पोस्ट्स

एसटी कर्मचा-यांच्या व्यथा:

इमेज
लेख प्रकाशन दि 20.10.2017       महाराष्ट्राची लालवाहिनी असलेली एस.टी. बस ऐन दिवाळीत आगारात तळ ठोकुन आहे. कारण या लालवाहिनीत प्राण ओतणा-या कामगारांनी सातवा वेतन आयोग लागु व्हावा यासाठी संप पुकारला आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाश्यांची चांगलीच फजिती झाली आहे. परंतु एसटी कामगारांचीही दिवाळी अजुन गोड झालेली नाही. घरादारापासुन दूर एसटी आगाराबाहेर संपकरी ठाण मांडून आहेत. त्यात राज्य सरकारने अजुनही या संपाविषयी सकारात्मकता आणि एसटी कामगारांच्या मागण्या व समस्या जाणुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही. उलट परिवहन मंत्र्यांचे "अजुन २५ वर्ष सातव्या वेतन आयोगासाठी विचार होऊ शकत नाही" असे बेजबाबदार विधान आगीत तेल ओतणारे ठरणार आहे. सरकारने एसटी कामगारांच्या मागण्यांकडे कानाडोळा केलेलाच आहे पण, विरोधीपक्षांनीही या कामगारांसाठी अजुन पर्यंत आवाज उठवलेला नाही हे विशेष. त्यामुळे एसटी कामगारांचा संप अधांतरी झाला आहे. पण, तरीही राज्यातील सर्व एसटी कामगार या संपात उतरलेले आहे आणि स्वत:च्या मागण्यांसाठी पुर्ण शक्तीनिशी लढा चालुच राहणार असे चित्र आहे. या संपामागे वेतनवाढ ...

#"फाशीच्या शिक्षेचे आव्हान"#

इमेज
    #..फाशीच्या शिक्षेचे आव्हान..#     न्याय, समता, बंधुता या मुलतत्वांना समाज व्यवस्थेत जितके उच्च स्थान दिले तितका समाज सुरक्षित, सुसंस्कृत व विवेकी बनतो. पण समानतेचा विचार करण्याला काही लगाम असतो का? जर असेल तर त्यांना कुठे ताण द्यावा आणि कुठे सैल सोडावे? असे काहीसे प्रश्न पडतात, जेव्हा समानतेचा विचार एखाद्या गोष्टीच्या दोन अंगांना स्पर्श करू लागतो. अश्याच एका प्रकरणाने समानतेचा तराजू हेलकावे खाऊ लागला आहे. निमित्त्य आहे सुप्रीम कोर्टात केलेल्या एका याचिकेचे. “फाशीची शिक्षा असंवैधानिक असून जीवन संपवण्याची ती सन्मान जनक पद्धत नाही” अश्या प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यासाठी फाशीमागची समानता तपासुन पाहण्याची वेळ आली आहे.     ‘त्रास रहित मरणाचा अधिकार’ आणि ‘सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकारा’मुळे फाशीच्या शिक्षेला आव्हान मिळाले आहे. ज्या प्रमाणे ‘डोळ्यासाठी डोळा’ हे तत्व पटू शकत नाही, मग ‘मृत्यूसाथी मृत्यू’ हे तत्व कसे पटू शकते.? तसेच, केवळ फाशीच्या शिक्षांमुळे गुन्हेगारीला पूर्णत: आळा बसला आहे का? हे प्रश्न सामान्...

जरासे सकारात्मक...

 *कोण म्हणतं भारतीय दुसर्याच्या आनंदाने दुखी होतात?* 》केबीसीत (कौन बनेगा करोडपती) करोडो जिंकणा-याला निस्वार्थीपणे लोक डोक्यावर घेतात. ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात मानवता नाही?* 》महापुर, रेल्वे अपघात व इतर आपत्तीत लाखो मदतीचे हात पुढे येतात. ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात महिला सुरक्षित नाहीत?* 》आॅटोरिक्षापासुन रेल्वेत रात्री अपरात्री प्रवास करणा-या लाखो महिला आम्हाला दिसतात... ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारत सहिष्णू नाही?* 》विविध धर्माची, पंथाची, जातीपातीची व बहुविचारी माणसे असुनही भारतात शांतता असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणीही कसेही विचार मांडू शकतो... ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात नितीमुल्ये नाहीत?* 》महापूर, भुकंप किंवा अपघात झाले तर मेलेल्यांच्या अंगावरचे दागिने व खिसेपाकिटाला हात न लावता त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणारे भारतीय दिसतात. ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात समानता नाही?* 》भारतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन स्त्रिया सर्व क्षेत्रात काम करतात. सर्वधर्मीय बांधव सर्वक्षेत्रात योगदान देतात....

‘लोकमान्य Vs भाऊसाहेब’

इमेज
                                          आजकाल  श्रेयवाद ही जणू नित्याचीच बाब झाली आहे. भूतकाळातील काही गोष्टीचा परस्पर संबंध लावून किंवा एखाद दोन उदाहरणावरून त्या व्यक्तीच्या आयुष्य भरातील कार्याचे अपवाद शोधायला सुरुवात होते आणि आपल्याला हवे तसे रंग त्या व्यक्तीच्या व्यक्तिरेखेला देता येतात व आपण किंवा आपली संस्था , संघटना कश्या इतरांपेक्षा वेगळया आहेत असा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न यातून साध्य केला जातो. आताचा नवीन मुद्दा म्हणजे ‘ गणेशोत्सवाचे जनक कोण ?’ हा.       लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असण्याला काहींनी आक्षेप घेतला आहे. खरं तर या वर्षी टिळकांनी सुरू केलेल्या ‘ सार्वजनिक गणेशोत्सवाला ’ १२५ वर्ष पूर्ण झालेत. त्याचा उत्सव साजरा करणे दूरच पण श्रेयवाद मात्र फोफावला. तसे पहिले जाता ‘ सार्वजनिक ’ हा शब्दच मुळात सगळ्या शंका कुशंका दूर करतो. कारण गणेशोत्सवाचा इतिहास पाहायला गेले तर तो काही दीड-दोनशे वर्षापूर्वीचा नाही हे लक्षात ये...

$$$सवारी बालपणीची$$$

    मित्रांन्नो जुन्या आठवणींना उजाळा देऊन मी एक छोटासा लेख लिहिला आहे. खात्री आहे तो तुमच्याही हृदयाला स्पर्श करेल व तुम्हालासुद्धा तुमच्या बालपणी नक्की घेऊन जाईल.   ...

#विद्यार्थ्यांना गंडवणार्यांच्या मानगुटीवरील भूत!#

    'शिक्षणाचा बाजार झालाय'., 'शिकायचंय? मग ओत पैसा', 'शिक्षण म्हणजे गरिबाचं काम नाही'..वगैरे वगैरे. असे वाक्य आजपर्यंतच्या आयुष्यात कुणी ऐकले नाही असा क्वचितच कुणीतरी मिळेल. क...

#"आत्महत्या नव्हे कायरता"#

"जयासी वाटतो जन्माचा दुखवटा जीवन हे मोठा बोजा वाटे काम पाहुनिया दिसे ज्या मरण दु:खासी कारण प्रेम म्हणे" या ओवी आहेत प. पू. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या. या चार ओळी कलीयु...