वसई किल्ला- सोयगांव

वसई किल्ला (जंजाळा) वसई (जंजाळा) किल्ला- सोयगांवचे प्रवासी वर्णन करणारा लेख: "वसई किल्ला- सोयगांव" साधु संतांच्या पदस्पर्शाने व आशीर्वादाने समृद्ध झालेलं व अनेक ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेले मराठवाडा व खान्देश यांच्या सीमेवर वसलेलं गांव...'सोयगांव'..! या गावाची व एकुणच तालुक्याची ओळख करुन देताना सहजच ओठांवर नावे येतात ती जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, भगवान शंकरांचं देऊळ असलेले 'रुद्रेश्वर'(लेणी) व मुर्डेश्वर (देऊळ), वाडी किल्ला, घटोत्कच लेणी आणि 'वसई किल्ला'..! ही सर्व ऐतिहासिक स्थळे शहराच्या दक्षिणेकडील सातमाळा डोंगराच्या द-याखो-यात वसलेली आहेत. या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या स्थळांपैकीच एक म्हणजे 'वसई किल्ला'! सोयगाव शहराच्या दक्षिणेला सातमाळा डोंगराच्या अंगाखांद्यावर हा किल्ला विराजित आहे. सातमाळा डोंगररांगांमध्ये ऐतिहासिक वास्तुस्थळांची मांदीयाळीच आहे. उजवीकडे जवळच वाडी किल्ला, डावीकडे अंतुर किल्ला व मध्यभागी वसई किल्ला विराजित आहे. जवळच असलेल्या 'वसई' गावामुळे त्यास 'वसई किल्ला' अशी ओळख पडली असाव...