पोस्ट्स

कसे झाले? कोणी केले?

इमेज
कसे झाले? कोणी केले? #अन्वयार्थ 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' हा नारा घेऊन भाजपाने २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली असताना राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री शपथ घेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्याला न भूतो साक्षात सेनेचे रिमोट कंट्रोल मुख्यमंत्र्याच्या रुपात मिळाले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडून गेल्या आहेत. आणि या सगळ्यात मिडिया व समाज माध्यमांचा वापार किती प्रभावी ठरावी ठरू शकतो हे या सर्व घडामोडीने सिद्ध केले आहे. पाच वर्ष निष्पक्षपणे व सचोटीने काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल वातावरण असताना अवकाळी पावसाबरोबरच अचानक राजकीय वारे काय बदलतात आणि नंतर नाट्यमय घडामोडी घडत विरोधी पक्षात भाजप तर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार काय स्थापन होते. हे सारे अजब वाटत असले तरी वास्तव आहे. वाटायला हे सारं एखाद्या गोष्टीप्रमाणे असले तरी या स्टोरीचा टर्निंग पॉईंट ठरला शरद पवारांचे पावसातील भाषण. शरद पवारांच्या पावसातील भाषणानंतर समाज माध्यमात पवारांना प्रचंड सहानुभूती मिळाली. सहानुभूती म्हणजे हतबल लढवय्याकडील शेवटचा पर्या...

‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’

इमेज
‘स्वाभिमान’ आणि ‘शहाणपण’ स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा काल स्मृतिदिन होता. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त्य त्यांच्या स्मृतीस्थळावर अनेक राजकीय लोकांनी भाऊगर्दी केली आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला, ज्यांच्या विरोधात बाळासाहेब आयुष्यभर लढले ते सारे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमले  होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य होते. कसले आहे हे हास्य? कसला आहे हा आनंद? आम्ही बाळासाहेब यांना हयात असताना पराभूत करू शकलो नाही, पण केवळ एका वाघाच्या डोक्यात अहंकाराचे बीज तयार झाल्याने अख्ख्या शिवसेनेला सुरुंग लागत असल्याचे दिसत असल्यामुळे हा आनंद? त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे या विदृपतेने काळवंडलेले आहे. शिवसेना स्थापन होईपर्यंत राज्यात काँग्रेसचेच एकशाही राज्य होते. कानाकोपऱ्यात त्यांच्या मतपेढ्या तयार झाल्या होत्या. पण एका प्रस्थापित सत्तेविरुद्ध स्व. बाळासाहेबांच्या रूपाने मोठा लढा उभा राहिला. त्यात सर्वात आधी मुंबईतील मराठी माणसाचे शिवसेनेने मन जिंकले. मुंबई महानगरपालिका पासून सुरू झालेला शिवसेनेचा विजयरथ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि विधा...

डॉ. केशव बळीराम हेडगेवार

इमेज
डॉ. केशव बळीराम हेडगेवार "हिंदू समाजाचे सुख दुःख हेच माझे व माझ्या कुटुंबाचे सुख दुःख आहे. हिंदूंवरील संकट हे माझ्यावरील संकट आहे. हिंदूंचा अपमान हा माझा व माझ्या परिवाराचा अपमान आहे. अशी वृत्ती जेव्हा हिंदू समाजात निर्माण होणे हाच राष्ट्रधर्मचा मूलमंत्र आहे" हा विचार ज्यांनी रुजवला ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार; म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या अराजकीय संघटनेचे संस्थापक. 1925 आली ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे रोप लावले त्याचा वटवृक्ष आज झालेला असून जगभरात 53 देशात संघाचे अविरत कार्य सुरू आहे. त्यांचा जन्म 1889 मध्ये महाराष्ट्रातील कुंदकुर्ती गावात झाला. वैद्यक शास्त्राचे (MBBS) त्यांचे शिक्षण झाले असूनही संपूर्ण आयुष्य त्यांनी देश व समाज यासाठीच खर्ची घातले. भारतातील बहुसंख्य हिंदू समाज जर स्वसंरक्षणक्षम झाला तर देशावर पुन्हा परकीयांची सत्ताच येऊ शकणार नाही असा त्यांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी देशातील समस्त हिंदूंना आपापसातील भेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. कलकत्त्यातील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले एमबीबीएसच...

नथुरामचे राजकारण

इमेज
नथुरामचे राजकारण नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतर देशातील पहिला आतंकवादी किंबहुना हिंदू आतंकवादी होता असे वक्तव्य करून मक्कल निधी अय्यपन पक्ष प्रमुख व सिनेअभिनेता कमल हसन ने स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात तो यशस्वी ठरला. कालपर्यंत ज्याला कोणी ओळखत नव्हते त्या कमल हसन ला नथुराम गोडसेने सुपरहिट केले. त्यासाठी गांधींना मात्र मरावं लागलं. कारण गांधींचा मृत्यू झाला नसता तर आज हसन प्रमाणे काँग्रेसवाल्या गांधी परिवारालाही आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेता आल्या नसत्या. त्यामुळे महात्मा गांधीं म्हणजे काँग्रेससाठी जणू अक्षय्य ऊर्जेचा स्रोत बनून राहिले आहेत. त्यात आज नथुराम गोडसे यांचाही वापर सुरू झाल्याचे दिसत आहे. भाषण ऐकण्यासाठी समोर जमलेल्या मुस्लिम जमावात 'हिंदू आतंकवाद' हा शब्द फेकणे हसनला आवश्यक होते. त्यासाठी त्याने नथुराम गोडसे चा योग्य तो वापर करून घेतला. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आज-काल राजकारणामध्ये खळबळ माजवणारे किंवा संवेदनशील वक्तव्य करणे म्हणजे राजकीय धारिष्ट्याचे काम समजले जाते. हसनने तेच केले आहे व त्यात तो यशस्वी ठरला आहे. आपण केलेले वक्तव्य...

त्यागसूर्य सावरकर...

इमेज
त्यागसूर्य सावरकर... घराची परिस्थिती इतकी वाईट नसतानाही इंग्रजांच्या राजवटीत देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी केली. ज्या वयात भविष्याची स्वप्ने रंगवली जातात व मौज मजा केली जाते, त्या वयात शत्रूला "मारता मारता मरे तो झुंजेन" अशी प्रतिज्ञा केली व ती सार्थकी ठरवली सुद्धा. नुकतंच लग्न झालेलं असताना नववधू पत्नीचा व घरातल्या सर्वच प्रेमीजनांचा निरोप घेऊन देशासाठी (नाव शिक्षणाचे, पण गेले होते क्रांतिकार्यासाठीच) इंग्लंडला रवाना झाले. पत्नीच्या एका पत्राला सावरकर उत्तर देतात, "आपल्या एकट्याच्या संसाराचं काय घेऊन बसलीस, आज भलेही आपल्याला आपल्या सुखावर पाणी सोडावं लागतंय; पण आपल्या त्यागामुळे उद्या देशातील लाखो कुटुंबे स्वतंत्र भारतात सुखाचा श्वास घेऊ शकतील. त्याचं काय?" असा उदात्त हेतू बाळगून केवळ देशासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या संसारावर या पती पत्नीने तुळशीपत्र ठेवलं. सावरकर विदेशात असतानाच त्यांचा मुलगा प्रभाकर याचा बालपणीच दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या क्षणी त्यांचा पत्नीला आधार हवा होता, त्या क्षणी ते फक्त पत्र लिहून तिचं सांत्वन कर...

सत्तेच्या झोपाळ्यात बसणार का राज?

इमेज
सत्तेच्या झोपाळ्यात बसणार का राज?       लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शाह, ममता बॅनर्जी, साध्वी प्रज्ञा, केजरीवाल व प्रियांका गांधीसह अजून काही नावे सदासर्वकाळ चर्चेत होती. राज्यात देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, अजित पवार, उद्धव ठाकरे अश्या दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत होती. पण यासोबतच राज्यात एक नाव पुन्हा चर्चेत आलं ते म्हणजे 'राज ठाकरे'.        राज ठाकरे यांचे लोकसभेत अस्तित्व शून्य, तर विधानसभेतही शून्यच. अनेक पालिकांमध्ये असलेल्या त्यांच्या सदस्यांनीही पक्षांतर करून पक्षाला रामराम ठोकलेला आहे. २००९-१० मध्ये विधान सभा निवडणुकांत त्यांचे ११ आमदार निवडून आले होते आणि आता इथून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहील अशी मतं राजकीय ज्योतिष्यांनी वर्तवली होती. परंतु जन्मजात ज्योतिषीच चुकतो असे नाही, तर पुरोगामी व उच्च शिक्षित इंग्रजीत भविष्य वर्तवणारे तथाकथित राजकीय भविष्यकारही तोंडावर आपटले, जेव्हा २०१४ च्या विधानसभेत मनसेची पीछेहाट झाली. २००९ च्या आपल्या भविष्यवाणीस अनेकांनी संभाळण्याचा ...

अण्णाभाऊंचा रशिया प्रवास

इमेज
अण्णाभाऊंचा रशिया प्रवास माझा रशियाचा प्रवास या पुस्तकाच्या माडग्यामातून अण्णाभाऊंनी आपले रशियातील प्रवास वर्णन मांडले आहे. वाचकाला अण्णाभाऊ सहजगत्या रशियात त्यांच्या समवेत घेऊन जातात. मॉस्को, लेनिनग्राड, ताश्कंद या शहराची ओळख वाचताना होते. अण्णाभाऊंनी या पुस्तकात या सर्व शहरांची, तेथील पोकांची, तेथील राज्यव्यवस्थेची व समाजव्यवस्थेचा ममोकले पणाने स्तुती केलेली दिसून येते. साम्यवादाने अण्णाभाऊ प्रभावित झाले असल्याने व लेनिनसम साम्यवादी नेत्यांची चरित्रे वाचल्याने त्यांना लेनिनचा रशिया पाहण्याची प्रचंड उत्सुकता लागून होती हे ते पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगतात. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिव छत्रपती वाचल्यानंतर किंवा जाणता राजा वाचल्यानन्तर एखाद्या शिवभक्ताला जशी रायगडाची प्रचंड ओढ लागते तशी ओढ अण्णाभाऊंना रशियाची लागली होती. रशिया विषयी वाचन करताना अण्णाभाऊंनी आपल्या समरतीत जो रशिया निर्माण केला होता त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी ते उतावीळ झाले होते.  1961 मध्ये अण्णाभाऊंच्या फकिरा या कादंबरीला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. याच वेळी अण्णाभाऊंनी रशियाला जावं अ...