पोस्ट्स

अॅट्रोसिटीची साफसफाई!

इमेज
अॅट्रोसिटीची साफसफाई!      २० मार्चला सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रोसीटीज कायद्यासंबंधी काही महत्वपुर्ण मार्गदर्शक तत्वे जाहिर केली. सरकारी कर्मचा-यांविरुद्ध अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा- १९८९ (अॅट्रोसिटी) चा दुरुपयोग थांबवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहिर केली. यामुळे एखाद्या सरकारी कर्मचा-यावर या कायद्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यास तात्काळ अटक करता येणार नाही. अटकेपुर्वी सखोल तपास केला जाईल, संबंधित व्यक्तीच्या वरीष्ठ अधिका-याची लेखी परवानगी लागेल व जामिनही मिळु शकेल असा बदल करण्यात आलाय. सामान्य नागरीक असल्यास अटकेसाठी वरीष्ठ जिल्हा पोलीस अधिक्षकाची लेखी परवानगी लागेल. यात वावगे तसे काही नाही. या कायद्याचा गैरवापर वाढत होता व त्यास वेसण घालणे जरुरीचे होते. तेच मा. न्यायालयाने केले आहे. अॅट्रोसिटीज कायद्याचा वाढता दुरुपयोग पाहता मा. न्यायालयास तसा विचार करावा लागला ही तर सरकारसाठीही शरमेची बाब ठरावी. ज्या सुधारणा कायदेमंडळाने करावयास पाहिजे त्या न्यायालयास कराव्या लागत आहेत. जी बाब न्यायालयाच्या लक्षात येते ती सरका...

गुढीपाडवा, नववर्ष अख्या जगात हर्ष!

इमेज
*गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारताबाहेरही साजरी होतो!* चैत्र महिन्याचा पहिला दिवस, नव्या वर्षाची सुरुवात, यालाच चैत्रपाडवा किंवा गुढीपाडवा असे म्हणतात. जेव्...

भारताच्या इतिहासातील स्त्रीयांचे स्थान!

इमेज
* भारताच्या इतिहासातील स्त्रीयांचे स्थान! *     विचारांची उदात्तता सिध्द करण्याच्या प्रयत्नात अनेकदा भारतिय संस्कृतीवर टिकेची झोड उठवली जाते. पण भारताच्या इतिहासात स...

छिंदम ते कोकाटे व्हाया संघ?

         छिंदम ते कोकाटे व्हाया संघ?      काही दिवसांपुर्वी छिंदम नावाच्या व्यक्तीने शिवरायांविषयी अपशब्द वापरुन त्यांचा अवमान केला. त्याचे निश्चितच क्रोधयुक्त दु:ख आ...

ओवेसींचा प्रोपगंडा

इमेज
     एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तुच्या गुणधर्मानुसार त्याला लोक योग्य ती ओळख लावतात. जसे की, आज बाजारात एखादी खराब गुणवत्तेची (नो गॅरंटीवाली) वस्तु विक्रीस आली तर लोकं त्याला 'मेड इन चायना' बनवुन टाकतात. चपटे नाक, बारीक डोळे असलेल्या मित्राला चेष्टेने का होईना पोरं 'चायना' म्हणुन चिडवतात. एखाद्या चटकन रागावणा-या उष्ण स्वभावी मुख्याध्यापकास पोरं 'हिटलर' म्हणुन संबोधतात. ह्या सर्व दाखल्यांमधील विशेषणे त्या व्यक्तीच्या गुणांमुळे व वागणुकीमुळे मिळालेली आहेत. पण तरीही त्या त्या व्यक्तींना ती विशेषणे कधीच पचनीय नसतातच. जशी ओवेशी महाशयांना झाली.     काल परवा आपल्या ओवेसी महाशयांनी अजबच वक्तव्य केले. काय तर म्हणे "आम्हाला पाकिस्तानी म्हणना-यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी. त्यासाठी संबंधित व्यक्तीला ३ वर्षांपर्यंतची पोलीस कोठडी व्हावी" असे त्यांचे म्हणणे होते. यावर ओवेसी महाशयांना पाकिस्तानचा फार काही द्वेष आहे किंवा ते फार भारतभक्त आहेत असेही नाही. पाकिस्तानला दोन-चार शिव्या ठोकल्या की भारतातले पार्ट टाईम देशभक्त लगेच हुरळून जातात हे ओवेसींना चांगलं ठ...