ओवेसींचा प्रोपगंडा

     एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तुच्या गुणधर्मानुसार त्याला लोक योग्य ती ओळख लावतात. जसे की, आज बाजारात एखादी खराब गुणवत्तेची (नो गॅरंटीवाली) वस्तु विक्रीस आली तर लोकं त्याला 'मेड इन चायना' बनवुन टाकतात. चपटे नाक, बारीक डोळे असलेल्या मित्राला चेष्टेने का होईना पोरं 'चायना' म्हणुन चिडवतात. एखाद्या चटकन रागावणा-या उष्ण स्वभावी मुख्याध्यापकास पोरं 'हिटलर' म्हणुन संबोधतात. ह्या सर्व दाखल्यांमधील विशेषणे त्या व्यक्तीच्या गुणांमुळे व वागणुकीमुळे मिळालेली आहेत. पण तरीही त्या त्या व्यक्तींना ती विशेषणे कधीच पचनीय नसतातच. जशी ओवेशी महाशयांना झाली.

    काल परवा आपल्या ओवेसी महाशयांनी अजबच वक्तव्य केले. काय तर म्हणे "आम्हाला पाकिस्तानी म्हणना-यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी. त्यासाठी संबंधित व्यक्तीला ३ वर्षांपर्यंतची पोलीस कोठडी व्हावी" असे त्यांचे म्हणणे होते. यावर ओवेसी महाशयांना पाकिस्तानचा फार काही द्वेष आहे किंवा ते फार भारतभक्त आहेत असेही नाही. पाकिस्तानला दोन-चार शिव्या ठोकल्या की भारतातले पार्ट टाईम देशभक्त लगेच हुरळून जातात हे ओवेसींना चांगलं ठाऊक आहे. त्यांच्या भडकाऊ भाषणांनी खवळलेले भारतीय पाकिस्तानचा पानउतारा केल्यावर शांत होतात असा त्यांचा समज असावा. हाच खरा प्रोपगंडा आहे. त्यांचे हेच वैचारीक डावपेच (प्रोपगंडा) मिडीयावरील डिबेटमध्ये युक्तीवाद करताना जास्त फायदेशिर ठरतात. कारण न्युज चॅनल्सवर होणा-या डिबेटमध्ये पाकिस्तानच्या मुद्द्यावर विरोधक त्यांना घेरतात तेव्हा अश्या केलेल्या वक्तव्यांचे पळवाट म्हणुन सहाय्य घेता येते. असो... 'भारतमाता की जय' व 'वंदे मातरम्' म्हणण्यास खुले आम विरोध करणा-यांची देशभक्ती काय आहे ती अख्ख्या हिंदूस्थानाने पाहिलेली आहे. मुळात पाकिस्तानचा द्वेष केल्यामुळे किंवा पाकिस्तानला चार चौघात शिव्या दिल्यामुळे देशभक्ती सिद्ध होत नाही. तेव्हा ओवेसींच्या वक्तव्यामुळे तथाकथीत सेक्युलरांनी फार आनंदोत्सव करण्याचे काही कारण नाही.

    पाकिस्तानच्या रहिवाश्यांना पाकिस्तानबाहेर स्वत:ची ओळख पाकिस्तानी सांगताना शरम वाटते. कारण तसे उद्योगच पाकिस्तानमध्ये चालू असतात. पाकिस्तानची ओळख आतंकीस्तान झालीय ती त्यामुळेच. अखंड भारत राहिला असता तर आजच्या भारताप्रमाणेच पाकिस्तानमधील बलोचप्रांत, सिंध प्रांत, पंजाब प्रांत, सिंधूप्रदेश सुजलाम सुफलाम झाला असता. असा पश्चात्ताप दररोज पाकिस्तानी नागरिकांच्या मनास बोचत असतो. म्हणुनच पाकिस्तानच्या न्युज चॅनल्सवर भारताची स्तुती होत असते. नरेंद्र मोदींच्या कामाचा त्यांना हेवा वाटत असतो. बलुचि नागरिक पाकिस्तानपासुन मुक्त होण्यासाठी रस्त्यावर उतरतात.  अमेरिकेत व इंग्लंडमध्ये पाकिस्तान विरोधात निदर्शने करतात. स्वत: पाकिस्तानी असलेले लेखक तारक फतेह पाकिस्तानास शिव्या घालुन भारताचे तोंडभरुन कौतुक करतात. इतकेच काय तर बलुची नेते भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानपासुन स्वतंत्र होण्यासाठी विनवणी करतात. तेव्हा जर पाकिस्तानी नागरीकांना स्वत:च्या देशाबद्दल आत्मियता नसेल तर ओवेसी महाशयांची काय कथा? जगात ज्याची ओळख दरिद्री, लफडेबाज व आतंकीस्तान म्हणुन झालीय, त्या देशाची लेबल लावुन हिंडायला कोणाला आवडेल. पाकिस्तानऐवजी दुस-या कुठल्या देशाचा रस्ता दाखवला असता तर कदाचित ते राग गिळु तरी शकले असते. म्हणुनच अश्या दळभद्री पाकिस्तानची उपमा त्यांना नकोशी वाटत असेल.

    सोशल मिडियावर काश्मीरमधील फुटीरतावादी असो किंवा अबू आझमी व ओवेसीसारखे इतर मुस्लीम नेते असो. या लोकांच्या धर्मांध, भडकाऊ व हिंदूद्वेषी वक्तव्यांचा समाचार घेताना बरीच मंडळी त्यांना सरळ पाकिस्तानी संबोधतात किंवा पाकिस्तानात निघुन जाण्याचा रस्ता दाखवतात. यात गैर असे काही वाटत नाही. आज वर्तमानातील टोकाच्या सांप्रदायिकतेला व धार्मिक वादविवादांना हीच मंडळी कारणीभूत आहे. सभा-भाषणांमध्ये भडकाऊ विधाने करुन, हिंदूंची निंदा नालस्ती करुन, हिंदू देवतांची टिंगल करुन देशातील बहुसंख्य वर्गाला खुले आव्हान या लोकांकडून करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. स्वत: सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात फिरायचं आणि सामान्य माणसाला विखारी भाषणं देऊन भडकवायचं आणि दंगली भडकल्या की पुन्हा अल्पसंख्य भारतात असुरक्षित असल्याची बोंब करायची आणि दर्शवायचं की आम्हीच जणु मुसलमानांचे कैवारी. हे या ओवेसीसारख्या मंडळींचे उद्योग काही नवे नाही. हाच असतो प्रोपगंडा.

    भारत पाकिस्तान फाळणीस कारणीभूत असल्यामुळे 'महंमद अली जीना' म्हणजे 'पाकिस्तान' असे समीकरण तयार झाले. ओवेसींप्रमाणेच त्यांनीही भारतीयांचे हिंदू-मुस्लीम असे धृवीकरण केले होते. याच धृवीकरणाचे फलित भारत-पाक फाळणी होती. ओवेसी तसेच धोरण आज राबवत आहे. जीनांसारखेच देश तोडण्याची भाषा करणारे विखारी बोल त्यांचे असतात. देशातील बहुसंख्य हिंदूंना सरळ सरळ निशाणा बणवतात. त्यामुळे 'पाकिस्तान म्हणजेच महंमद अली जीन्ना' या समीकरणात ओवेसी नामक व्यक्तीची अजुन एक भर पडली. याला जबाबदार स्वत: ओवेसीच नाहीत का? कारण बोलणा-यांची ती तर प्रतिक्रिया असते. तुम्ही जसे वागणार तश्या तुम्हाला प्रतिक्रिया मिळतात. पण ओवेसी चातुर्याने आपल्यासमवेत सर्व मुस्लीम नागरीकांना घुसळण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानी संबोधणारे किंवा पाकिस्तानात हाकलण्याची भाषा करणारे लोक सर्व मुसलमानांना उद्देशुन बोलतात असे दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कारण असे केल्यामुळेच त्यांना 'भारतीयांच्या मनातील मुस्लीम द्वेष' उघड करण्याचा युक्तीवाद करण्याची संधी मिळते आणि त्यांनी ती केलीच. पण यात काही तथ्य नाही हे ए.पी.जे. अब्दुल कलाम, शहीद अब्दुल हमीद, हमीद दलवाई, बिस्मिल्ला खान, शाहनवाज हुसैन, मुख्तार अब्बास नक्वी यांसारखे बरीच उदाहरणे देता येतिल ज्यांचा भारतीय अभिमानाने गौरव करतात. या लोकांचा धर्म जरी इस्लाम असला तरी कुण्या एकाही भारतीयाने त्यांना 'पाकिस्तानी' म्हणुन संबोधले नाही. यावरुन हे सिद्ध होते की लोक समोरच्या व्यक्तीच्या गुणांना व वागणुकीला पाहुन प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे मिस्टर ओवेसींचा युक्तीवाद किती भोंगळ आहे हे लक्षात येते.

    पाकिस्तानचा शब्दश: अर्थ जरी 'पवित्र स्थान' होत असला तरी भारतीयांना त्या अर्थाशी काही एक देणंघेणं नाही. पाकिस्तान म्हणजे भारतविरोधी कारवाया करणा-या व आतंकवाद्यांचे नंदनवन करुन देत असलेला भू-प्रदेश म्हणुन पाहिले जाते. कारण पाकिस्तानच्या पवित्र असण्याचा भारताला एक शेजारी म्हणुन काडीचाही उपयोग झालेला नाही. उलट पाकिस्तान भारतासाठी गेल्या ७० वर्षापासुन नंबर एकचा शत्रु बणुन राहिला आहे. म्हणुन आतंकवादी व जिहादी पैदा घालणारा देश म्हणजे पाकिस्तान अशी सर्व भारतीयांची समजुत झाली आहे. तेव्हा भारतात जर कुणी जिहाद पुकारत असेल, देश तोडण्याची भाषा करत असेल, अल्पसंख्यक व बहुसंख्यक यांच्यात वाद पेटवत असेल आणि इतर धर्मीयांच्या आदर्शांची, प्रार्थना स्थळांची व   देव-देवतांची विटंबना करत असेल, तर त्यांना पाकिस्तानी म्हणुनच संबोधने हे त्यांच्या गुणकर्मामुळेच आहे.

    ओवेसींच्या या प्रपोगंडीक युक्तीवादाचे उत्तर जम्मु काश्मीरच्याच एका विधानसभा सदस्याने देऊन टाकले. "मुसलमान पाकिस्तानविरोधी एक अवाक्षरसुद्धा सहन करु शकणार नाही" असे ते महाशय बरळले. मुहम्मद अकबर लोन नामक या पाकप्रेमी आमदाराने चक्क विधानभवनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणाही दिल्या. आता ओवेसींच्या दृष्टीतील मुसलमान व मुहम्मद अकबर लोन याच्या दृष्टीकील मुसलमान कोणता? हे त्यांनीच स्पष्ट केलेले बरे. परंतु या अशा प्रवृत्तींना भारतीय म्हणवण्यात कुणाला आवडणार आहे? मुहम्मद लोनने जर खरच मुस्लीमांची बदनामी केली असेल तर त्यांच्या किती व कोणत्या संघटना लोनविरोधात रस्त्यावर उतरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

    तथापी 'पाकिस्तानी' संबोधने केवळ ओवेसी, मुफ्ती नासीर- उल-इस्लाम व मुहम्मद लोनसारख्या पोटात काही व ओठात काही असणा-या लोकांपुरते मर्यादित असणे योग्य. यात सरसकट सर्व मुस्लीम जनतेस भरडणे योग्य नाही. कारण 'ओवेसी किंवा लोन म्हणजे मुस्लीम' असे काही समीकरण अजुनपर्यंत तयार झालेले नसावे अशी तुर्तास आशा बाळगुया.

©कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान