देश कोणी विकायला काढला होता?

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक व विशेषतः काँग्रेस पक्षाकडून सारखा आरोप होत असतो की त्यांनी देश विकायला काढलाय. त्याच बरोबर सत्य, परखड आणि देशहिताची बाजू मांडणाऱ्या आजच्या माध्यमांना गोदी मीडिया म्हणून हिणवलं जातं. पण देश कोणी विकायला काढला आणि गोदी मीडिया कोण होतं, याचं एकच उदाहरण काँग्रेस आणि विरोधकांची झोप उडवून देऊ शकतं. 

ज्या काळात सोव्हिएत रशिया बलाढ्य होता आणि त्याची केजिबी ही गुप्तचर यंत्रणा त्यांच्या काह्यातील देशांना वाळवी लावत होती, त्याच दरम्यान भारतात आलेल्या दोन केजीबी अधिकाऱ्यांनी (युरी बेझमेनोव्ह आणि व्हसिली मित्रोखिन) मोठे गौप्यस्फोट केले आहेत. 

बेझमेनोव म्हणतात की भारत ही 
जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचे कितीही सांगितलं जात असलं, तरी भारत ही एक निरंकुश राज्यव्यवस्था होती जिच्यावर जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा एक अधिकार चालत होता. तसेच भारत आपल्या अलिप्ततावादाचा कितीही गजर करत असला तरी तो सोवियत रशियाचा अंकित झालेला देश होता. इंदिरा गांधींनी राज्यकारभार सांभाळाला त्या क्षणापासून त्या रशियाच्या खिशात होत्या. इंदिरा गांधींच्या काळात भारत रशियाच्या किती कह्यात होता याची विस्तृत माहिती व्हेसिली मित्रोखेन यांनी मित्रोखेन आर्काइव्ह या पुस्तकात दिली आहे. 

“India under Indira Gandhi was also probably the arena for more KGB active measures than anywhere else in the world...  According to KGB files, by 1973 it had taken 10 Indian newspapers under its control. During 1972 KGB claimed to have planted 3789 articles in Indian newspapers - probably more than any other country in the non - Communist world. Kalugin recalls one occasion on which Andropov personaly turn down an offer from an Indian minister to provide information in written for $50000 on the ground that the KGB was already will supplied with material from Indian Foreign and Defence ministries. It seemed the entire country was for sale.”

– इंदिरा गांधींच्या अधिपत्याखालील भारत म्हणजे केजीबीच्या संपर्कातील कदाचित जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक खुला मैदान होता.  KGB फाइल्सनुसार, 1973 पर्यंत त्यांनी 10 भारतीय वृत्तपत्रे आपल्या नियंत्रणाखाली घेतली होती.  1972 मध्ये KGB ने भारतीय वृत्तपत्रांमध्ये 3789 लेख प्रसिद्ध करून घेतले होते - जे बहुधा गैर-कम्युनिस्ट जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त होते.  कालूगिन एका प्रसंगाची आठवण करून देताना म्हणतो अँड्रोपोव्ह ने एका भारतीय मंत्र्याकडून 50 हजार डॉलर्सचा बदल्यात हवी ती माहिती पुरवण्याची ऑफर नाकारली होती, कारण त्याला ती सर्व माहिती भारताच्या परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयाकडून पूर्वीच मिळाली होती. “मला हा पूर्ण देश विकायला काढलेला दिसत होता” असे तो म्हणतो. 

सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरचिटणीस लियोनिद ब्रेझनेव व इंदिरा गांधी

म्हणजे मंत्री महोदय जी माहिती विकायला निघाले होते ती माहिती अगोदरच मंत्रालयातील फितूर नोकरशहांनी विकून टाकली होती. विशेष म्हणजे ज्या मीडियाने यावर प्रश्न उपस्थित करायला हवे होते तीही केजीबीच्या पूर्णपणे दावणीला बांधली गेली होती. या स्फोटक माहितीवरून भारताला आतून पोखरण्याचं काम किती पूर्णत्वाला गेलं होतं याची कल्पना येते. “जणू संपूर्ण देशच विकायला काढला होता” हे ऐकून मनात एकाच वेळी संताप आणि खिन्नता दाटून येते. यावरून गांधी परिवाराच्या बाहेरील व कमी वेळेत लोकप्रिय झालेले पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा रशिया दौऱ्यात कसा काय एकाएकी मृत्यू झाला असेल? हे गूढ विचार करायला लावणारे आहे. शिवाय काँग्रेस पक्ष किती पूर्वीपासून कम्युनिस्टांच्या गळाला लागलाय हे लक्षात घेण्याजोगे आहे. 
 
जे आज मोदींना कसलाही आधार नसताना म्हणताय मोदींनी देश विकायला काढलाय, त्यांच्यासाठी हा खुलासा एक चपराक आहे. ज्या रशियाच्या केजीबी ने इंदिरा गांधींच्या सरकारला आपल्या हातचं बाहुल बनवलं होतं, आज त्याच रशियाचा राष्ट्राध्यक्ष पुतीन रशिया–युक्रेन युद्धात भारताच्या पंतप्रधानाला फोनवर फोन करून आपल्या बाजूने उभे राहण्यासाठी विनंती करतो.  त्यामुळे देश कोणी विकायला काढला होता आणि कोण देशाला आत्मनिर्भर करतोय हे जग पाहतच आहे..!

– कल्पेश जोशी, संभाजीनगर

संदर्भ – डावी वाळवी, लेखक अभिजित जोग, पृष्ठ क्र. 116, 117
मूळ संदर्भ – मित्रोखीन आर्काइव्हज


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान