पराभव नव्हे राजकीय बलिदान !
दिल्ली केंद्रशासित प्रदेश विधानसभेचे कालच निकाल लागले. आम आदमी पक्षाला जनतेने कौल दिला. परंतु, या निवडणुकीतून एक विचार मात्र पुन्हा सिद्ध झाला आहे. या निवडणुकीत भाजप खरोखरच पराभूत झाला की 'विजयी' याचा विचार करावा लागेल.
सीएए च्या विरोधात त्यांनी देशभर गदारोळ माजवला, हिंसाचार केला, देशविरोधी घोषणा देऊन आपले देशविघातक मनसुबे सिद्ध केले तरीही आज 'आप'च्या विजयाने 'त्यांचा' विजय झाला आहे. देशभर 'ते' जल्लोष करीत आहे.
'ते' अल्पसंख्याक असूनही सत्ताधारी त्यांच्या इच्छेप्रमाणे निवडू शकतात. कोणाला जिंकवायचं, कोणाला पाडायचं, कोणावर बहिष्कार टाकायचा हे 'फतवे' ठरवतात. सत्य उमगूनही आजवर काँग्रेसने त्यांची चाटुगिरी सोडली नाही, कारण त्यांना याचे भान होते.
मुस्लिम तुष्टीकरण करून काँग्रेसने 70 वर्ष सत्ता भोगली. हिंदुत्वाविषयी आत्मविस्मृत समाज आणि देशाशी घेणं देणं नसलेल्या लोकांच्या भरवश्यावर हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे राजकारण करणाऱ्या भाजपला कोण मत देणार? खरं तर भाजपला हे कळत नाही असे नाही. परंतु, ज्या पक्षाचा जन्मच मुळी "राष्ट्र सर्वप्रथम" या मूल मंत्राने झाला आहे, त्याच्यासाठी केवळ जिंकणं आणि सत्ता प्राप्ती हे एकमेव उद्देश्य नाही. मागील दोन वर्षांपासून तर जे पूर्वी कट्टर राजकीय वैरी होते ते भाजपला हरविण्यासाठी संघटित झाले आहे.
दिल्लीतही त्याची प्रचिती आली. सपा, बसपा, काँग्रेस, एमआयएम सगळ्यांनी एकदिलाने 'आप'ला विजय मिळवून दिला आहे. आगामी अन्य राज्यातील निवडणुकीत आप त्याची परतफेड करीत अन्य कोणाला मदत करेनच. म्हणूनच आधी राजस्थान, मग मध्यप्रदेश, झारखंड, नंतर कर्नाटक व नुकतेच महाराष्ट्र व आता दिल्ली येथे हार पत्करावी लागली आहे. तथापि, राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन देशासाठी आवश्यक परंतु, जोखीम असलेले निर्णय घेत भाजप घोडदौड करीत आहे.
आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपनेही शाहीनबाग प्रेमींचे फाजील लाड केले असते, त्यांना बिर्याणी खाऊ घातली असती, 500 रुपये रोज दिला असता तर तेही मोठ्या बहुमताने निवडून आले असते. एकीकडे आत्मविस्मृत व आत्मस्वार्थी समाज व दुसरीकडे संघटित पण राष्ट्रीयत्वाला छेद देण्यासाठी आसुसलेला बुरखाधारी शाहीनबाग, याच्या कचाट्यात सापडलेला भाजप; हे चित्र जरी लक्षात आलं तर भाजप पराभूत झाला की देशहितासाठी त्यांनी राजकीय बलिदान दिलं हे लक्षात येईल.
शाहीनबागमधील लोक' संघटित आहेत, तरीही केवळ मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण न करता सर्वसमावेशक व समानता जोपासत राजकारण केले व भाजपने तोच नेहमी अजेंडा ठेवला. असंघटित हिंदू समाजाच्या भरवश्यावर ते आत्मविस्मृत आहेत व संघटित नाहीत म्हणून त्यांना दुर्लक्षित केले नाही. म्हणून त्यांची केंद्रात सत्ता असूनही ते का हरतात आणि हा पराभव खरंच भाजपचा आहे का? याचा प्रामाणिक विचार केला पाहिजे.
आपली 'हार' होणार याचे अंदाज निवडणुकीपूर्वीच अमित शाह व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळून चुकले होते. तरीही ते शाहीनबाग पुढे गुडघे न टेकता आपल्या वचनावर आणि मुद्द्यावर ठाम राहिले. काँग्रेससोबत अनैसर्गिक युती करूनही भाजपाला आपला रोखता आले असते. परंतु, हा विचारही त्यांना शिवला नाही.
ज्या लोकांसाठी भाजपने हार पत्करली, तेच लोक भाजपच्या पराभवावर आज छि थू करतील, त्यांना ट्रोल करतील, मजाक उडवतील एवढेच काय तर आजच्या राजकीय चाणक्याच्या चूकाही काढतील. परंतु, सर्वसमावेशक, कोणाचेही तुष्टीकरण न करता केवळ राष्ट्रवादास प्राधान्य ठेऊन देशहितासाठी मैदान गाजवणाऱ्या दिल्ली भाजपला खरंच मानलं पाहिजे. सत्तासुंदरीसाठी भारतमातेला वृद्धाश्रमचा रस्ता न दाखविणाऱ्या चाणक्य अमित शाह यांची एकनिष्ठता कळली पाहिजे. दिल्ली भाजपसाठी आपला तर ग्रेट सॅल्यूट !!
©️ कल्पेश जोशी
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा