पोस्ट्स

ओवेसींचा प्रोपगंडा

इमेज
     एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तुच्या गुणधर्मानुसार त्याला लोक योग्य ती ओळख लावतात. जसे की, आज बाजारात एखादी खराब गुणवत्तेची (नो गॅरंटीवाली) वस्तु विक्रीस आली तर लोकं त्याला 'मेड इन चायना' बनवुन टाकतात. चपटे नाक, बारीक डोळे असलेल्या मित्राला चेष्टेने का होईना पोरं 'चायना' म्हणुन चिडवतात. एखाद्या चटकन रागावणा-या उष्ण स्वभावी मुख्याध्यापकास पोरं 'हिटलर' म्हणुन संबोधतात. ह्या सर्व दाखल्यांमधील विशेषणे त्या व्यक्तीच्या गुणांमुळे व वागणुकीमुळे मिळालेली आहेत. पण तरीही त्या त्या व्यक्तींना ती विशेषणे कधीच पचनीय नसतातच. जशी ओवेशी महाशयांना झाली.     काल परवा आपल्या ओवेसी महाशयांनी अजबच वक्तव्य केले. काय तर म्हणे "आम्हाला पाकिस्तानी म्हणना-यांवर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी. त्यासाठी संबंधित व्यक्तीला ३ वर्षांपर्यंतची पोलीस कोठडी व्हावी" असे त्यांचे म्हणणे होते. यावर ओवेसी महाशयांना पाकिस्तानचा फार काही द्वेष आहे किंवा ते फार भारतभक्त आहेत असेही नाही. पाकिस्तानला दोन-चार शिव्या ठोकल्या की भारतातले पार्ट टाईम देशभक्त लगेच हुरळून जातात हे ओवेसींना चांगलं ठ...

देव दोषक व विज्ञान शोधक

*आस्तिकता, नास्तिकता, दैव, अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर सहज केलेले चिंतन :* देव आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सामान्य माणसापासुन ते ऋषी महात्म्यांपर्यंत ...

मरणासन्न रस्त्याचे...हृदयद्रावक बोल!

' सोयगांव-नागद महामार्गास वाचा फुटली तर.?' वाचा हा आत्मवृत्तपर लेख. मरणासन्न रस्त्याचे...हृदयद्रावक बोल! ©कल्पेश ग. जोशी     जरा ऐकाल का..? हो... मी रस्ता बोलतोय. होय... रस्ताच बोलतोय. ...

'विकास' फरार आहे!

सोयगांव तालुक्याच्या दयनीय अवस्थेची व्यथा मांडणारा लेख. *'विकास' फरार आहे!* -कल्पेश ग. जोशी     गांधीजी म्हंटले होते "खेड्याकडे चला". अर्थात त्यांना भारतातील खेड्यांचा विका...