अखंड भारत: एक दिव्य स्वप्न
अखंड भारत: एक दिव्य स्वप्न
एका बालकाने आपल्या पित्यास विचारले, "बाबा, आपल्या भारत देशाचे पुर्वीचे नांव भारतवर्ष होते ना?" पित्याने नकारात्मक उत्तर दिले. आपला आजचा भारत देश म्हणजे भारतवर्ष नव्हे. तर भारतवर्ष नामक देशाचा एक तुकडा मात्र आहे. पुर्वीचा भारतवर्ष देश म्हणजे अतिविशाल असे राष्ट्र होते. कालानुरुप त्याचे फुटकळ राज्यात रुपांतर होऊन आज आपण नकाशात पाहतो तेवढाच भूभाग शिल्लक उरलाय ज्यास आपण भारत म्हणतो.
त्या पित्याच्या उत्तरात आश्चर्य वाटण्यासारखे असे काही नाही. आजचा भारत देश हा पुर्वीच्या भारतवर्षातील एक तुकडा मात्रच आहे. पुर्वीचा भारतवर्ष अतिविशाल असा भूभाग होता. जम्बु महाद्वीपचा तो एक भाग होता. आज आपण ज्यास आशिया खंड म्हणुन ओळखतो तो म्हणजे जम्बु द्वीपच होय. या महाकाय जम्बू द्वीपामद्ये नऊ मोठ मोठी राज्ये होती. इलावृत, भद्राश्व, किंपुरुष, भारत, हरि, केतुमाल, रम्यक, कुरु आणि हिरण्यमय. हीच ती राज्ये. त्यापैकी एक म्हणजे भारत. परंतु त्यावेळेसचा भारत आजच्या भारतापेक्षा बराच मोठा प्रदेश होता. ज्यामध्ये आजचे अफगाणीस्तान, इराण, पाकिस्तान, नेपाळ, तिबेट, भूटान, म्यानमार, इंडोनेशिया व श्रीलंका यांसारखी राष्ट्रे अंतर्भूत होती.
तत्कालीन जम्बू द्विपाचे वर्णन विष्णुपुराणातही आपणांस पाहावयास मिळते.
''सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन। परिमण्डलो महाराज द्वीपोऽसौ चक्रसंस्थितः॥
-वेदव्यास, भीष्मपर्व, महाभारत
अर्थ: हे कुरुनन्दन! हा द्विप सुदर्शन चक्राप्रमाणे गोलाकार स्थित असुन पुरुषाने आरश्यात पाहिल्यावर ज्याप्रमामे त्याचे प्रतिबींब दिसते तश्याच प्रकारे हा द्विप दिसतो. या द्विपाच्या दोन अंशात पिंपळाच्या पानाची आकृती दिसते तर दुसर्या दोन अंशात सश्याच्या आकृतीप्रमाणे याचे प्रतिरुप दिसुन येते. अश्या प्रकारे जंम्बू द्विपचे वर्णन केले गेले आहे. पाच हजार वर्षापुर्वी केले गेलेले या श्लोकाचे वर्णन आजही खरे ठरते. कारण आजच्या आशिया खंडाचा आकार वरील वर्णनाप्रमानेच आहे.
पुर्वी संपुर्ण जंम्बू द्विपवर हिंदूंचे अस्तित्व होते. मिस्र, सऊदी अरब, ईरान, इराक, इसराइल, कजाकिस्तान, रूस, मंगोलिया, चीन, बर्मा, इंडोनेशिया, मलेशिया, जावा, सुमात्रा, हिन्दुस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूटान, पाकिस्तान आणि अफगानिस्तान असे संपुर्ण क्षेत्र मिळुन जंम्बू द्विप तयार झाला होता. आणि या जंम्बू द्विपचा शासक हिंदू होता. परंतु कालांतराने अंतर्गत लढायांमुळे त्याचे रुपांतर भारतवर्षात झाले. पुढे भारतवर्षात कुरु आणि पुरु यांच्या युद्धातून आर्यावर्त नावाच्या नवीन राष्ट्राचा जन्म झाला. आर्यवर्त राष्ट्रामध्ये वैदिक संस्कृतीला माणना-या लोकांची संख्या जास्त होती.
ज्यामध्ये दास, वानर, किन्नर, द्रविड़, सुर, असुर अश्या सर्व प्रकारच्या जाती प्रजातींचा अंतर्भाव होता. आर्यवर्त राष्ट्र एवढे मोठे होते की त्यात आजच्या अफगाणीस्तान व पाकिस्तानचाही भाग समाविष्ट होता. त्याचेच पुढील वर्णन हिंदूंचे स्थान म्हणजेच हिंदूस्तान असेही केले गेले. आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, परंतु याच भारतवर्षामध्ये श्रीरामचंद्रांनी व श्रीकृष्णांनी राज्य केले आहे. या राष्ट्रपुरुषांच्या कथा आपण रामायण व महाभारतसारख्या ग्रंथांमधून वाचत आलो आहोत. श्रीरामचंद्रांचा काळ इ.स.पु. ५११४ ते इ.स.पु.३००० पर्यंतचा सांगितला जातो, तर श्रीकृष्णांचा काळ इ.स.पु. ३११२ ते इ.स.पु. २००० दरम्यानचा सांगितला जातो. नैसर्गिक आपत्ती व परकिय आक्रमकांच्या लुटमारीमुळे तत्कालीन अवशेष जरी मिळत नसले तरी आज हळुहळु भारतीय पुरातत्व खात्यास व वैज्ञानिकास उत्खननामधून रामायण व महाभारतकालीन अवशेषरुपी पुरावे मिळवण्यात यश येत आहे.
पुढील टप्प्यातील आर्यावर्त किंवा हिंदूस्तानचे वर्णन खालील श्लोकावरुन स्पष्ट होते.
''हिमालयात् समारभ्य यावत् इन्दु सरोवरम्। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थान प्रचक्षते॥- (बृहस्पति आगम)
'याचा अर्थ हिमालयापासुन ते इंदू महासागर (हिंद महासागर) पर्यंत हिंदुस्तानचे सीमाक्षेत्र होते.'
परंतु मागील ३००० वर्षांच्या कालखंडातील अन्य धर्मीयांचे धार्मीक- राजकिय आक्रमणांमुळे व धर्मपरिवर्तनामुळे हिंदूंसाठी केवळ आजचा छोटासा भारत देश शिल्लक उरला आहे.
हजारो वर्षापासुन हिंदूंच्या अस्तित्वाची ओळख असणारा महाकाय भूप्रदेश कालानुरुप कमी कमी का होत गेला? असा प्रश्न आज आपणांस पडल्याखेरीज राहत नाही. कधीकाळी ज्या प्रदेशात हिंदूसमाज वास्तव्यास होता त्या प्रदेशात आज अरब, तुर्क, पठाण व बौद्ध धर्मीय लोकांचे राज्य निर्माण झाले आहे. गतकाळात जम्बू द्विपावरील राज्यांच्या सीमा भलेही बदलत असतिल परंतु तेथिल त्या त्या राज्यांचा राज्यकर्ता हा हिंदूच असे. परंतु जसजसे नवीन धर्म उदयास आले तसतसा धार्मीक आक्रमणांचा ओघ वाढतच गेला व कडवट हिंसात्मक धार्मिक आक्रमणामुळे भारतवर्षाचा चेहराच बदलुन गेला.
उत्तर प्राचिन काळातील भारतावर पहिले मोठे आक्रमण झाले ते मॅसेडोनियाच्या ग्रीक राजा अलेक्झांडरचे (सिकंदर). या नंतर सेल्युकस, डिमिट्रियस, मिनँडरसारख्या ग्रीक राजांनी भारतावर पाऊल ठेवले. एवढेच काय तर शक, कुशाण व हुणांचेही आक्रमण भारताने सोसले. भारताने प्रतिकार केला. काहींना नामोहरम केले तर काही वेळेस हार पत्करावी लागली. परंतु आतापर्यंतचे सर्व आक्रमक केवळ साम्राज्यवादी महत्वाकांक्षा बाळगुन भारतावर चालुन आले होते. कुणाच्या संस्कृतीत ढवळाढवळ न करता त्यांना केवळ भारताच्या भूप्रदेशावर राज्य करायचे होते. कालांतराने त्या त्या परकियांनी भारतीय संस्कृती स्विकारली. परंतु इ.स. सातव्या शतकापासुन धर्मांध प्रवृत्तीने प्रेरित झालेल्या व सर्व जग इस्लाममय करु इच्छिना-या इस्लामी आक्रमकांनी भारताकडे आपली क्रुर आक्रमणे आरंभण्यास सुरुवात केली. पहिली पंधरा इस्लामी आक्रमणे हिंदू वीर यौद्धांनी यशस्वीपणे परतवली. परंतु भारतीयांच्याच फंद फितुरीमुळे महंम्मद बीन कासीम युद्ध जिंकुन वायव्य भारतावर कब्जा करुन बसला. पुढील काही वर्षात पुन्हा हिंदू राजांनी त्यास असे काही पछाडुन सोडले की पुढील तिनशे वर्ष भारतावर कुठलाही इस्लामी राज्यकर्ता पुन्हा वाकड्या नजरेनं पाहु शकला नाही. परंतु अकराव्या शतकात सुलतान गझनवीने भारतावर यशस्वी आक्रमण केले व वेळ न दवडता शक्य तितक्या वेगाने भारतास इस्लाममय करण्यास सुरुवात केली. कधी कपटाने तर कधी स्नेहाने, कधी बळाने तर कधी बाटवुन हिंदू पुरुषांना, स्त्रियांना, लहान लहान बालकांना धर्मांतरीत करण्यास सुरुवात केली. आजवरच्या राजकिय हेतुने झालेल्या आक्रमणांमुळे हिंदूंचे जेवढे नुकसान झाले नाही तेवढे इस्लामी धार्मिक आक्रमणांमुळे झाले. कारण आपली भारतीय संस्कृती व सभ्यता मानणारा समाजच नाहिसा होऊ लागला. धर्मांतराचे रुपांतर राष्ट्रांतरात होऊ लागले. हिंदू धर्मातील अस्पृश्यता, जातीभेद, धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यास होणारा विरोध यासारख्या कारणांमुळे हिंदूंचे अतोनात नुकसान होत गेले. तेराव्या शतकात शेवटचे विजयनगरचे हिंदू साम्राज्यही गळुन पडले व भारतात हिंदू परस्वाधीन झाला. अवघ्या तिनशे वर्षांच्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याची दिव्य ज्योत इ.स.१६७५ साली पुन: प्रकाशित केली व हिंदू साम्राज्याची स्थापना केली. तोपर्यंत भारतात इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच यांसारख्या इस्लामेतर विदेशी लोकांनी भारतात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती.
इंग्रजांनी कपट कारस्थानं करुन हिंदू राज्यकर्त्यांसह इस्लामी शासकांना हाताशी धरुन आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व प्रशिक्षीत सैन्याच्या जोरावर भारतावर पकड मजबुत केली. त्यातच इंग्रजांनी हिंदू व मुसलमानांमध्ये जाणिवपुर्वक द्वेषाचे बीज पेरण्यास सुरुवात केली. 'फोडा व राज्य करा' असे धोरण इंग्रजांनी अवलंबले. याचे पर्यवसन १८७६ साली अफगाणीस्तानच्या निर्मितीने सुरु झाले. अफगाणीस्तान (पुर्वीचे गांधार) भारतापासुन वेगळे झाला. या नंतर १९०४ साली नेपाळ, १९०६ साली भूटान, १९१४ ला तिबेट, १९३७ ला म्यानमार, १९८९ साली श्रीलंका व १९४७ साली भारताची भळभळती जखम म्हणुन पाकिस्तान भारतापासुन वेगळा झाला. भारत इंग्रजांच्या तावडीतुन सुटल्यानंतर
पाचशेहुन अधिक लहान लहान संस्थाने व राजे पुन्हा आपापली स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा तयारीत होती. परंतु, सरदार पटेलांनी सर्व संस्थांनिकांना आपल्या बाजुने वळवुन भारतात समाविष्ट करुन घेतले. नाही तर जगाच्या नकाशावर भारताचे नामोनिशाणही दिसले असते की नाही हे सांगता येत नाही.
मागील २५०० वर्षातील भारताचे २४ वे विभाजन म्हणुन पाकिस्तान नवे राष्ट्र नावारुपास आले. विशेष म्हणजे ही राष्ट्रे धर्माच्या प्राबल्यावर निर्माण झाली. ज्या धर्माचा पगडा अधिक किंवा ज्या धर्मीयांची लोकसंख्या अधिक त्यांचा देश असे जणु सुत्रच तयार झाले. यावर हिंदूंचे दुर्दैव ते हेच की हिंदूंना स्वत:चा हक्काचा भारतही आपल्या हक्काचा आहे असे म्हणु न शकण्याची नामुष्की आली. कारण भारत हिंदूराष्ट्र म्हणुन नव्हे तर लोकशाही धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणुन स्विकारण्यात आले. एवढे होऊनही भारतावरील परकिय धार्मिक व राजकिय आक्रमणं थांबली असे नाही. भारत पाकिस्तान फाळणीनंतर केवळ काही महिन्यांतच १९४८ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले व भारत काश्मीरस्थित बराच मोठा भूभाग गमावुन बसला. ज्याला आपण आज पाकव्याप्त कश्मीर म्हणतो. पाकिस्तानने पुन्हा १९६५, १९७२,१९९९ साली भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या जांबाज सैनिकांनी पाकिस्तानास प्रत्येकवेळी पराभूत केले. १९६५ साली चीनने आक्रमण केले, त्याचा परिणाम म्हणजे भारताला पुन: आपला तब्बल ३८००० चौ.कि.मी भूप्रदेश चीनला सोडावा लागला. जो आज अक्साई चीन म्हणुन आपण ओळखतो.
८४००० चौ.कि.मी. क्षेत्र असलेला भारत देश आज केवळ ३४००० चौ.कि.मी. क्षेत्र बाळगुन आहे. भारताची अतिसहिष्णुता व स्वार्थी राजकारण तसेच फुटीरतावादी व विद्रोही गट व संघटना यास कारणीभूत आहे. राष्ट्र प्रथम ही संकल्पना राजकिय नेते जणु विसरत चालले आहे. त्यामुळेच भारताच्या सरकारला व सेनेला मुग गिळुन गप्प बसावे लागते. म्हणुनच आपल्या भारत देशाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक भारतीयास व विशेषत: हिंदूस कटिबद्ध व्हावेच लागणार आहे. अन्यथा भविष्यात भारताचे अजुन विभाजन झाल्याखेरीज राहणार नाही. खंडखंड झालेला भारत देश पुन्हा अखंड करण्यासाठी भारत पाकिस्तानची फाळणी झाली तो दिवस म्हणजे १४ आॅगस्ट दिवस अखंड भारत संकल्प दिवस म्हणुन पाळला जातो. आपला भारत देश परम वैभवाकडे वाटचाल करत आहे.
©कल्पेश गजानन जोशी
Kavesh37.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा