पोस्ट्स

मला भावलेलं पहिलं साहित्य संमेलन

इमेज
गेल्या आठवड्यात नागपुरात समरसता साहित्य संमेलन पार पडले. मीही गेलो होतो. या अगोदर अहमदनगरला 2017 मध्ये झालेल्या समरसता साहित्य संमेलनलाही मी हजेरी लावली होती. नगरला झालेल्या संमेलनात केवळ अनुभूती घ्यायला गेलो होतो. साहित्य संमेलन म्हणजे काय, हेच जाणून घ्यायचं होतं. त्या अगोदर इतर ठिकाणी काही साहित्य संमेलनासही गेलो होतो. पण त्यामुळे माझ्या मनात साहित्य विश्वाबद्दल एकप्रकारे नकारात्मकता निर्माण झाली होती.  साहित्य संमेलन म्हंटलं की तीच ती रडकी काव्य, अमक्या वरचा अन्याय, तमक्यावरील द्वेष, राजकारण केवळ ह्याच विषयांची जंत्री पाहिली होती. आपण कोणत्या काळात जगतो आहोत हाच विसर जणू पडावा असे निरुत्साही आणि नकारात्मक वातावरण दिसले म्हणजे साहित्य संमेलन अशी भावना होऊन गेली होती.  वशिलेबाजी करून निवडक व विशिष्ट नावं पुढं करायची. सांगायला तोंड वर करून सांगायचं की हे विचारांचं व्यासपीठ, पण विशिष्ट विचाराच्या लोकांनाच तिथे संधी द्यायची. काहींना खड्यासारखे बाजूला काढून फेकायचे अश्या गोष्टी अनुभवल्या होत्या. पण या वर्षी उदगीरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे थोडं स...

सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...?

इमेज
🇨🇳 "सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन..?" 🇵🇰 नागपूर येथे झालेल्या 19 व्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात कविता सादर करताना... -------------- कधी पाक कधी सार्क कधी म्हणतो माझा इराक  ट्रम्प मोदी वाईट तुला गोड होतो जुना बराक सरड्यासारखे रंग तुझे कितीदा बदलशीन सांग चीन सांग पाकीस्तानसोबत निकाह कधी करशिन?......१  कधी कधी तुला लागती ओबोरचे डव्हाळे पाकसोबत ग्वादारमधी करतो येडेचाळे जरा लपुन जरा छपुन जग सारं पाहतं पाकिस्तान अन् तुयं लफडं कुठी कुठी चालतं नकट्या नाकाचा तोरा तुह्या किती दावशिन सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशीन...? ........२ चीन तुह्या प्रेमिकेले भारतानं छेडलं मोदीच्या दौ-यानी तुला रे पछाडलं खरं कारण हेच तुला चिंतांनी वेढलं म्हणुनच तू सैन्याला डोकलाममधी धाडलं सांग रे सांग तू किती दिवस लपवशिन सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...? ..........३ प्रेमिका तुही भारी खरच मानलं तुला बुवा अल्ला फादर गाॅड सांग घेतल्या कुणाच्या दुवा बुरख्यामागची हसीना तिच तेवढी दिसत नाही हाफीज आहे? अझर आहे की लखवी काही कळत नाही सांग तुझ्या प्रेमीकेल...

आपली संस्कृती विकृतीकडे जाते, तेव्हा आम्ही काय करतो?

इमेज
* आपल्या संस्कृतीवर कोणी चुकीची टिप्पणी केली म्हणून आम्हाला सहन होत नाही पण, आम्ही कधी 'या' गोष्टींचा विचार करतो का? 👉🏼 'विवाहपद्धती' हा एक धार्मिक विधी आहे, पण आम्ही त्याला 'फॅमिली इव्हेंट' केला की नाही? 👉🏼विवाह विधीपेक्षा आम्ही बँड पार्टी, डीजे, अर्केस्ट्रा त्यासोबतच चमकोगिरी, पैश्याचा माज, चुलत्याची जिरवनं, हौस पूर्ण करणं यालाच महत्व देतो की नाही? 👉🏼लग्न लागताना मुहूर्ताची वेळ टाळून दोन दोन - तीन तीन तास उशिराने लग्न लावतो. का, तर वरातीत दारू पिऊन नाचणाऱ्या मित्रांच्या इच्छेसाठी. अन पुरोहिताला मात्र शॉर्टकट विधी उरकायला भाग पाडतो.  👉🏼लग्नात वरमाला घालण्याचं मोठं महत्व सांगितलं आहे. पण, वरमाला घालताना नवरदेवाचे मित्र त्याला खांद्यावर का उचलतात? हा चेष्टा मस्करीचा विषय असतो का? ही फालतुगिरी गपगुमान सहन करणारी उपस्थित पुरोहित, वयस्कर व ज्येष्ठ मंडळी याला जबाबदार आहे की नाही? 👉🏼लग्न विधी होत असताना उपस्थित मंडळी 'वर' आणि 'वधू'ला आशीर्वाद देण्यासाठी आणि ते जे सामाजिक व्रत स्वीकारत आहेत, त्यासाठीचे साक्षीदार असतात. ...

भारताचं भविष्य अग्निवीरांच्या हाती!

इमेज
मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की सरकारने सैनिकांचे निवृत्ती मर्यादा 4 वर्षावरच का आणली?  पण लक्षात घ्या.... #आतंकवाद आणि #सिव्हिलवॉर ही भविष्यातील दोन मोठी आव्हाने भारतासमोर आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी सरकारने या योजनेचा विचार केला असावा असे वाटते.  चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के जवानांचा पुढील कार्यकाळ वाढवण्यासाठी मूल्यांकन होईल आणि उर्वरित 75 टक्के जवानांना आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरीसाठी वाव असेल. तिथे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातील विविध क्षेत्रात ही देशभक्तीने ओतप्रोत, शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष माणसं जावी असाही यामागचा उद्देश असेलच.  त्यामुळे सैनिकी प्रशिक्षण घेतलेले जवान जेव्हा भारतभर ग्राऊंडवर काम करू लागतील तेव्हा आतंकवाद्यांच्या स्लीपर सेल ची वाट लावतील. शिवाय सिव्हिल वॉर चा प्रयत्न केला तर तोही हाणून पाडला जाईल.  मोदी सरकार आल्यापासून दहशतवाद्यांची मोठी गोची झालीय. त्यांना धड घुसखोरीही करता येत नाहीये की काही गतीविधींना पूर्ण करता येतंय. भारताची सीमा सुरक्षा अतिशय मजबूत झाली असल्यामुळे ...

अंगुली निर्देश (?)

इमेज
काही दिवसांपूर्वी एक विषय चर्चेत आला होता. शिवसेनेला गृहमंत्री पद हवं होतं. (अश्या चर्चा माध्यमातून समोर आल्या होत्या) पडद्याआड चर्चाही झाल्या. तेव्हा, मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद यशस्वीपणे सांभाळू शकतो अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असणार. तथापि, मिडियासमोर आमच्यात असं काहीच झालं नाही, सगळं आलबेल आहे, आणि बाहेर गृहमंत्री पदावरून निरर्थक चर्चा सुरू आहे असा सूर मुख्यमंत्र्यांचा स्पष्टीकरण करताना होता. पण..पण..पण.. आज जी घटना घडली ती जरा वेगळी आहे. तिच्यामागे वेगळे कंगोरे आहेत. आजच्या घटनेत आंदोलनात (स्वाभाविकपणे) मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री टार्गेट होऊ शकत होते. पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा अनिल परबांच्या निवासस्थानी न जाता शरद पवार यांच्या घरावरच संपकरी चालून गेले आहेत. इथे मोठं प्रश्नचिन्ह उभं होतं.  आता एक प्रश्न पडतो.  शरद पावरांसारखा नेता त्या वेळी कुठे आहे, हे आंदोलन करणार्यांना कसं माहीत झालं? पवार साहेब कधी दिल्लीला असतात, कधी बारामतीला असतात तर कधी मुंबईला असतात. कोणालाही सुगावा न लागता आंदोलनकर्ते योग्य जागी कसे पोहचतात? भरीस भर म्हणज...

राज ठाकरेंच्या मनासारखं होतंय..!

इमेज
गेल्या पंधरवाड्यापासून राज ठाकरे आणि मनसे जोरात चर्चेत आहेत. कारण ठरलं मशिदीवरच्या भोंग्याचं. मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली जाईल असा पवित्रा राज यांनी घेतला. त्याला पाहता पाहता देशभरातून विविध पक्ष, संघटनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. मुस्लिम समाजाकडून स्वाभाविकपणे विरोध झाला. पण यात गोची शिवसेनेची झाली. तथाकथित पुरोगामी म्हंटले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी वगैरे पक्षांचा खोटा सेक्युलरवादी बुरखा पुन्हा फाटला. राज यांना हेच हवे होते. भाजप मात्र राज यांच्या रडार समविचारी असल्यामुळे वरून वाचला आहे.  हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेतल्यापासून मनसेचा हा पहिलाच जोरदार प्रयत्न झाला आहे. मधल्या काळात हिंदुत्वाच्या मुद्दयावर प्रकट होण्यासारख्या बऱ्याच घटना घडल्या, त्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आल्या नाहीत. परंतु यावेळी पालिका निवडणुका समोर ठेवून मनसेने चांगली मोर्चा बांधणी केलेली दिसते. त्यातच राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेताना खूप बारकाईने विचार केला आहे. आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपच्या घोरणापेक्षा वेगळा विचा...

रामचरित्रातील 'राष्ट्रसंदेश'

इमेज
जोपर्यंत भारत आहे, तोपर्यंत राम चरित्र आपल्यासाठी संजीवनी संदेश आहे. रामचरित्र अभ्यासताना आपण कधी असा विचार केलाय का हो? रावणाच्या बेंबीतच घाव करायचा होता, रावण तेवढ्या एका कृतीने मरणार होता, तर ते काम एकट्या हनुमंतानेही करून दाखवलं असतं. सीता माईला संदेश देण्यासाठी हनुमंत लंकेत गेले तेव्हाच रावणाचा काटा काढला असता. परंतु, ज्या समाजाला रावणाने छळलं. त्रास दिला. महिलांना पीडा दिली. साधू संतांच्या हत्या केल्या. दहशत पसरवली. अन्याय, अनीतीने समाजसोबत व्यवहार केला. त्या समाजाच्या सहभागीतेतूनच श्रीरामाला रावणाचा (शत्रूचा) नाश करायचा होता. रामाला आपल्या प्रजेला स्व-संरक्षणक्षम करायचं होतं, आपल्या पायावर उभं करायचं होतं. कोणीतरी येईल आणि आपल्याला त्रासातून मुक्त करेल, हा भावच रामाला संपवायचा होता. हे राष्ट्र, ही भूमी, हा प्रदेश आपला आहे आणि त्याचं रक्षण करणं केवळ राजाची जबाबदारी नाही, तर प्रजेचीही आहे हा संस्कार रामाने प्रजेमध्ये निर्माण केला आहे.  14 वर्षाचा वनवास म्हणजे रामाला झालेली शिक्षा नव्हती. तर रामाने आपले राष्ट्र सुरक्षित, सक्षम व संघटित समाज निर्माण करण्यासाठी स्वीका...