युवाकुंभात घडले भारताचे युवादर्शन

युवाकुंभात घडले भारताचे युवादर्शन २३/१२/२०१८ प्रयागराज येथे जानेवारी २०१९ मध्ये होणा-या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाच कुंभ उत्तरप्रदेश सरकारने आयोजित केले होते. त्यापैकी चौथा कुंभ असलेल्या युवाकुंभाचे आयोजन लखनऊ विश्वविद्यालयाने केले होते. लखनऊ शहरात होणा-या या कार्यक्रमासाठी भारतातील सर्व राज्यातून युवक युवतींनी उपस्थिती लावली. युवाकुंभाच्या कार्यक्रमप्रसंगी २२ डिसेंबर, शनिवार रोजी प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्यासोबत चर्चासत्र आयोजीत केले होते. यावेळी भारतीय परंपरा व संस्कृतीचे महत्व त्यांनी विशद करताना देशात पाश्चात्य संस्कृतीचे प्रमाणापेक्षा जास्त उदात्तीकरण होत असल्याचे मत मांडले. पाश्चात्य संस्कृतीला विरोध नाही परंतु आपली भारतीय परंपरा सोडूनदेखिल चालणार नाही. पाशिचात्यांच्या काही चांगल्या गोष्टी स्विकारुन आपल्या संस्कृतीचे विकृतीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. देशात आजकाल भारतीय परंपरांचा विरोध करणारा उच्च विचार किंवा पुरोगामी ठरतो तर भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणा-याला प्रतिगामी व अडाणी ठरवले जाते, ही वाईट बाब आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली....