"गाय नव्हे माय"
नुकत्याच काही दिवसांपूर्वी गोहत्येला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिमहत्वाचा 'गोहत्या बंदी कायदा' संमत केला. त्यामुळे सर्व जनमाणसात आनंदाचं वातावरण आहे. पण गाईच्या गळ्यावर सुरा फिरवून पोट भरणार्यांसाठी हा कायदा मात्र जिव्हारी लागला. अनेक बुद्धीभ्रष्ट व दूधखुळ्या लोकांनी या कायद्याचा विरोधही केला. पण आपण मानव म्हणुन कुठेतरी सद्सतविवेकबुद्धीने याचा विचार करायला पाहिजे.
ज्या गोमातेच्या शरीरात ३३ कोटी देव सामावले आहेत तिचं पावित्र्य ते काय! आपणांस ज्यापासुन जीवन जगण्यासाठी आवश्यक घटक निस्वार्थी भावनेने मिळतात, जिथे माया, ममता, वात्सल्य, करुणा व प्रेम यांचा महासागर असतो तिथे फक्त माताच असते. आपली जooन्मदाती आई असंच आपल्याला वागवत असते.या जमिनीतूनसुद्धा आपल्याला अन्न, वस्र, निवारा या आपल्या मुलभूत गरजा निस्वार्थी भावनेने मिळतात म्हणुनच तिला आपण माता असं संबोधतो. गायीपासुनही आपणांस तिचे अमृतमय दूध मिळते, सहस्र आजारावर व व्याधीवर उपचारात्मक पवित्र असे गोमुत्र मिळते. गाईचे शेण व गवर्यांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधी तयार करताना फायदेशीर ठरतो तसेच जैविक इंधने व खत म्हणुन त्याचा खूप उपयोग होतो. हिंदू संस्कृतीत प्राणी मात्रांवर दया करण्याचे उपदेश अनेक महात्म्यांनी दिलेच आहे. पण अगदी पुराणकाळापासून गाईला पवित्र मानले गेले आहे. भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा गाईची सेवा केली आहे आणि त्यांनीच गाईला गौमाता सर्वात आधी संबोधीले होते. गाईला केवळ नमस्कार केल्याने अपवित्रता दूर होते असे सुद्धा मानले जाते. त्यामुळे सर्व हिंदू बांधवांमध्ये गाईबद्दलची आपुलकी व आस्था दिसुन येते. म्हणुन गाईलासुद्धा 'गोमाता' असंच संबोधतात.
तरीसुद्धा अनेकजण स्वत:च्या स्वार्थासाठी कसायाकडे बीनबोभाटपणे गायी विकतात. गायीने दूध देणे बंद केले की ती कशी निरुपयोगी वाटू लागते. पण गाईच्या दूधाच्या रूपात कित्येक जीवांना बालपणी संजीवनी मिळालेली असते, त्या गाईमुळे नवीन जीवन मिळालेलं असतं त्याच गाईचा जीव घेऊन स्वत:चा मतलब साधण्यासाठी आपण इतके का हापापले जातो.? त्या गाईचा तिरस्कार करणारे राक्षस तिची कत्तलखान्यात काय हाल करतात ते गायी विकणार्या पाषाण हृदयी हिंदूंनी अवश्य पहावं अाणि ते निर्लस क्रुर हत्याकांड पाहून डोळ्यात दु:खाश्रू न आल्यास आपणही कुठल्यातरी राक्षसी मनोवृत्तीच्या मानवाकडून जन्मपिडीत झालो असल्याची लज्जा वाटू द्यावी.
ज्यावेळेस त्या गौमातेच्या गळ्यावरुन तो विश्वासघाती सुरा गळा चिरण्यासाठी फिरत असतो तेव्हा तिच्या पायांची तडफड, हृदयाची धडधड, अश्रु ढाळणार्या डोळ्यांची केविलवाणी नजर त्या पाषाणहृदयी माणसाकडे जीवाच्या आकांताने पाहत असते. कदाचित त्या मरणासन्न अवस्थेतील गौमातेलासुद्धा वाटत असावं की कुठंतरी या माणसाच्या हृदयाला पाझर फुटेल आणि आपल्याला जीवनदान देईल. पण त्या जीवाला हे ठाऊक नसतं की हा आपला गळा कापणारा मानवाच्या रूपातील एक हिंस्र श्वापद आहे. त्याला कसली आली दया माया. एखाद्या लहाण बालकाला रंगपंचमीला रंगांची पिचकारी उडवण्यात मजा वाटते त्याहुनही जास्त आनंद या गोभक्षक पशुला रक्ताच्या चीरकांड्या उडवण्यात वाटत असावी.
गायीला विकून जितके पैसे मिळतात त्याहीपेक्षा जास्त पैसा हा गायीच्या शेणापासून बनवलेले शेणखत, जैविक इंधन (स्वयंपाकाचा गॅस) आणि गोमुत्र यांच्या वापरातून व विक्रीतून होऊ शकतो.
त्या गाईची रोज सेवा करणार्या एखाद्या गोभक्तावर संकट आल्यास त्या ममतामय करुणामय मुक्या जीवाच्या डोळ्यांतदेखील अश्रु आल्याशिवाय राहत नाही. मग खरा पशु कोणता हे समजुन गोसेवा करावी व गाईला 'गाय' नव्हे तर 'माय' म्हणुनच वागणूक द्यावी.
गाईला हिंदू धर्मात श्रेष्ठ मानतात म्हणुन तिची कत्तल करण्यात कुणाला आनंद वाटत असेल तर गोमातेचं संरक्षण आणि संगोपन करणे आज प्रत्येक हिंदूचं परम कर्तव्य आहे.
- कल्पेश गजानन जोशी (सोयगांव)
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा