जरासे सकारात्मक...
*कोण म्हणतं भारतीय दुसर्याच्या आनंदाने दुखी होतात?*
》केबीसीत (कौन बनेगा करोडपती) करोडो जिंकणा-याला निस्वार्थीपणे लोक डोक्यावर घेतात.
...केवळ बदनामी!
*कोण म्हणतं भारतात मानवता नाही?*
》महापुर, रेल्वे अपघात व इतर आपत्तीत लाखो मदतीचे हात पुढे येतात.
...केवळ बदनामी!
》महापुर, रेल्वे अपघात व इतर आपत्तीत लाखो मदतीचे हात पुढे येतात.
...केवळ बदनामी!
*कोण म्हणतं भारतात महिला सुरक्षित नाहीत?*
》आॅटोरिक्षापासुन रेल्वेत रात्री अपरात्री प्रवास करणा-या लाखो महिला आम्हाला दिसतात...
...केवळ बदनामी!
》आॅटोरिक्षापासुन रेल्वेत रात्री अपरात्री प्रवास करणा-या लाखो महिला आम्हाला दिसतात...
...केवळ बदनामी!
*कोण म्हणतं भारत सहिष्णू नाही?*
》विविध धर्माची, पंथाची, जातीपातीची व बहुविचारी माणसे असुनही भारतात शांतता असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणीही कसेही विचार मांडू शकतो...

*कोण म्हणतं भारतात नितीमुल्ये नाहीत?*
》महापूर, भुकंप किंवा अपघात झाले तर मेलेल्यांच्या अंगावरचे दागिने व खिसेपाकिटाला हात न लावता त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणारे भारतीय दिसतात.

*कोण म्हणतं भारतात समानता नाही?*
》भारतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन स्त्रिया सर्व क्षेत्रात काम करतात. सर्वधर्मीय बांधव सर्वक्षेत्रात योगदान देतात. कशी समानता नाही?

*कोण म्हणतं भारतीय फक्त देवभोळे आहेत..?*
》भारतीयांचा देवावर विश्वास जरुर आहे. पण भारतीय देव फक्त दगडात नाही तर गोर गरीब, शोशित वंचितांमध्येही पाहतात. फुला-झाडांमध्येही पाहतात. मंदिरात दान करतात तसे गरीबांमध्येही महादान करतात.

*कोण म्हणतं भारतीय दानशुर नाहीत?*
》भारतात दानशुर कर्ण होऊन गेला. आजही अनेक कर्ण जिवंत आहेत. हजारो स्वयंसेवी संस्था आणि लाखो भारतीय आनंदाच्या प्रसंगी गरीबात दान वाटप करतात. गरीबांची सेवा करतात.

*कोण म्हणतं भारतीय आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत?*
》भारतीयांवर भक्त पुंडलीक आणि श्रावणबाळासारखे संस्कार आहेतच. बहुसंख्य भारतीय आपल्या आई वडिलांचा शेवटपर्यंत सांभाळ करतात. एवढच काय तर मरणोपरांत श्राद्धाच्या माध्यमातून कृतज्ञताही व्यक्त करतात. जगाच्या पाठीवर असे उदाहरण कुठेही दिसणार नाही.
...पण झाली केवळ बदनामी!

*यांसारख्या अनेक अनाठायी प्रश्नांची सहजसोपी उत्तरे कोणीही भारतीय देऊ शकतो. पण भारतीयांचं दुर्दैव हेच की त्यांच्यावर दररोज मिडीयातून नकारात्मकता थोपवली जाते. दररोज त्याच्यावर हेच बिंबवलं जातं की देशात कसे अत्याचार होताहेत, देशात कशी अशांतता आहे. देश कसा असहिष्णु आहे. आणि एकुणच भारत देश कसा वाईट आहे.*
♂ही छिन्न मानसिकता कश्यासाठी? ही नकारात्मता कश्यासाठी? हा देश आपला आहे आणि तो अतिशय सुंदर आहे. आपल्या देशात मदत झिडकारणा-यांपेक्षा मदत करणा-यांचे हात जास्त आहेत!♂
आपल्या देशात स्त्रियांच्या अब्रुवर पडणा-या हातापेक्षा स्त्रियांचा सन्मान करणारे हात जास्त आहेत!
आपल्या देशात पाय खेचणा-यांपेक्षा आधार देणारे हात अधिक आहेत!
आपल्या देशात रक्त सांडणा-यांपेक्षा रक्तदान करणारे अधिक आहेत!
आपल्या देशात चोर, लबाड, ढोंगी लोकांपेक्षा सज्जन सदगुणी माणसे जास्त आहेत!
*मुठभर चांडाळांमुळे माझा देश बदनाम होऊ शकत नाही आणि कधीच होणार नाही.*
*चिमुटभर नालायकांचा विचार करण्यापेक्षा पसभर देशभक्त भारतीयांचा आदर्श समोर असला पाहिजे.*
*नकारात्मता नाहिशी होऊन सकारात्मकता वाढीस लागली पाहिजे.*

✊आपला देश वैभवशाली झाला पाहिजे!
✊आपला संकुचित विचार बदलला पाहिजे!
✊हा सकारात्मक विचार प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचला पाहिजे!
©kavesh37.blogspot.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा