पोस्ट्स

सेना, मनसे आणि 'ते'

इमेज
शरद पवार म्हणतात महाविकास आघाडीत मुस्लिमांच्या सांगण्यावरून सहभागी झालो. अशोक चव्हाण सांगतात महाविकास आघाडीत मुस्लिम समुदायाच्या आग्रहावरून सहभागी झालो. हुसेन दलवाई म्हणतात आम्ही सोनिया गांधी व पक्ष श्रेष्ठींना शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा कसे वेगळे आहे हे समजावून सांगितले.  CAA व NRC च्या मुद्द्यावर आपल्यापासून दूर गेलेले अल्पसंख्याक समुदायाचे मत पुन्हा आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी खुलेआम त्यांच्या मोर्चांना व आंदोलनाला पाठिंबा देत आहे. हिंदूंच्या विरोधात गेल्यामुळे आपली सत्ता कोसळेल व भविष्यात फटका बसेल याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चिंता वाटत नाही. आपल्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शिवसेना नाराज होईल आणि त्याचा परिणाम सत्तेवर होईल याचीही चिंता काँग्रेस राष्ट्रवादीला वाटत नाही.  एवढी बेफिकिरी येण्यामागे या तिघाडी सरकारमध्ये काय ठरलं आहे? असा कोणता मुद्दा आहे की ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर एवढी विश्वास (?) ठेवून आहे. असे अनेक प्रश्न आज जनतेला पडत असतील. कारण एकीकडे शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी नाराज होईल याची पार चिंता वाटते. त्यासाठी त्यां...

पुस्तक, मोदी आणि बरंच काही...

इमेज
पुस्तक, मोदी आणि बरंच काही... छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे असंभव आहे, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत एका भाषणादरम्यान म्हंटले होते. एवढेच काय तर मी शिवरायांना आदर्श मानतो व त्यांच्यासारखे गुण आत्मसात करून भारतमातेच्या सेवा करू इच्छितो असेही ते म्हणाले होते. त्यामुळे एखाद्या लेखकाला किंवा व्यक्तीला काय वाटतं यात मोदींजींचा मुळात दोष नाही. तरीही चिखलफेक मात्र त्यांच्यावरच होतेय, हे काही योग्य नाही. तथापि, या पुस्तकाच्या निमित्ताने आपण महापुरुषांप्रमाणे होण्याच्या केवळ गप्पाच मारू शकतो किंवा माराव्यात हेच अपेक्षित कार्यच की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. सलूनवर गेल्यावर न्हाव्याला विशिष्ट कट करायला सांगायचा, पुतळे उभारायचे, विद्यापीठांना नावं देण्यासाठी भांडण करायची, पुतळे कापून पळवायचे, शाइफेक करायची, नाव ठेवायची, गाडीवर फोटो लावायचे, खंडण्या गोळा करून मिरवणुका काढायच्या वगैरे वगैरे अनेक दृढ पद्धती आज अवतरल्या आहेत, ज्याद्वारे आपल्याला आपल्या आदर्श व्यक्तीसारखे होता येते. त्या व्यक्तीच्या गुणांना, कर्तृत्वाला, कर्माला काही स्थान नाही व ते आत्मसातही कुणी करायचे नाहीत. ...

संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान...

इमेज
संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान... 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचा विषय होता, 'संत साहित्य व बुवाबाजी'. प्रत्येकवेळी चिकित्सा व चर्चा या हिंदू संस्कृतीशी संबंधित विषयांवरच का? बायबल आणि कुराण बद्दल चर्चा व परिसंवाद घेण्याचे तथाकथित पुरोगामी साहित्यिक व आयोजकांकडे नाही का? आपल्या उदार अंतःकरणाने कधीतरी मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांचाही विचार करावा म्हणतो. शेवटी तीही माणसंच. बिचारी कोणी फतवा काढला की लगेच दगड हाती घेतात आणि समाजसेवेचे ढोंग घे म्हंटल्यावर लगेच मदर तेरेसा होतात. वास्तवदर्शी जीवन महात्म्य आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन भारतमातेच्या सर्व लेकरांना देण्यासाठी कधी तसदी घेणार की नाहीत ही भुरटी माणसं? कुणी मदरश्यात आधुनिक शिक्षण व विज्ञान तंत्रज्ञान शिकवू म्हंटले तर त्यालाही विरोध करायचा आणि आपणहूनही काही प्रयत्न करायचे नाही. मग या भुरट्या पुरोगाम्यांना भारतातील मुसलमानास काय फक्त आतंकवादीच करायचे आहे का? मुसलमानांच्या पोराने केवळ बंदूक आणि दगडच हाती घ्यायचे आणि आपला मात्र उद्देश साधून घ्यायचा असा तर या विचारवंतांचा उद्देश नाही ना? तीन त...

फडणवीसांच्या निमित्याने...

इमेज
महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ अजून स्थापन होईना. आढावा बैठका घेण्यापलिकडे आणि स्थगिती देण्यापलिकडे मुख्यमंत्री महोदयांच्या हाती काही राहिलेले नाही. अश्या अस्ताव्यस्त व राज्य राम भरोसे सुरू असताना विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याची भाजपला मोठी संधी आहे. अश्या स्थितीचा फायदा घ्यायचा सोडून भाजपवाले करताय काय? असा प्रश्न माझ्यासोबत अनेकांना नक्कीच पडत असणार. याचे उत्तर फडणवीसांनी झी 24 तास वर झालेल्या मुलाखतीतून दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची दैना झालेली असताना या संधीचा फायदा घ्यायचे सोडून (मग्रूर, अहंकारी, सत्तापिपासू?) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही सरकारला वेळ द्यायला तयार आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला विधानसभेत वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांनी लवकर मंत्रिमंडळ स्थापन करून राज्याचा गाडा हकण्यास सुरुवात करावी. मग मी तोफ डागणार.  फडणवीस अगदी कसेही असले आणि त्यांच्या विषयी कोणी काहीही विचार करत असले तरी त्यांनी जी राजकीय नैतिकता दाखवली आहे, ती राजकारणात उतरू पाहणाऱ्या नवख्या पिढीसाठी नैतिकतेचे चांगले उदाहरण आहे. "धटाशी ध...

सरकारला वावडं भाजपचं की विकासाचं?

इमेज
सरकारला वावडं भाजपचं की विकासाचं? सत्तांतर झाल्यावर नवे सत्ताधीश काय करतात? आधीच्या सरकारने पाडलेले पायंडे, चालीरीती, धोरणं, कायदे आदी गोष्टी बदलतात. देशात आजवर हे होत आले आहे. पण राज्यात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र भाजपने सुरू केलेले प्रकल्पच बंद करत आहे किंवा त्यांचा तसा मनोदय दिसत आहे. ज्या प्रकल्प व कामामुळे आधीच्या सरकारची ओळख तयार होत असते व ती सत्तेत नसतानाही कायम राहते अश्या प्रकल्पांवर नव्या सरकारची तोफ डागली जाते. निवडणुकीच्या तोंडावर हेच प्रकल्प त्या त्या सरकारने केलेल्या कामाच्या यादीत समाविष्ट होतात. त्यामुळे विद्यमान सरकारने पूर्वीच्या सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पाना बंद करण्याचा धडाका लावला असावा. 2014 मध्ये भाजप सत्तेत आला तेव्हा भाजपनेही काँग्रेस ने सुरू केलेल्या योजनांमध्ये बदल केले. अनेक योजनांचे नाव बदलले. पण योजना थांबवल्या नाही. किंबहुना पूर्वीपेक्षा अधिक निधी देऊन त्यांना अधिक विकासाभिमुख केल्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र भाजपने सुरू केलेले मोठे महत्वकांक्षी प्रकल्प रद्दबातल ठरवत आहे. या प्रकल्पांसाठी अन्य देशांसोबत केलेले...

कसे झाले? कोणी केले?

इमेज
कसे झाले? कोणी केले? #अन्वयार्थ 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' हा नारा घेऊन भाजपाने २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली असताना राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शपथ घेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्याला न भूतो साक्षात सेनेचे रिमोट कंट्रोल मुख्यमंत्र्याच्या रुपात मिळाले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्या आहेत. आणि या सगळ्यात मिडिया व समाज माध्यमांचा वापार किती प्रभावी ठरावी ठरू शकतो हे या सर्व घडामोडीने सिद्ध केले आहे. पाच वर्ष निष्पक्षपणे व सचोटीने काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल वातावरण असताना अवकाळी पावसाबरोबरच अचानक राजकीय वारे काय बदलतात आणि नंतर नाट्यमय घडामोडी घडत विरोधी पक्षात भाजप तर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार काय स्थापन होते. हे सारे अजब वाटत असले तरी वास्तव आहे. वाटायला हे सारं एखाद्या गोष्टीप्रमाणे असले तरी या स्टोरीचा टर्निंग पॉईंट ठरला शरद पवारांचे पावसातील भाषण. शरद पवारांच्या पावसातील भाषणानंतर समाज माध्यमात पवारांना प्रचंड सहानुभूती मिळाली. सहानुभूती म्हणजे हतबल लढवय्याकडील शेवटचा पर्या...

‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’

इमेज
‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’ स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा काल स्मृतिदिन होता. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त्य त्यांच्या स्मृतीस्थळावर अनेक राजकीय लोकांनी भाऊगर्दी केली आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब आयुष्यभर लढले ते सारे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमले  होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य होते. कसले आहे हे हास्य? कसला आहे हा आनंद? आम्ही बाळासाहेब यांना हयात असताना पराभूत करू शकलो नाही, पण केवळ एका वाघाच्या डोक्यात अहंकाराचे बीज तयार झाल्याने अख्ख्या शिवसेनेला सुरुंग लागत असल्याचे दिसत असल्यामुळे हा आनंद? त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे या विदृपतेने काळवंडलेले आहे. शिवसेना स्थापन होईपर्यंत राज्यात काँग्रेसचेच एकशाही राज्य होते. कानाकोपऱ्यात त्यांच्या मतपेढ्या तयार झाल्या होत्या. पण एका प्रस्थापित सत्तेविरुद्ध स्व. बाळासाहेबांच्या रूपाने मोठा लढा उभा राहिला. त्यात सर्वात आधी मुंबईतील मराठी माणसाचे शिवसेनेने मन जिंकले. मुंबई महानगरपालिका पासून सुरू झालेला शिवसेनेचा विजयरथ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि विधा...