गुढीपाडवा, नववर्ष अख्या जगात हर्ष!

*गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारताबाहेरही साजरी होतो!*

चैत्र महिन्याचा पहिला दिवस, नव्या वर्षाची सुरुवात, यालाच चैत्रपाडवा किंवा गुढीपाडवा असे म्हणतात. जेव्हा जेव्हा भारतातील वीर योध्यांनी महापराक्रम गाजवीला तेव्हा तेव्हा त्या शुरवीरांचे स्वागत गुढ्या व तोरणे तसेच पताका लावुन केले जाई.

प्रभू श्रीराम रावणास युद्धात पराभूत करुन परतले तो क्षण असेल किंवा शक कुशाणांवर विजय प्राप्त करणारे गौतमीपुत्र सातकर्णी असतिल. विजय नगरचे हिंदू साम्राज्य उभारणारे व यवनांची ससेहोलपट करणारे हरिहर व बुक्क देवराय असतिल किंवा यवन, पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्दी, पठाण यासारख्या शत्रुंची गर्दन छाटून भगवे हिंदू साम्राज्य उभारणारे छत्रपती शिवराय असतिल. या सर्व नरवीरांचा पराक्रम व पराक्रमाचा आनंदोत्सव गुढ्या तोरणे उभारुन साजरी केला गेला हे सर्वश्रुत आहेच.

ज्या हिंदूवीराने पराक्रम गाजवला त्याने त्याच्या नावे कालगणणा सुरु करावी अशी तर जणु प्रथाच होती. परंतु हे क्षण फार दुर्मिळ. शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा सुवर्णक्षण भारतीयांना पहावयास मिळत असे. कारण नुसतेच विजयी होऊन उपयोग नाही तर आपल्या आजुबाजुच्या भव्य दिव्य प्रदेशावर एकही शत्रु शिल्लक न राहणे म्हणजे हा महापराक्रम किंवा दिग्विजय समजला जाई. यासाठी प्रदिर्घ काळ प्रतिक्षा करावी लागत असे. चक्रवर्ती सम्राट नुसते होणे महत्वाचे नव्हते तर ते प्रजेने आनंदाने स्विकारणेही तितकेच महत्वपुर्ण होते. म्हणुनच आजही शक कालगणना वापरात आहे ती गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने शकांवर केलेल्या विजयाचेच द्योतक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शिवशक ही कालगणना सुरु केली होती.

पुर्वजांचे व भारतीय गौरव इतिहासाचे विस्मरण न व्हावे म्हणुन आजही पुर्वीपार चालत आलेल्या परंपरा भारतीय आदराने जोपासत आले आहे. गुढीपाडवा हा नुतन वर्षाचा क्षण विशेषत: महाराष्ट्रात समजला जातो. कारण गौतमीपुत्र सातकर्णी हा महापराक्रमी राजा महाराष्ट्रीयन होता. भारतातील वेगवेगळ्या प्रांतात गुढीपाडव्यास वेगवेगळी नावे असली व साजरी करण्याची पद्धत वेगळी असली तरीही तो सण साजरा करण्याची पद्धत सारखीच आहे. नुतन वर्षाचे स्वागतपर हा सर्व उत्सव असतो. कर्नाटक व आंध्रात यास 'युगादी' म्हंटले जाते. राजस्थानात 'थपना', सिंध प्रांतात 'चेटिचंड', पंजाबमध्ये 'बैसाखी', तामिळनाडूत 'पुथांडू', केरळात 'विशु' संबोधले जाते. एवढेच काय तर माॅरीशस मध्येही आजचा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणुन साजरी केला जातो. बाली बेटावरील लोक व इंडोनेशियातील लोक हाच दिवस 'न्येपी' म्हणुन साजरी करतात. आज तर लाखो भारतीय नागरीक विदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे जिथे जिथे भारतीय पोहचले तिथे तिथे त्यांनी भारतीय परंपरा व सण उत्सव चिरंतर सुरु ठेवले आहेत. अश्या आपल्या संस्कृती व परंपरां सर्व मानवास आनंद व उत्साह देणा-याच आहेत. त्याचा आपणा सर्वांना अभिमानच असावयास हवा!

*गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!*

©कल्पेश गजानन जोशी
Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान