हिंदूत्ववादी आणि दहशतवादी
हिंदूत्ववादी आणि दहशतवादी
ठराविक कालावधीनंतर हिंदूत्ववाद्यांना व विशेषत: सनातनच्या साधकांची भगव्या दहशतवादाखाली धरपकड का सुरु होत असावी?
सरकारला किंवा पोलीस यंत्रणेला असे वाटते का, की हिरव्या दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणुन भगवा दहशतवाद जन्म घेऊ शकतो? आणि असे होऊ नये म्हणुन हिंदूत्ववाद्यांवर वचक असावा यासाठी हे घडत असावे का? या प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरापर्यंत पोहचता येते. काल एबीपी माझावर निवृत्त पोलीस सहआयुक्त वाय. सी. पवार यांनी असेच काहीसे मत व्यक्त केले. 'दहशतवादास प्रत्युत्तर म्हणुन काही हिंदूत्ववाद्यांकडून असे प्रयत्न केले जाऊ शकतात असे त्यांनी स्पष्टपणे शंका व्यक्त केली, पण गावठी हातबाँम्ब बणविणा-यांना दहशतवादी कसे म्हणता येईल' असा उपरोधीक सुर काढून या लोकांना दहशतवादी म्हणण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
कश्मिर खो-यात व पुर्वांचलात अनेक कट्टर इस्लामी दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांचा मुळ हेतू काफरांना (गैरमुसलमानांना) संपवणे किंवा धर्मांतरीत करुन इस्लामीक राष्ट्र तयार करणे आहे, हे सर्वश्रूत आहेच. यामुळेच आजपर्यंत अनेक निष्पाप गैरमुस्लीम व मुस्लीम नागरीकांच्याही हत्या या धर्मांध दहशतवाद्यांकडून घडवुन आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे इस्लाम धर्माविरोधात नाही, परंतु इस्लामी कट्टरतेने प्रपिडीत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर म्हणुन गैरमुस्लीमांतर्फे मोर्चा उभा राहणे स्वाभाविक होता, परंतु भारतात अजुनही असे घडलेले नाही. भारतातील कुठल्याही संघटनेने दहशतवाद्यांविरोधात अजुनही हत्यार उपसलेले नाही. तसे कोणत्याही संघटनेने जाहिरदेखिल केलेले नाही. मग गावठी कट्टे व बाँम्ब सापडले म्हणुन मागचापुढचा विचार व करता संशयितांना दहशतवादी म्हणणे कितपत योग्य वाटते?
मालेगांव बाँम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह व कर्नल पुरोहीत यांच्यावर किती काळ खटला चालला व त्याचा परिणाम काय झाला हे एव्हाणा जगाला माहित पडले आहेच. सलग सात आठ वर्ष त्यांचा अनन्वीत छळ झाला, परंतु साध्वी प्रज्ञा व कर्नल पुरोहितांनी त्यांच्यावर केलेले आरोप मान्य केले नाहीच. कारण स्पष्ट आहे. भारताला आपली माता माणना-या देशभक्तांकडून आपल्या मातृभूमीवर दहशतवादासारखे लांच्छनास्पद कृत्य होणार नाहीच. आणि तेच खरे ठरले. साध्वी प्रज्ञा व पुरोहितांना सोडण्यात आले. पण त्यांना अकारण ज्या नरकयातना भोगाव्या लागल्या त्याचं काय? त्यांची शारीरीक हानी कशी भरुन निघणार? आज जे काही घडत आहे, ते 'मालेगांव पार्ट-२' असल्याचे बोलले जात आहे. त्यात तथ्य आहे की नाही ते समोर येईलच. पण केवळ संशयावरुन हिंदूत्ववाद्यांना व सनातनच्या कार्यकर्त्यांना किती काळ छळले जाणार आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
या प्रकरणामुळे मागील काही वर्षापासुन घडणा-या गोष्टींचा सरकारशी (सरकारच्या विचारसरणीशी) जो संबंध लावला जात होता, तोही यानिमित्ताने खोटा ठरला आहे. कारण भाजप (हिंदूत्ववादी) सरकार सत्तेत असल्यामुळेच साध्वी प्रज्ञा व कर्नल पुरोहितांना सोडण्यात आले, असे बाल्लीश आरोप विरोधकांनी केले होते. एवढेच काय तर एटीएस व पोलीस यंत्रणा सरकारच्या तालावर नाचते असा आरोपही करण्यात आला होता. पण आता तेच भाजप सरकार सत्तेत असताना हिंदूत्ववाद्यांची धरपकड होत आहे, यावर विरोधकांनी सोयीस्करपणे चुप्पी साधली आहे.
खरं तर दहशतवादासारख्या घटना म्हणजे समाजमन ढवळून निघणा-या घटना असतात. आणि स्वत:ला बुद्धीवादी म्हणविणारे जेव्हा दहशतवादास धार्मिक रंग देऊन हिंदू दहशतवादाचं लेबल लावु पाहतात, तेव्हा त्यांच्या निर्बुद्धपणाचे हे खरे प्रदर्शन घडत असते. एकिकडे दहशतवादाला धर्म नाही असं तथ्यहिन परंतु चविष्ट वाक्य वारंवार उच्चारलं जातं; आणि दुसरीकडे दहशतवादास भगवा रंग देऊन हिंदू कसे दहशतवादी आहेत, असा गोंगाटही केला जातो. याला साध्यासरळ भाषेत 'दूतोंडीपणा' म्हणतात. परंतु नेहमीप्रमाणे ह्या दूतोंडी सापाची दोन्ही मस्तके सत्य समोर आली म्हणजे आपोआप ठेचली जातील. पण या सर्वातुन 'हिंदूत्ववादी' व 'दहशतवादी' हे शब्द समानार्थी करण्याचा डाव खेळला जातोय हे मात्र नक्की.
✍🏻कल्पेश गजानन जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा