पोस्ट्स

राममंदिरामुळे देशाच्या विकासाला काय फायदा होणार आहे?

इमेज
५ ऑगस्ट रोजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे ऐतिहासिक भूमीपूजन संपन्न झाले. कित्येक आनंदाश्रू या सोहळ्याचे साक्षी बनले. परंतु, देशातील काही तथाकथित पुरोगामी सेक्युलरांना मात्र जणू सुतक पडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संविधानिक पद्धतीने सगळे झालेले असताना ते दुःखी झाले आहेत. हिंदुत्ववादी या दुःखी आत्म्यांची फार टर उडवीत आहेत, पण त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. त्यांचे रडणे स्वाभाविक आहे, कारण मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी जी स्वप्ने रंगवली होती ती धुळीस मिळत आहेत व खरा भारत निर्माण होत आहे. या नवभारत निर्मितीत कुठेही वैयक्तिक स्वार्थ नाही. स्वार्थविना कुणी इतकी यशस्वी आणि मोठं होऊ शकतं का, याचं सकारात्मक उत्तर पचवणे त्यांना कठीण झाले आहे. असो.  राम मंदिर बांधून देशाला काय फायदा होणार आहे? देशाच्या विकासात काय भर पडणार आहे? गरीबाच्या थाळीत काय पडणार आहे. देशाला शाळा, हॉस्पिटलची गरज आहे. राममंदिरामुळे कोरोना जाणार आहे का? अशी अनेक प्रश्न कथित लिब्रांडूना पडली. मंदिरांची तुलना हॉस्पिटल आणि शाळांशी जशी केली जात आहे तशी देशभरात बेगुमानपणे वाढत चाललेल्या मशिदी, मदरस...

...इथे माणुसकी ओशाळली!

इमेज
... इथे माणुसकी ओशाळली! #पालघर येथे घडलेला प्रकार इतका लाजिरवाणा आहे, की याचे कोणतेही राजकारण न होता खरोखर हल्लेखोर नर पिशाच्च लोकांवर कठोर करावी व्हायला हवी. इतक्या क्रूरतेने कोणी मारहाण करून जीव घेत असेल तर अश्या लोकांवर कारवाई काय होते हेही समाजासमोर येणे गरजेचे झाले आहे. कारण मागील काही वर्षात देशभरात मॉब लिंचिंगचे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणावर चोरीचा किंवा मुलं पळवणारे म्हणून संशय घेऊन मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने होत आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 110 जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मुंबईच्या कांदिवली येथून आपल्या गुरूंचे निधन झाल्यामुळे तातडीने जावे लागत असल्यामुळे सुरतकडे निघालेल्या सुरेश महाराज गिरी (वय 35), कल्पवृक्ष महाराज (वय 70) आणि त्यांचा 30 वर्ष वयाचा चालक हे तिघेजण सुरतकडे आपल्या  गाडीतून रवाना झाले होते. 16 तारखेला रात्री 9.30 वाजता ते तिघे गडचिंचले येथे पोहचले. त्याच रात्री त्यांच्यावर तेथे जमलेल्या शेकडो लोकांच्या जमावाने हल्ला चढवला. पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरोडेखोर...

मॉब लिंचिंग की हत्याकांड?

इमेज
मॉब लिंचिंग की हत्याकांड?  #पालघर घटना घडून आज (21 एप्रिल) पाच दिवस झाले. सोशल मीडियात ही घटना समोर येऊन तीन दिवस आणि प्रसार माध्यमात (खऱ्या अर्थाने) येऊन दोन दिवस झाले आहेत. या पाच दिवसात अनेक घडामोडी घडल्या, क्रिया प्रतिक्रिया उमटल्या, राजकारण करून झाले. परंतु, काही तथ्य या निमित्ताने समोर आले आहेत. त्यामुळे पालघर हत्याकांड ही अफवेतून झालेली मॉब लिंचिंग आहे की भगवे वस्त्र धारण केलेल्या संतांना मारलेला कट आहे, याबाबद्दल शंका गडद होऊ लागल्या आहेत.  पालघर जिल्ह्यातील ज्या कासा या गावाजवळील गडचिंचले गावात तीन साधूंची जमावाने हत्या केली, त्या गावातील सरपंच भाजपच्या असल्यामुळे यामागे भाजपचा हात असल्याचा दावा करण्यास सुरुवात झाली. परंतु, तेथील सरपंच कोणी कुख्यात गुंड प्रवृत्तीची किंवा त्या भागात मोठा पगडा आहे आणि सर्व लोक त्यांच्या शब्दाखाली आहेत अशी व्यक्ती होती का? हा साधा प्रश्न आपल्याला हा दावा किती हास्यास्पद आहे हे दर्शवून देतो. सरपंच कधीपासून इतके शक्तिशाली होऊ लागले?  चित्रा चौधरी नामक महिला तेथील सरपंच आहेत आणि कदाचित प्रथमच त्या सरपंचपदी बसल्या आहेत. असे ...

टिकटॉकवर बंदी यावीच, पण...

इमेज
टिकटॉकवर बंदी यावीच, पण... टिकटॉक एप्पच्या विरोधात देशात एक लहर उठली आहे. जातीवाचक, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी व महिला अत्याचारांना उत्तेजना देणाऱ्या व्हिडिओमुळे टिकटॉक चर्चेत आले. देशात या विरोधात एवढी मोठी लहर उठली कि प्ले स्टोअर वर 4.6 रेटिंग असलेले हे एप्प आज 1.3 इतक्या नीचांकी रेटिंग वर येऊन पोहचले आहे. निमित्त ठरले फैजल सिद्दिकी या टिकटॉकरचे. एसिड हल्ल्यांना समर्थन व उत्तेजन देणाऱ्या त्याच्या व्हिडिओमुळे समाजमनात संतप्त भावना उमटल्या, आणि असे एक एक व्हिडीओ समोर येत गेले व थेट टिकटॉक बंदीची मागणी उठली. भारतीय महिला आयोगानेही आता टिकटॉकवर बंदी आणण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.  टिकटॉक बंदीची मागणी करणाऱ्या मंडळींची मागणी चुकीचे आहे, असे कोणीही म्हणू शकणार नाही. टिकटॉकमुळे अनेक तरुण तरुणींना अक्षरशः वेड लागण्याची पाळी आली आहे. मनोरंजन, विनोद, व्यंग, खिल्ली उडवणे व ट्रोल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टिकटॉकचा वापर होऊ लागला. जास्तीतजास्त कमेंट्स, फोलोअर्स वाढवण्याचा इर्ष्येपायी दररोज नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी सुरुवात झाली, त्याचे रुपांतर सवयीत कधी झाले हे त...

सनातनची हत्या व मुस्लिम व्यापार श्रेणी

इमेज
सनातनची हत्या व मुस्लिम व्यापार श्रेणी आसाम मध्ये लॉकडाऊन काळात रोजीरोटीसाठी सायकल वरून भाजीपाला विकणाऱ्या सनातन डेकी या हिंदू गृहस्थाची मुस्लिम जमावाने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. "मुस्लिम मोहल्ले मे सब्जी बेचने क्यू आया?" असे म्हणत या मुस्लिम जमावाने सनातन डेकी याचा जीव घेतला. देशभरात या घटनेच्या विरोधात संताप उफाळत आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांचा विचार जरी केला तरी हिंदू विक्रेते, व्यापारी यांच्यावर मुस्लिमांकडून बहिष्कार घालण्याच्या घटना घडलेल्या आहेत असे लक्षात येते. हिंदू कधीतरी याचा गांभीर्याने विचार करणार आहेत की नाही? या घटना घडल्यावर नुसतीच आदळआपट आणि चर्चा करून काय साध्य होणार आहे. सोशल मीडियात रोष व्यक्त करून काय उपयोग आहे?  १०० कोटी हिंदूंच्या देशात आज २५ कोटी मुसलमानांची तंत्रशुद्ध व्यापार यंत्रणा अस्तित्वात आहे. या रचनेत कोणाही हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांना स्थान नाही. स्थान मिळालेच तर ते सर्वात शेवटी म्हणजेच किरकोळ विक्रेता किंवा ग्राहक म्हणून. ते म्हणतील त्या दराला/किमतीला तुम्हाला 'हो' म्हणण्य...

भाग १ - शांतता दूत की चिनी हस्तक?

इमेज
युद्धाचा विषय येताच नमती भाषा का सुरू होते? याचे सांगोपांग स्पष्टीकरण करणारी लेखमाला. भाग १ - शांतता दूत की चिनी हस्तक? सध्या भारत चीन संबंधाने देशात वातावरण तापले आहे. भारत-पाकिस्तान विवाद विषय तर नित्याचे आहे. परंतु जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा युद्ध म्हणून चर्चा सुरू होते तेव्हा विशिष्ट लोक भारताला सबुरीचा सल्ला देऊन कमी का लेखतात, असा प्रश्न अनेकांच्या मनाला स्पर्शून जात असेल यात शंका नाही.  भारताचे शस्त्र, सैनिक संख्या, आर्थिक संकट, देशांतर्गत परिस्थिती यासोबतच शत्रू राष्ट्र आपल्यापेक्षा कसे बलशाली आहे हे दाखविण्याचा तथाकथित बुद्धिवादी प्रयत्न वारंवार करत असतात. आपण या कडे फार समजूतदार भूमिका म्हणून बघत असतो, परंतु दुसऱ्या बाजूने विचार करू गेल्यास भारताला सतत नमतं घेण्यासाठी एक विचारवंतांची फौज कायम सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते.  सध्या भारत चीन दरम्यान गलवान खोऱ्यातील घटनेमुळे वातावरण तापले आहे. या परिस्थितीत भारत चीन युद्ध या विषयावर चर्चा सुरू झाली आणि चीन भारतापेक्षा कसा शक्तिशाली आहे हे दाखवले जात आहे. यामध्ये काही विशिष्ट व...

भाग २ - चिनी हस्तक व कम्युनिस्ट अजेंडे

इमेज
युद्धाचा विषय निघताच नमती भाषा का सुरू होते? याचे सांगोपांग स्पष्टीकरण करणारी लेखमाला.. भाग २ - चिनी हस्तक व कम्युनिस्ट अजेंडे चीनचा अजून एक अजेंडा म्हणजे समाजवाद्यांच्या हातून लोकमानसात माओवादी विचारांची (अप्रत्यक्ष) पेरणी करणे होय. चीनने ज्याप्रमाणे तिबेट बळकावले आहे, त्याप्रमाणे नेपाळ, भूतान व नंतर माओ ने सांगितल्या नुसार भारतातील अरुणाचल प्रदेश, लडाख, गलवान याकडे त्याची वक्रदृष्टी आहे. लोकांचा त्यांच्या संस्कृती, परंपरांवरून विश्वास उडवायचा, राष्ट्रीय भावना कमजोर करायची नंतर 'लालक्रांती' करायची, अशी त्यांची साम्राज्यवादी पद्धत राहिली आहे. भारतात संस्कृती, परंपरा, सद्भावना व राष्ट्रीय भावनेस छेद देणाऱ्या टुकडे टुकडे गँगसारख्या विकृती तेच काम राजरोसपणे करत असतात. या माओवादी अजेंड्याला खतपाणी घालण्यासाठी चीनने मोठी फळी मीडियात उभी केलेली आहे. भारताची जागतिक स्तरावर बदनामी करण्याचे उद्योग त्यांच्याद्वारेच केले जातात. भारतातील विशिष्ट माध्यमे, पत्रकार मंडळी, लेखक, न्यूज चॅनल्स यांची दुकाने चीनच्या भरवश्यावर सुरू आहेत. अनेक पत्रकार, लेखकांना पैसे देऊन हवे ते आर्टिकल्स...