घटना एक, परिणाम अनेक

घटना एक, परिणाम अनेक देश हळहळतोय खरा. राग व्यक्त होतोय खरा. पण राग व्यक्त होतोय कुणाविरुद्ध? हाती बंदूक व दारुगोळा घेऊन येणा-या आतंकवाद्यांविरुद्ध? मग जरा थांबा. शत्रु केवळ हाती शस्त्र घेऊन आणि सिमा ओलांडून येणाराच असतो का? कदाचित असेलही. पण मग देशाला हादरवुन सोडणारा हल्ला आपल्या जवानांवर झाला. सारा देश शोकसागरात बुडालाय. हलोक श्रद्धांजली अर्पित करताय. पाकिस्तानचा निषेध व्यक्त करताय. अन् अश्या परिस्थितीत काही चक्क 'पाकिस्तान जिंदाबाद' बोलतात?? ज्यांनी हल्ला करविला त्या जैश ए महंमद आतंकवादी संघटनेचं कौतुक करतात?? '५६ इंच छातीच्या तुलनेत ४४ भारी पडलेत' असे विधान एनडीटीव्हीची पत्रकार निधी सेठी ही बया करते. काँग्रेसचे नवज्योतसिंग सिध्दू आतंकवाद्यांचा देश नसतो म्हणत पाकिस्तानचा बचाव करतात. फारुक अब्दुल्ला या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचे विधान करतात. पुण्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत असताना कुमार उपेंद्र सिंह नामक तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत...