खोट्या वृत्तांकन प्रकरणी तक्रार, कोण होणार हद्दपार?
दिल्ली हिंसाचारात आयबी चे अधिकारी अंकित शर्मा यांची धर्मांध जिहादी मानसिकतेच्या लोकांनी हत्या केली. त्यांच्या शरीरावर 400 वेला चाकूने वार केले असे सर्वत्र वृत्त आहे. अतिशय क्रूरतेने त्यांची हत्या करण्यात आली आहे. परंतु त्याच वेळी जेव्हा देश धार्मिक संवेदनांनी संवेदनशील झालेला होता, अश्या परिस्थितीत काही न्यूज चॅनल व न्यूज पोर्टल चक्क चुकीच्या व बिन बुडाच्या संदर्भहीन बातम्या पसरविण्यात मशगुल होते.
WSJ - World Steet Journal यासारखे न्यूज पोर्टल या खोट्या वृत्तांकन केल्या प्रकरणी LRO - Legal Rights Observatory या संस्थेने WSJ च्या विरोधात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. WSJ चा आशिया खंडातील प्रमुख एरीक बेलमन यास देशातून हद्दपार करावे व ज्या भारतीय पत्रकारांनी यांकगे वृत्तांकन केले त्यांचे प्रमाणन काढून घ्यावे अशी मागणी LRO ने केली आहे. तसेच WSJ ने जनतेची माफी मागावी असेही त्यांनी म्हंटले आहे.
गुप्तचर खात्याचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करणारे जय श्री राम अश्या घोषणा देत होते व त्यांच्या हातात तलवारी व दंडुके होते, अश्या स्वरूपाचे वृत्तांकन या WSJ ने केले होते. यासाठी त्यांनी मृत आयबी अधिकारी अंकित शर्मा यांचे बंधू अंकुर शर्मा यांनीच अशी माहिती दिली असा संदर्भही जोडण्यात होता.
अंकित शर्मा यांनी हत्या झाल्यानंतर त्यांचे भाऊ अंकुर शर्मा यांनी विविध न्यूज चॅनेल्स वर आपली मुलाखत दिली. ज्यामध्ये अंकित शर्मा यांची हत्या आम आदमी पक्षाच्या नगरसेवक असलेल्या ताहीर हुसेन याने व त्याच्या गुंडांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या एकाही मुलाखतीत 'जय श्री राम' या शब्दाचादेखील उल्लेख नाही. मग WSJ ला अशी बातमी का प्रसारित करावी लागली, याचा विचार होणे गरजेचा आहे.
WSJ चा संदर्भ देऊन जळगाव येथील Live Trend News या न्यूज चॅनल च्या फेसबुक पेजवर अशीच बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे असे खोटे वृत्तांकन अनेक शंकांना आमंत्रण देत आहे.
दिल्लीसह देशात सध्या संवेदनशील वातावरण निर्माण झाले असताना अश्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या व संदर्भहीन वृत्तांकन करणाऱ्या बातम्या देण्यामागे लाईव्ह ट्रेंड न्यूज चा काय उद्देश आहे? अश्या तथ्यहीन वृत्तांकनामुळे हिंदूं समाजास विनाकारण बदनाम केले जात आहे. त्याबद्दल लाईव्ह ट्रेंड न्यूज ने स्पष्टीकरण दिले पाहिजे अन्यथा जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी नेटकऱ्यांकडून मागणी होत आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या फॅक्ट चेक नुसार अंकुर शर्मा यांनी अंकित शर्मा यांना 'जय श्री राम' च्या घोषणा देणाऱ्यांनी मारले या बातमीचे वास्तव समोर आणत ती बातमी खोटी असल्याचे सांगितले. TOI ने अंकुर शर्मा यांच्याशी फोनवर बोलून त्याची खात्री केली.
TOI च्या फॅक्ट चेक ची लिंक - https://timesofindia.indiatimes.com/times-fact-check/news/fact-check-ankit-sharmas-brother-denies-saying-his-brother-was-killed-by-those-chanting-jai-shri-ram/articleshow/74355310.cms
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचा सन्मान केला जातो. परंतु, अश्याच संदर्भहीन व एकांगी खोट्या बातम्यांना प्रसारित करून काही न्यूज चॅनल्स व प्रसार माध्यमं पत्रकारितेलाही बदनाम करीत आहे. त्यामुळेच बातम्यांचीही विश्वासार्हता कमी होताना दिसत आहे.
©️लेखाग्नी
Irony, what else? You are accusing others of spreading fake forgetting you yourself spreading the fake news. There were 12 stab marks on Ankit's body not 400. Why exaggerating?
उत्तर द्याहटवा