खोटा भाईचारा पुरे झाला...!



अनेक मुस्लिम बांधवांनी गणपती बसवले. पूजा केली. त्यामध्ये अनेक कलाकार आहेत. फिल्मी अभिनेते अभिनेत्री आहेत. त्याचे स्वागतच आहे. कारण हीच आपली मूळ संस्कृती आहे. भलेही आज काळाच्या ओघात काही कारणास्तव पूजा पद्धती बदलली असेल. पण आपली राष्ट्रीय संस्कृत एकच आहे ती म्हणजे सनातन संस्कृती, हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती. 

पण कोणीतरी उठतो, हातात कॅमेरा आला म्हणून काहीही दाखवतो. खोटा भाईचारा लादतो. तर समाजाला हे आवडत नाही. सोयीनुसार काही गोष्टी जर समाजावर थोपवल्या जातील तर लोक विरोध करणारच ना? 

एवढाच भाईचारा आणि सामाजिक सलोखा दाखवायचा आहे तर जे मुस्लिम गणपती बसवता त्यावर शॉर्टफिल्म करा. ती वास्तविकता आहे. मुस्लिम समाजात गणपती विषयी किती श्रद्धा आहे ते दाखवा, त्याचे अनेक उदाहरण आहे. पण ते सोडायचे आणि मुस्लिम दुकानदारांची मार्केटिंग करायची आणि ती भाईचाऱ्याच्या नावाखाली खपवायची हे चाळे सुज्ञ समाज कधीच सहन करणार नाही. 

कोण कुठला अथर्व सुदामे. कालपर्यंत त्याला कोणी ओळखत नव्हता. पण व्हिडिओ मधून त्याने केलेल्या स्टंटबाजी मुळे तो चर्चेचा मुद्दा बनला. फॉलोअर्स वाढवण्यासाठी धडपड करणारे अनेकजण त्याच्याच मार्गाने पुढे जात आहेत. काहीतरी वादग्रस्त करायचं आणि विरोध झाला की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढायचे. मग त्यांना सपोर्ट करायला डापू (डावे पुरोगामी) आहेतच तयार. चारपाच वर्षापूर्वी भाऊ कदमला गणपती बसवू नये म्हणून धमक्या देणाऱ्यांना ते सोयीस्कर विसरून जातात. त्यावर अवाक्षर काढत नाही. असो. 

मुद्दा इतकाच आहे की खोटा भाईचारा पुरे झाला. लोकांना त्याचा विट आला आहे. वस्तुस्थिती दाखवली तर लोकांना आनंद होईल. अनेक फिल्म्स येत आहे. त्यांना लोक डोक्यावर घेत आहे. 

@lekhagni 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान