कोरोनाआडून 'छि' 'थू' करणारे प्रतिगामी..

कोरोनाच्या निमित्ताने कथित पुरोगाम्यांनी पुन्हा आपले अकलेचे तारे तोडून हिंदू संस्कृतीला टीकेचे लक्ष्य केले आहे. विज्ञानाचा आणि शास्त्राचा एरवी दुरदूरपर्यंत संबंध नसणाऱ्या इस्लामिक व ख्रिश्चन तत्वज्ञानाला चुकूनही विरोध न करणाऱ्या पुरोगाम्यांमध्ये केवळ हिंदू द्वेषाची बीजे रोवली गेली आहेत हे कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. कोरोनावर आयुर्वेद, योगा किंवा वैदिक शास्त्रात काही उपचारपद्धती नाही आणि शेण गोमूत्राने कोरोना जाणार का? असे निरर्थक युक्तिवाद करून आपलाच हशा करून घेतला आहे. संजय राऊत यांच्या 'देव जेव्हा मैदान सोडतो' या अग्रलेखातून त्याचीच प्रचिती आली. या शेण गोमूत्राचं एवढं काय वावडं आहे कळत नाही. बरं या गोष्टींना विरोध करताना विज्ञानाचा आसरा घेऊन जणू आपणच शास्त्रज्ञ आहोत आणि आपणच विज्ञानाला जन्म घातला असा अविर्भाव कश्याच्या जोरावर? पुरोगाम्यांनी फादर दिब्रिटो यांना ते केवळ चर्चचे फादर आहेत म्हणून डोक्यावर घेतले. पण त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही चर्च बंद होणार नाही असे सांगून सरकारी निर्देश धुडकावून लावले. ज्यांनी डोक्यावर घेतले त्यांचेच कान फादरा...