पोस्ट्स

अशी झाली भारतीय वायुसेनेची सुरुवात...

इमेज
जसजसा काळ बदलत गेला, नवनवे संशोधन होत गेले तसतसा युद्ध प्रकार बदलत जाऊ लागला.  युद्धात विमानांचा वापर मोठ्या खुबीने होऊ लागला. सैन्यदलात वायुसेना अतिशय मोलाची भूमिका निभावू लागली. पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंगच निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली होती. १९१८-३८ या एकवीस वर्षांच्या दोन जागतिक युद्धांच्या संधिकालात एकामागून एक लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाई दले स्थापण्यास सुरुवात केली. या काळात ब्रिटिशांनी हिंदुस्थानात ‘रॉयल एअर फोर्स’ ची (शाही हवाई दल) स्थापना केली. त्यात दोन स्क्वॉड्रन्स, ८० अधिकारी व ६०० सैनिक हिंदुस्थानात ठेवले होते (१९१८).  १९२० पर्यंत स्क्वॉड्रन्सची संख्या आठपर्यंत गेली व १९२३-२४ मध्ये ती पुन्हा सहापर्यंत खाली आली. त्यांपैकी चार भूसेनेला पाठिंबा देणारी व दोन बाँबर स्क्वॉड्रन्स होती. सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या शिफारशीनुसार १९२८ मध्ये क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेत सहा हिंदी सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यावयाचे, असे ठर...

रझाकारांनी भग्न केलेले पुणतांब्याचे 'मामा भाचे मंदिर'

इमेज
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मंदिरांपैकी हे पुरातन मंदिर आहे. मंदिराचा जवळपास 300 ते 400 वर्षाचा इतिहास असल्याचे स्थानिक सांगतात. दोघे मंदिर अगदी शेजारी शेजारी आहेत. दोघी मंदिरे महादेवाची आहेत.  निजामी राजवटीत रझाकरांच्या क्रूर व धर्मांध आक्रमणात मंदिरांचा विध्वंस झाल्याचेही स्थानिक सांगतात. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे 70-80 वर्षांपूर्वी मंदिराचा झालेला विध्वंस अजूनही त्याचीच वाईट आठवण करून देत आहे. कारण या मंदिराचा मागील इतक्या वर्षात विकास सोडा सध्या भग्न मुर्त्या सुद्धा बदलता आलेल्या नाहीत. याला स्थानिक हिंदू समाजाची हतबलता म्हणावी की राजकीय उदासीनता? अनेक प्रयत्न करूनही राजकीय अनास्था असल्यामुळे हिंदू  अस्मितेवर झालेला हा आघात पुसता आलेला नाही. गोदावरीच्या तीरावर ब्राम्हणघाटावर आज जवळपास 12 ते 15 छोटी मोठी देऊळ आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हे मामा-भाचे मंदिर. बाकी सर्व मंदिरे ही नंतरच्या काळात अगदी अलीकडे बांधलेली आहेत. पण येथील सर्वात मोठे व पुरातन मामा  भाचे मंदिराकडेच का दुर्लक्ष झाले ते काही कळत नाही. बहिष्कृत केल्याप्रमाणे हे मंदिर आज जीर्ण अवस्थ...

भूमिपूजन आणि पोटशूळ

इमेज
रामजन्मभूमी अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार म्हंटल्यावर काँग्रेससह अन्य रामजन्मभूमीच्या विरोधकांचे चांगलेच पोट दुखू लागले आहे. मागील गेल्या कित्येक वर्षात विशिष्ट पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामाजिक संघटनेचे कथित सामाजिक कार्यकर्ते रामजन्मभूमीचा निकाल कसा हिंदूंच्या विरोधात लागेल यासाठी उठाठेव करत होते. दिग्गज वकिलांची फौज यासाठी तयार करण्यात आली होती. परंतु, गेल्या पाचशे वर्षांपासून रामजन्मभूमी साठी लढा देणाऱ्या हिंदू समाजाला अखेर न्याय मिळाला. प्रभू रामचंद्राचे अस्तित्व नाकारांऱ्यांचा पराभव झाला. भारताच्या इतिहासात ९ नोव्हेंबर, २०१९ हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला.  आता ५ ऑगस्ट २०२० रोजी मंगल मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या नगरीत मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. देशातील सेक्युलॅरीजमच्या नावाखाली हिंदूंना दुय्यम महत्व देणाऱ्या विशिष्ट पक्ष व नेत्यांना मात्र अजूनही श्रीराम मंदिर निकाल पचनी पडलेला दिसत नाही. कधी कोणीतरी मंदिराच्या जागी बौद्ध संस्कृती असल्याचा दावा करतो, तर कोणी लॉकडाऊन चे कारण काढत भूमीपूजन कार्यात अडथळा आणू पाहतो. डाव्यांनी ...

स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्तिसंग्राम मधील योगदान

इमेज
@कल्पेश गजानन जोशी  हैदराबादच्या राजकारणात स्वामीजी १९३७-३८ पासून उतरले. परतूर परिषदेपासून मराठवाड्यात राजकीय वातावरणाला सुरुवात झाली होती. १९३७ साली गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली परतूर ची महाराष्ट्र परिषद झाली व एक प्रकारे तरुणांमध्ये चैतन्य निर्माण झाले. निजाम सरकारने वृत्तपत्र, सभा, मुद्रण यावर निर्बंध घालून जनतेची मुस्कटदाबी केली होती. परवानगीशिवाय कुठलेही सभा-संमेलने होऊ शकत नव्हती. शैक्षणिक क्षेत्रात अल्पसंख्यांकांची भाषा 'उर्दू'ला प्राधान्य देऊन विद्यापीठाचे माध्यमही उर्दूचा ठेवण्यात आले होते. शिक्षणाची व्यवस्था तुटपुंजी होती. स्त्रिया प्राथमिक शिक्षणाच्या पुढे जाऊ शकत नव्हत्या. विद्यापीठात विद्यार्थ्यांवर सर्वसमावेशक आणि राष्ट्र निर्माण करणारे संस्कार होण्याऐवजी एका विशिष्ट धार्मिक पद्धतीचे शिक्षण थोपवले जात होते. १९३८ साली लातूर येथे महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन घेण्यात आले. यावेळी कायदेभंग करावा अशी भाषा सुरू होती. श्री दिगंबरराव बिंदू, काशिनाथराव वैद्य आणि स्वामीजी यांची समिती नेमून त्यांनी पुढील कार्यक्रम ठरवावा असे ठरले व निषेध म्हणून अधिवेश...

स्वामी रामानंद तीर्थ - बालपण ते संन्यास

इमेज
@ कल्पेश गजानन जोशी हैदराबाद मुक्तिसंग्रामात सर्वस्व झोकून देऊन सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी व त्यांच्या नैसर्गिक स्वातंत्र्यसाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी दूरदृष्टीने लढणारे झुंजार नेतृत्व म्हणजे 'स्वामी रामानंद तीर्थ'. हैदराबाद राज्याच्या विभाजनाचे प्रवर्तक व संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्याकरिता हिरीरीने झटलेले, धुरंदर चिकाटीचे कार्यकर्ते म्हणून इतिहास स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कडे बघतो. निजामाच्या धर्मांध आणि पिसाट सत्तेशी झुंजताना अनेक हाल-अपेष्टा ना त्यांना सामोरे जावे लागले. तळघराच्या अंधारकोठडीत ठेवून निजामाने त्यांचा अनन्वित छळ केला. पक्षाघाताच्या व्याधीने त्यांचे शरीर आधीच जर्जर झाले होते, परंतु तरीही न डगमगता त्यांनी निजामाविरुद्ध मोठे जन आंदोलन उभे केले. या स्वातंत्र्यलढ्यात स्वामीजी हजारो तरुणांचे प्रेरणास्थान होते. बालपण: स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ मध्ये कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात 'सिंदगी' या तालुक्याच्या गावी झाला. ते मूळचे खेडगी या गावचे. स्वामीजींच्या मातोश्री बालपणीच मरण पावल्या होत्या. त्यांचे म...

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान

इमेज
@कल्पेश गजानन जोशी हैदराबाद संस्थानात बहुसंख्य जनता हिंदू होती तर राज्य प्रमुख मात्र निजाम हा मुस्लिम होता. निजामाने आपल्या पदरी रझाकार, इत्तेहादूल मुसलमीन, खाकसार, सिद्दीकी, निजामसेना अश्या संघटना बाळगल्या होत्या. या संघटनांना जवळ शस्त्र बाळगण्याचा अधिकार होता आणि निजाम शासनाच्या विरोधात व भारताच्या बाजूने मत व्यक्त करणाऱ्या हिंदूंचा शक्तीबळाचा वापर करून आवाज दाबण्यासाठी या संघटना त्याने पाळून ठेवल्या होत्या. या संघटनांचे प्रमुख अत्यंत टोकाचे धर्मवेडे, हिंदू द्वेष्टे व कट्टर जातीयवादी होते.  निजामाच्या या संघटना हिंदूंना प्रचंड त्रास देत होत्या. हजारो कार्यकर्ते या संघटनेत जोडले गेले होते. बीड जिल्ह्यातील धारूर आणि कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यात आर्यसमाज शक्तिशाली झाला होता. आर्य समाजाच्या अनुयायांना निजामाच्या रझाकारांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जाई.  या काळात उदगीर, बसवकल्याण, लातूर, निलंगा, गुंजोटी या ठिकाणचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन आर्य समाजाची स्थापना करीत होते. संस्थानामध्ये उर्वरित भारतातून दीड ते दोन हजार आर्यसमाजी तरुण कार्यकर्ते संस्थानाच्या कान...

राममंदिरामुळे देशाच्या विकासाला काय फायदा होणार आहे?

इमेज
५ ऑगस्ट रोजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे ऐतिहासिक भूमीपूजन संपन्न झाले. कित्येक आनंदाश्रू या सोहळ्याचे साक्षी बनले. परंतु, देशातील काही तथाकथित पुरोगामी सेक्युलरांना मात्र जणू सुतक पडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संविधानिक पद्धतीने सगळे झालेले असताना ते दुःखी झाले आहेत. हिंदुत्ववादी या दुःखी आत्म्यांची फार टर उडवीत आहेत, पण त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. त्यांचे रडणे स्वाभाविक आहे, कारण मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी जी स्वप्ने रंगवली होती ती धुळीस मिळत आहेत व खरा भारत निर्माण होत आहे. या नवभारत निर्मितीत कुठेही वैयक्तिक स्वार्थ नाही. स्वार्थविना कुणी इतकी यशस्वी आणि मोठं होऊ शकतं का, याचं सकारात्मक उत्तर पचवणे त्यांना कठीण झाले आहे. असो.  राम मंदिर बांधून देशाला काय फायदा होणार आहे? देशाच्या विकासात काय भर पडणार आहे? गरीबाच्या थाळीत काय पडणार आहे. देशाला शाळा, हॉस्पिटलची गरज आहे. राममंदिरामुळे कोरोना जाणार आहे का? अशी अनेक प्रश्न कथित लिब्रांडूना पडली. मंदिरांची तुलना हॉस्पिटल आणि शाळांशी जशी केली जात आहे तशी देशभरात बेगुमानपणे वाढत चाललेल्या मशिदी, मदरस...