त्याने सतर्क होतो व कोण कोण दुर्लक्ष करुन कानात बोळे घालतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मांजरीने डोळे मिटून दूध प्यायचे ठरविले, तरी तिच्यावर चालुन येणारे संकट काही टळत नसते हे प्रथम हिंदूंनी ध्यानी घ्यावे. पंजाब व मणिपुरमध्ये अनुक्रमे ३८% व ३१% इतक्या संख्येने हिंदू आहेत. तसा इतर आठ राज्यांच्या तुलनेने हा आकडा सर्वाधिक. बाकी राज्यात यापेक्षा दयनीय अवस्था आहे. लक्षद्वीपमध्ये २.५ टक्के, मिझोरममध्ये २.७५ टक्के तर नागालँडमध्ये ८.७५ टक्के इतकेच हिंदू शिल्लक राहिले आहेत. ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेतील असल्यामुळे आज तब्बल आठ वर्षानंतर ती किती कमी झाली असावी, हा विचारच भयानक वाटतो. तेव्हा आता प्रश्न पडतो की काही वर्षांपुर्वी या राज्यात हिंदू बहुसंख्येने असताना आज अचानक त्यांची संख्या कमी कशी काय झाली? हिंदू लोकांचे स्थलांतर झाले की धर्मांतरण?
ख्रिश्चन पाद-यांच्या व मिशन-यांच्या सुमडीत काम करण्याचा प्रताप आता तरी सुज्ञ हिंदूंनी समजुन घ्यायलाच पाहिजे. आदीवासी व डोंगराळ भागातील जनतेला कधी गोड बोलुन तर कधी फसवुन , कधी बळाने तर कधी कपटाने ख्रिश्चन केले जात आहे. अशिक्षीत आदीवासी समाज याला बळी पडत आहे. संमोहन शास्त्राचा वापर करुन कितीतरी हिंदू स्त्रियांना व पुरुषांना ख्रिश्चन केले जात असल्याने अनेक व्हिडीओ समोर येत आहे.
हिंदू संस्कृतीच्या चुका शोधुन कर्मकांड, यज्ञयाग किंवा जादूटोणासारख्या गोष्टीवर पुरोगामी संघटना व कार्यकर्ते तुटून पडतात व हिंदूंना झोडण्यास मिळाल्याचा आनंद व्यक्त करतात, त्याप्रमाणे हीच तथाकथीत पुरोगामी मंडळी या बाटवीकरण करणा-या मिशन-यांपर्यंत कधीच का पोहचत नाही? ख्रिश्चन मिशन-यांच्या अमानवी वर्तणुकीचा का विरोध करत नाही? हा सुद्धा चिंतनाचा मुद्दा आहे. कारण ही पुरोगामी(?) मंडळी हिंदूंचे प्रत्यक्ष धर्मांतरण करत नसले, तरी हिंदूंचा हिंदू धर्मावरुन विश्वास उडवुन हिंदूंना स्वधर्मापासुन परावृत्त करण्याचा व त्यांना अन्य धर्मात विलीन करण्याचा पहिला टप्पा सहज पुर्ण करुन देत असतात. स्वधर्मापासुन परावृत्त झालेली हीच मंडळी पुढे ख्रिश्चन व मुसलमानी बाटवीकरणास बळी पडतात ही वस्तुस्थिती आहे.
![]() |
ख्रिश्चन मिशनरी गरीब हिंदुना बलाने धर्मांतरित करताना (केरळ) |
ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मणिपुर, मिझोराम, नागालँड व त्रिपुरा या राज्यात डाव्या (वामपंथी/निधर्मी) चळवळी व कम्युनिस्ट पक्षांचे प्राबल्य अधिक आहे. कम्युनिस्ट अथवा वामपंथी तसे कुठलाही धर्म मानत नाहीत. परंतु भारतातील वामपंथी किंवा कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते 'निष्ठावान मुस्लीम' आणि 'निष्ठावान ख्रिश्चन' दिसुन येतात. अर्थात या मंडळींना अॅलर्जी ती केवळ हिंदू धर्माचीच, असेच मग म्हणावे लागते. कारण कम्युनिस्ट झाले म्हणजे तुम्ही नास्तिक गणले जातात. नास्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणे. पण 'ईश्वर' म्हणजे केवळ 'हिंदूंचे देव' असाच काहीसा अर्थ कम्युनिस्ट गँगमध्ये प्रचलित असावा. त्याशिवाय काय त्यांना नमाज अदा करणारे मुसलमान (आस्तिक) व येशुसमोर प्रार्थना करणारे ख्रिश्चन (आस्तिक) चालतात? म्हणुनच कम्युनिस्टांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारा नक्षलवाद या हिंदू बाटवीकरणाच्या कामात ख्रिश्चन मिशन-यांची चांगलीच मदत करत असावा, असे आपण म्हणू शकतो.
आज जे बाटवीकरणाचे सत्र ख्रिश्चन मिशन-यांकडून चालू आहे, ते काही आजच सुरु झालेले नाही. त्यामागे एक इतिहास आहे. ख्रिश्चन भारतात येण्याआधी भारतात अनेक विचार प्रवाह येऊन गेले होते. मग ते राजकीय असो किंवा धार्मिक असो [धर्मप्रसारकांच्या माध्यमातुन] असो. पण त्यांना भारतात जम बसविणे शक्य झाले नाही. भारतावर जी शक, कुशाण व हुणादिक आक्रमणे झाली ती कालांतराने भारतमय होऊन गेली. त्यांनी भारतीय संस्कृती स्विकारली व स्वत:ची ओळख विसरुन त्यापैकी कुणी वैदिक हिंदू झाले, तर कुणी बौध्द. ख्रिश्चन मिशन-यांनी याचा अभ्यास केला. भारताच्या इतिहासाचे अवलोकन करुन त्यांनी 'भारतीयांचे धर्मांतर झाल्याखेरीज राष्ट्रांतर होणार नाही' ही खूणगाठच बांधून घेतली. भारतावर राज्य करायचे असेल तर येथिल बहुसंख्य समाज हा आपली संस्कृती मानणारा झाला पाहिजे, त्या शिवाय आपला स्विकार होणार नाही व आपणांस भारतावर राज्य करता येणार नाही, हे धूर्त मिशनरी ओळखून चुकले होते. म्हणुनच त्यांनी भारतीयांचे धर्मांतर करण्यास आरंभ केला. हिंदुस्तानच्या उदरात किरीस्तान नावाचे संकट जन्म घेऊ लागले. हे काही साधे सोपे काम नव्हतेच. कित्येक पिढ्या हे कार्य करताना खपणार हेही त्यांना ठाऊक होते. त्यातच भारत स्वतंत्र झाला व ख्रिश्चन धर्मीय ब्रिटिश व पोर्तुगीजांना भारतातुन निघुन जावे लागले. धर्मांतराशिवाय राष्ट्रांतर अशक्य आहे हे पुन्हा एकदा खरे ठरले आणि राष्ट्रीय व धार्मीक पराजयाने आक्रोशीत झालेले धर्मांध मिशनरी बोके भारतीयांची ओळख संपवण्यासाठी अधिक त्वेषाने तुटून पडले.
ख्रिश्चन मिशन-यांची धर्मांतराची नीति समजुन घेण्यासाठी इतिहासावर जरा प्रकाश टाकणे आवश्यक आहे. कारण मिशनरी आज ज्याप्रकारे हिंदूंचे धर्मांतरण घडवुन आणत आहे त्याला एक इतिहास आहे. हिंदूंमधील काही कुप्रथा, खुळ्या समजुती व अज्ञान कश्या प्रकारे मिशन-यांना सहाय्यक ठरतात, हे समजणे आवश्यक आहे. ख्रिश्चन मिशनरी कश्या प्रकारे भूलथापा देऊन हिंदूंना बाटवतात हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या 'भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने' या ग्रंथात सविस्तर मांडले आहे. ज्यु लोकांच्या छळाला कंटाळुन जेव्हा ख्रिश्चन लोक भारतात येऊ लागले, तेव्हा झामोरीन राजाच्या राजाश्रयाखाली दक्षिण भारतात त्यांचे वास्तव्य झाले होते. कालांतराने त्यांच्या लक्षात आले की येथिल लोक विविध खुळचट समजुतीत अडकलेले आहेत. आपले उष्टे पाणी पाजा किंवा अन्न खायला द्या, की येथिल हे हिंदू लोक स्वत:ला धर्म बहिष्कृत झाल्याचे समजतात. परधर्मीयांच्या अन्नाला जरी शिवले तरी या लोकांना बहिष्कृत केले जाते.
हिंदू धर्मातून ख्रिश्चन मिशन-यांना बाटवीकरणासाठी चांगलेच सोपस्कर हत्यार मिळाले. साधा ब्रेडचा तुकडा जरी हिंदूने खाल्ला तरी तो बाटू लागला. ज्या नदीपात्रात हिंदू नियमित स्नान करत तिथे ख्रिश्चन लोकांनी जाऊन स्नान करावे आणि तुम्ही हिंदूंनी आमच्या सोबत एकाच पात्रात स्नान केले. आता तुम्ही बाटलात. तुम्ही हिंदू नसुन ख्रिश्चन झालात. असा गाजावाजा करावा की अन्य हिंदूंनी त्या लोकांना वाळीत टाकलेच समजा. आपल्याच बंधूंना पुन: हिंदू धर्मात येण्याची कवाडे त्यांच्यासाठी कायमची बंद होत असे. अश्या प्रकारे हिंदूंचे आपल्या बोटचेप्या तत्वांमुळे, खुळ्या समजुतींमुळे प्रचंड नुकसान होत गेले. आजही अनेक आदीवासी भागात, ईशान्य भारतातील डोंगराळ भागात, केरळ राज्यात, महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या जिल्ह्यात अश्याच प्रकारे अशिक्षीत हिंदू बाटवले जातात व सुशिक्षीत म्हणवणारे हिंदू बघ्याच्या भूमिकेत राहतात हे हिंदूंचे दुर्दैव.
![]() |
दुष्काळात पोर्तुगीजांकडे याचना करणारा समाज व पोर्तुगीजांकडून केला जाणारा छळ |
धार्मिक आक्रमणात ख्रिश्चनांचे तथाकथीत संत व मठाधिपती अतिउन्मादाने त्यांच्या मिशन-यांचे नेतृत्व करीत होते. गरीब हिंदूंना आर्थिक मदत(?) करुन, आजारी हिंदूंची शुश्रूषा करुन(?), शेतक-यांना पैसा पुरवुन व हिंदू धर्मातून बहिष्कृत केलेल्यांना किंवा हीन समजल्या गेलेल्या लोकांना चतुराईने ख्रिश्चन मिशन-यांनी येशुभक्त करुन सोडले. 'सेंट झेविअर' नामक ख्रिश्चनांचा तत्कालीन भारतातील (इ.स.१५४०) आद्य मठपती होता. त्याच्या नेतृत्वाखाली सहस्त्रावधी हिंदूंचे ख्रिश्चनीकरण केले गेले. कधी कपट करुन तर कधी छळ करुन त्याने हिंदूंचे ख्रिश्चनीकरण करण्याचा सपाटाच लावला होता. गोमंतकात (गोवा) तेव्हा सत्ता पोर्तुगीजांनी हस्तगत केली होती. पोर्तुगीजांचे अधिकारी मिशन-यांना धर्मांतरणासाठी मदत करीत नाही, म्हणुन झेविअरने तत्कालीन पोर्तुगालच्या सम्राटास पत्र लिहिले होते. त्यात तो साफ उल्लेख करतो की,"इथे आम्ही किरिस्तानचे (ख्रिश्चन) पुण्यकार्य करीत आहोत. दररोज शेकडो लोक ख्रिश्चन बनविले जात आहेत. आम्हाला पाहुन इथले हिंदू भीतीने पळत सुटतात. परंतु इथले ब्राम्हण आमच्या कार्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बाटवलेल्यांना मागच्या दाराने मांडवी नदीत न्हाऊ घालुन, काही मंत्र आपल्या मागे म्हणायला लावुन पुन्हा शुद्ध करुन घेताहेत. त्यात आपले पोर्तुगीज आम्हाला इच्छेनुरुप मदत करीत नाहीतच शिवाय आम्ही सांगु ती शिक्षा इथल्या ब्राम्हणांना करीत नाही. एकदा का या ब्राम्हणांना धडा शिकवला की ते आमच्या कार्यात विघ्न आणणार नाहीत. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. आपली मदत झाल्यास व ब्राम्हणांचा तेवढा बंदोबस्त झाल्यास भारतास ख्रिश्चनांचा प्रदेश करण्यास वेळ लागायचा नाही."
यावर पोर्तुगीज बादशहाने आपल्या अधिका-यांना मिशन-यांच्या कार्यात जराही लवलेश येता कामा नये, अन्यथा तुमच्या संपत्ती हस्तगत केल्या जाईल असे आदेश सोडले. म्हणुनच की काय गोमंतकातील (आजचे गोवा) सहस्त्रावधी ब्राम्हणांचे शिरकाण केले गेले. गरीब हिंदूंप्रमाणे व्यापारी, श्रीमंत हिंदूंची प्रचंड लांडगेतोड झाली. हिंदू स्त्रियांवर नको ते अनन्वित अत्याचार झाले. येथिल हिंदू आता आम्हाला पाहताच घरदार सोडून पळत सुटतात. आमची दहशत बसली आहे. असे झेविअर आपल्या दुस-या पत्रातुन पोर्तुगीज बादशहास कळवितो.
![]() |
धर्म बदलण्यास नकार दिल्यामुळे अमानवी छळ करताना मिशनरी |
[जिज्ञासुंनी अधिक माहितीसाठी 'Cs Hindus De Goa Republica Portuguesa' नामक पोर्तुगीज ग्रंथ वाचावा. धर्मांतरण करविणा-या मुसलमानांसही लाजवेल असा बाटवा-बाटवीचा खेळ मिशन-यांनी चालविला असल्याचे त्यात उल्लेख सापडतात. विशेष म्हणजे हा ग्रंथ Dr. Patonio Noronhua यांनी लिहिला आहे, जे की पोर्तुगीज सरकारच्या 'सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश' राहुन गेले आहेत. तसेच बाटवुन ख्रिश्चन झालेल्या दहा हजार हिंदूंना पुन: शुद्ध करुन स्वधर्मात घेणा-या श्री. मसुरकर महाराजांच्या निरीक्षणाखाली लिहिलेला 'गोमंतकातील शुद्धीकरणाचा इतिहास' हा ग्रंथ अभ्यासावा. -संदर्भ: सहा सोनेरी पाने; लेखक- स्वा. वि.दा. सावरकर]
झेविअर प्रभुतींमुळे ज्या देशातील हिंदू ख्रिश्चनांच्या कुटील डावास बळी पडला, ज्या झेविअरमुळे असंख्य हिंदू बाटवले गेले, सहस्त्रावधी गोर गरीब हिंदू मारले गेले, ब्राम्हणांच्या कत्तली झाल्या त्याच झेविअरच्या नावे आज भारतात मोठमोठ्या शाळा चालतात. प्रचंड दुष्काळ असताना भाकरीचा तुकडा दाखवुन ज्यांनी कुटूंबची कुटूंब धर्मांतरीत केली, त्या लोकांचे आज देशात पोवाडे गायले जातात. नव्हे नव्हे तर हिंदू त्यास मोठे संत मानतात. जणु काही त्याने येथिल जनतेची तना-मनाने सेवा सुश्रुषा केली. याऊलट ज्या लोकांनी या देशाची संस्कृती परंपरा जपण्यासाठी कार्य केले, समाज एकसंध ठेवला, वाईट रुढी परंपरा नष्ट केल्या त्या महान हिंदू साधू संतांचा जयजयकार करणे आजच्या सुशिक्षित म्हणविना-या भारतीयांना मागास व बुरसटलेला विचार वाटतो. किती हा विरोधाभास? यावरुन आठ राज्यात हिंदू अल्पसंख्यांक का होतो, याचे विदीर्ण उत्तर आपणांस मिळू शकेल. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण व भारतीय संस्कृतीविषयी वाटणारा तिरस्कार, यामुळे हिंदूंच्या अध:पतनास खतपाणी मिळत आहे. शिवाय पुरोगामी लबाडांची फूस व ख्रिश्चन मिशन-यांची कटकारस्थाने व त्यास होणारा मंद विरोध हेदेखिल हिंदूंच्या अल्पसंख्य होण्याचे एक कारण आहे.
म्यानमार व बांग्लादेशातून येणारे मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे व त्यांना मिळणारे राजकिय नेत्या-पुढा-यांचे अभय तसेच, मुस्लीम तुष्टीकरणामुळे होणारे त्यांचे अतिलाड भारताला निर्हिंदूकरणाकडे वेगाने घेऊन जात आहे.
म्यानमार व बांग्लादेशातून येणारे मुसलमानांचे लोंढेच्या लोंढे व त्यांना मिळणारे राजकिय नेत्या-पुढा-यांचे अभय तसेच, मुस्लीम तुष्टीकरणामुळे होणारे त्यांचे अतिलाड भारताला निर्हिंदूकरणाकडे वेगाने घेऊन जात आहे.
भारतातील जम्मु काश्मिर, केरळ, बंगाल, मेघालय, त्रिपुरा व उत्तर प्रदेशसारख्या राज्यात वाढणारी मुसलमानांची लोकसंख्या व ईशान्य भारतातील मिझोरम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपुरमधील वाढती ख्रिश्चनांची लोकसंख्या २०२१ च्या जनगणनेत हिंदूंना किती टक्क्यावर आणुन सोडणार हा प्रश्न संपुर्ण हिंदूंना काळजीत टाकणारा आहे. हिंदूंची घटती लोकसंख्या आणि मुस्लीम व ख्रिश्चनांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या भारताला वेगाने 'राष्ट्रांतरा'कडे तर घेऊन जात नाही ना? याचा प्रामाणिक विचार करण्याची गरज आता येऊन ठेपली आहे.
(लेख आवडल्यास शेअर करू शकता )
(लेख आवडल्यास शेअर करू शकता )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा