कपडे, दर्शन व प्रदर्शन आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशातच आधुनिकतेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गावरुन भरकटले असावे असे चित्र निर्माण झाले आहे. छद्मी पुरोगामीत्व, छद्मी विज्ञानवाद, छद्मी विवेकवाद व स्वत:ला बुद्धीवादी म्हणुवुन घेणा-या ढोंगी लोकांमुळे या सर्व संकल्पना जणु आपला मुळ प्रवाह सोडून भरकटत चालल्या आहे असे वाटत आहे. याला कारणीभूत असलेल्या नुकत्याच महिनाभरात चर्चेत आलेल्या शबरीमाला मंदिर निकाल, कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराचे प्रकरण यांसारख्या घटना जरी लक्षात घेतल्या तरी लक्षात येऊ शकेल. नैतिकता आणि सदसद विवेकबुद्धी नावाचा प्रकार मानवाला मिळालेली अमुलाग्र देणगी आहे. ज्याचा वापर त्या व्यक्तीवर अवलंबुन असतो. पण हल्ली नैतिकता आणि विवेक नावाच्या गोष्टींना काही किंमतच उरलेली दिसत नाही, असे या घटनांवरून वाटू लागले आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे परिधान करुन जाण्यास विरोध दर्शवणा-या पश्चिम महाराष्ट्र देवालय समितीच्या एका निर्णयावर सध्या वादंग निर्माण झाले आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी तर समितीला चोप देण्याची भाषा वापरली. इतरवेळी दुस-यांना न्याय, ...