रझाकारांनी भग्न केलेले पुणतांब्याचे 'मामा भाचे मंदिर'

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मंदिरांपैकी हे पुरातन मंदिर आहे. मंदिराचा जवळपास 300 ते 400 वर्षाचा इतिहास असल्याचे स्थानिक सांगतात. दोघे मंदिर अगदी शेजारी शेजारी आहेत. दोघी मंदिरे महादेवाची आहेत. निजामी राजवटीत रझाकरांच्या क्रूर व धर्मांध आक्रमणात मंदिरांचा विध्वंस झाल्याचेही स्थानिक सांगतात. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे 70-80 वर्षांपूर्वी मंदिराचा झालेला विध्वंस अजूनही त्याचीच वाईट आठवण करून देत आहे. कारण या मंदिराचा मागील इतक्या वर्षात विकास सोडा सध्या भग्न मुर्त्या सुद्धा बदलता आलेल्या नाहीत. याला स्थानिक हिंदू समाजाची हतबलता म्हणावी की राजकीय उदासीनता? अनेक प्रयत्न करूनही राजकीय अनास्था असल्यामुळे हिंदू अस्मितेवर झालेला हा आघात पुसता आलेला नाही. गोदावरीच्या तीरावर ब्राम्हणघाटावर आज जवळपास 12 ते 15 छोटी मोठी देऊळ आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हे मामा-भाचे मंदिर. बाकी सर्व मंदिरे ही नंतरच्या काळात अगदी अलीकडे बांधलेली आहेत. पण येथील सर्वात मोठे व पुरातन मामा भाचे मंदिराकडेच का दुर्लक्ष झाले ते काही कळत नाही. बहिष्कृत केल्याप्रमाणे हे मंदिर आज जीर्ण अवस्थ...