आग पुन्हा भडकली!



हमास - इस्रायल युद्धात आता इराण ने उडी घेतलीय. काल इराण ने इस्रायल वर 200 मिसाईल डागल्या आहेत. त्यात इस्रायलचे किती नुकसान झाले याबाबत स्पष्टता नाही पण ह्या मिसाईल इस्रायलच्या राजधानी तेल अविव मध्ये डागल्या गेल्या आहेत  व तिथे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली असू शकते. 
इस्रायलच्या आजूबाजूला सर्व इस्लामिक देश आहेत आणि सर्वांचे इस्रायल सोबत वैर आहे. कारण इस्रायल गैर इस्लामी देश आहे. म्हणजेच ही भूमी दारुल हरब  (मुस्लिमांसाठी युद्धाची भूमी) आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम देश इस्रायल विरोधात (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) उभे आहेत. त्यात प्रत्यक्ष इराण आणि लेबनॉन ने नुकतीच उडी घेतलीय. 

आता चर्चा ही सुरू आहे की तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. जगभरात शांतीचा नारा देणाऱ्या इस्लामिक शक्ती हमास या दहशतवादी संघटनेला का जबाबदार धरत नाही व त्याच्याविरुद्ध का कारवाई करत नाही? ह्याच हमास मुळे हे युद्ध पेटले आहे. हमास ने गेल्यावर्षी इस्रायल वर रॉकेट हल्ले केले, शिवाय गुप्तपणे शिरलेल्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिला, बालके, पुरुष यांना ओलीस ठेवले. अनेकांच्या हत्या केल्या, त्याचे व्हिडिओ जारी केले. पण एकही इस्लामिक देश हमास विरुद्ध बोलायला तयार नाही. 

उलट इस्रायल वर जगभरातील मुस्लिम बहिष्कार करत आहे. भारतात सुद्धा रमजान ईदच्या दिवशी पॅलेस्टाईनसाठी दुआ मागितली. भारतीय मुस्लिम इस्रायली वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे अभियान राबवित आहे. हिंसा तर इस्रायली नागरिकांची पण झाली. जीव त्यांचे पण गेले. पण ही दुआ फक्त मुस्लिमांसाठी होती. 

जगात जेवढ्या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत त्या कधी ना कधी हमास च्या भूमिकेत येतील ही शक्यता टाळता येण्यासारखी आहे का? आजच्या परिस्थितीवरून हे युद्ध कश्यासाठी आणि कोणामुळे होत आहे याचा डोळसपणे विचार करणे आवश्यक आहे. 

– कल्पेश जोशी, छ. संभाजीनगर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान