पोस्ट्स

अंगुली निर्देश (?)

इमेज
काही दिवसांपूर्वी एक विषय चर्चेत आला होता. शिवसेनेला गृहमंत्री पद हवं होतं. (अश्या चर्चा माध्यमातून समोर आल्या होत्या) पडद्याआड चर्चाही झाल्या. तेव्हा, मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद यशस्वीपणे सांभाळू शकतो अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असणार. तथापि, मिडियासमोर आमच्यात असं काहीच झालं नाही, सगळं आलबेल आहे, आणि बाहेर गृहमंत्री पदावरून निरर्थक चर्चा सुरू आहे असा सूर मुख्यमंत्र्यांचा स्पष्टीकरण करताना होता. पण..पण..पण.. आज जी घटना घडली ती जरा वेगळी आहे. तिच्यामागे वेगळे कंगोरे आहेत. आजच्या घटनेत आंदोलनात (स्वाभाविकपणे) मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री टार्गेट होऊ शकत होते. पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा अनिल परबांच्या निवासस्थानी न जाता शरद पवार यांच्या घरावरच संपकरी चालून गेले आहेत. इथे मोठं प्रश्नचिन्ह उभं होतं.  आता एक प्रश्न पडतो.  शरद पावरांसारखा नेता त्या वेळी कुठे आहे, हे आंदोलन करणार्यांना कसं माहीत झालं? पवार साहेब कधी दिल्लीला असतात, कधी बारामतीला असतात तर कधी मुंबईला असतात. कोणालाही सुगावा न लागता आंदोलनकर्ते योग्य जागी कसे पोहचतात? भरीस भर म्हणज...

राज ठाकरेंच्या मनासारखं होतंय..!

इमेज
गेल्या पंधरवाड्यापासून राज ठाकरे आणि मनसे जोरात चर्चेत आहेत. कारण ठरलं मशिदीवरच्या भोंग्याचं. मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली जाईल असा पवित्रा राज यांनी घेतला. त्याला पाहता पाहता देशभरातून विविध पक्ष, संघटनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. मुस्लिम समाजाकडून स्वाभाविकपणे विरोध झाला. पण यात गोची शिवसेनेची झाली. तथाकथित पुरोगामी म्हंटले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी वगैरे पक्षांचा खोटा सेक्युलरवादी बुरखा पुन्हा फाटला. राज यांना हेच हवे होते. भाजप मात्र राज यांच्या रडार समविचारी असल्यामुळे वरून वाचला आहे.  हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेतल्यापासून मनसेचा हा पहिलाच जोरदार प्रयत्न झाला आहे. मधल्या काळात हिंदुत्वाच्या मुद्दयावर प्रकट होण्यासारख्या बऱ्याच घटना घडल्या, त्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आल्या नाहीत. परंतु यावेळी पालिका निवडणुका समोर ठेवून मनसेने चांगली मोर्चा बांधणी केलेली दिसते. त्यातच राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेताना खूप बारकाईने विचार केला आहे. आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपच्या घोरणापेक्षा वेगळा विचा...

रामचरित्रातील 'राष्ट्रसंदेश'

इमेज
जोपर्यंत भारत आहे, तोपर्यंत राम चरित्र आपल्यासाठी संजीवनी संदेश आहे. रामचरित्र अभ्यासताना आपण कधी असा विचार केलाय का हो? रावणाच्या बेंबीतच घाव करायचा होता, रावण तेवढ्या एका कृतीने मरणार होता, तर ते काम एकट्या हनुमंतानेही करून दाखवलं असतं. सीता माईला संदेश देण्यासाठी हनुमंत लंकेत गेले तेव्हाच रावणाचा काटा काढला असता. परंतु, ज्या समाजाला रावणाने छळलं. त्रास दिला. महिलांना पीडा दिली. साधू संतांच्या हत्या केल्या. दहशत पसरवली. अन्याय, अनीतीने समाजसोबत व्यवहार केला. त्या समाजाच्या सहभागीतेतूनच श्रीरामाला रावणाचा (शत्रूचा) नाश करायचा होता. रामाला आपल्या प्रजेला स्व-संरक्षणक्षम करायचं होतं, आपल्या पायावर उभं करायचं होतं. कोणीतरी येईल आणि आपल्याला त्रासातून मुक्त करेल, हा भावच रामाला संपवायचा होता. हे राष्ट्र, ही भूमी, हा प्रदेश आपला आहे आणि त्याचं रक्षण करणं केवळ राजाची जबाबदारी नाही, तर प्रजेचीही आहे हा संस्कार रामाने प्रजेमध्ये निर्माण केला आहे.  14 वर्षाचा वनवास म्हणजे रामाला झालेली शिक्षा नव्हती. तर रामाने आपले राष्ट्र सुरक्षित, सक्षम व संघटित समाज निर्माण करण्यासाठी स्वीका...

कावेबाज पाकिस्तानला ओळखा

इमेज
@कल्पेश जोशी, औरंगाबाद पाकिस्तानी क्रिकेट टीमने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगले प्रदर्शन करत सेमी फायनल पर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानची टीम मोठी तयारी करून मैदानात उतरली असल्याचं बोललं जात आहे, परंतु यावेळी पाकिस्तानने केवळ मैदानावरच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सायकॉलॉजीकल वॉरफेअर प्रमाणे काम सुरू केल्याचेही निदर्शनास येत आहे. म्हणजे एक टीम मैदानावर खेळत आहे तर दुसरी टीम विशेषतः सोशल मीडियावर भारतासोबत गेम खेळत आहे.  सायकॉलॉजीकल वॉरफेअर ही एखाद्या युद्धाच्या वेळी आखली जाणारी एक रणनीती आहे. ज्याद्वारे शत्रूच्या शक्तीस्थानाचे खच्चीकरण केले जाते. त्याची प्रतिमा खराब केली जाते. त्याचा (अप)प्रचार इतका करायचा की मग सामान्य माणसातही तीच चर्चा रंगते व त्यांच्याकडूनही शत्रूचे मोरल डाउन करण्यास अप्रत्यक्षपणे मदत होऊ लागते.   यंदाच्या टी20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने हेच हत्यार उपसले आहे, व त्याचा मुख्य लक्ष्य आहे भारतीय संघ आणि विराट कोहली.  आयपीएल चे सामने झाले आणि टी20 वर्ल्ड कपची चर्चा सुरू होऊ लागताच सोशल मीडियात विराट कोहलीच्या संदर्भात बऱ्याच उलटसु...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

इमेज
     निजामाची राजवट असलेल्या आणि 1947 ला स्वतंत्र न झालेल्या मराठवाड्यात आर्य समाज, हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस व सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. लोक निजामाच्या सैन्याविरुद्ध आणि रझाकारांच्या विरुद्ध बंड करून उठले होते. हाती शस्त्र घेऊन भारताच्या अखंडत्वाचा आणि हैदराबादच्या मुक्तीचा संकल्प करण्यात आला होता. अश्या या क्रांती लढ्यात निजामी राजवट उलथवण्यासाठी धोपटेश्वर (ता. बदनापूर जि. जालना) येथील दगडाबाई शेळके यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्य प्रेरणेतून तसेच अन्य क्रांतिकारकांचे काम पाहून मुक्तिसंग्रामात उडी घेतली होती. त्याचवेळी मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सोयगांव येथील लढ्याचा इतिहासही अजरामर झाला.       दगडाबाईंनी 'बंदूक' आणि 'हातगोळे' चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. असे सांगितले जाते की त्यांनी पॅन्ट, शर्ट घालून बंदूकीसह घोड्यावर प्रवासही केला आहे. आपल्या नवऱ्याच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागल...

एक 'सत्तांतर' असेही घडले होते...

इमेज
"संत्तांतर"  संपूर्ण जग आज एका घटनेमुळे विचलित झाले आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर आपली हुकूमत प्रस्थापित केली. या घटनेचे पुढील काळात दूरगामी परिणाम पूर्ण जगावर पडणार आहेत. परंतु तालिबान्यांनी केलेले सत्तांतर पाहिल्यावर अजून एक गोष्ट लक्षात येते. असेच एक सत्तांतर 1948 मध्ये भारतातही घडले होते. 'हैद्राबाद' संस्थानचा निजाम हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करायला तयार होत नव्हता. त्यामुळे असाच एक संघर्ष झाला होता. परंतु दोन्ही संघर्षामध्ये खूप मोठा फरक आहे.  तालिबानी ही एकप्रकारे दहशतवादी संघटनाच आहे आणि ते जिहादी कट्टरतावादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत. शरियतच्या मार्गाने चालणारे व सर्व जगाला या मार्गावर आणण्यासाठी म्हणून शस्त्र हाती घेतलेल्या दहशतवाद्यांपेक्षा त्यांची वेगळी ओळख नाही. म्हणूनच तालिबानी सत्ता आल्यामुळे आज अफगाणिस्तानमध्ये 90 टक्के लोक मुस्लिम असूनही सर्वत्र भयग्रस्त वातावरण आहे.  या दरम्यान तालिबान्यांनी अफगाणी महिलांचे एक सर्वेक्षणच करण्याचा फतवा काढला आहे. जेणेकरून त्या अफगाणी महिलांचा त्यांच्या सैन्यात लिलाव करता येईल. या धाकाने म...

हिंदू-मुस्लिम विवाहात 'मॅरेज ऍक्ट'ची भूमिका

इमेज
गेल्या काही दिवसांपासून हिंदू-मुस्लिम विवाह आणि लव्ह जिहाद या विषयावरील अनेक विवाद पुढे आले आहेत. यात मॅरेज ऍक्टची भूमिकाही महत्वाची आहे. प्रेम ही निसर्गाने प्रदान केलेली सर्वात सुंदर भावना आहे असे म्हंटले जाते. जर असे असेल, तर प्रेम नैसर्गिकच व्हायला हवे. बळजबरीने प्रेम केले जात असेल तर त्याला प्रेम कसे म्हणता येईल? प्रेम करण्यामागे विशिष्ट हेतू असेल तर त्याला फसवेगिरीच म्हंटले पाहिजे. प्रेमात पडून विवाह करण्यास कोणाचाच विरोध नाही. परंतु 'प्रेम विवाह' आणि 'लव्ह जिहाद' मध्ये फरक आहे. एकीकडे लग्न म्हणजे प्रेम, विश्वास आणि सहमती आहे, तर लव्ह जिहाद म्हणजे प्रलोभन, विश्वासघात आहे. फसवून काही होत असेल तर कायदा असायलाच हवा, विरोध असायलाच हवा.  आजपर्यंत कित्येक गैरमुस्लिम तरुणींना जिहादी जाळ्यात फसवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित केला, त्यानुसार पहिल्याच महिन्यात 14 केसेस दाखल करण्यात आल्या व 49 आरोपींना अटक करण्यात आली. यावरून हा जिहादी रोग किती पसरला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्रेम करणाऱ्या जोडप्याच्या धर्म ...