'आझाद' अजुनही गुलामच!
'आझाद' अजुनही गुलामच!
#लेखाग्नी
आसाममधील वाढती बांग्लादेशी मुसलमानांची संख्या हे महा संकट असल्याचे समजण्यापलीकडे गेलेल्या मानवतावादी मेंदूंचे वडे तळून त्यांच्या श्रद्धेय परकियप्रेमी तिर्थरुपांना नैवेद्य दाखवावा असा विचार डोक्यात येतो आहे. तो का गैर म्हणावा? कारण, जेव्हा जेव्हा परकिय मेंढरं आपल्या सुजलाम सुफलाम भारत नामक बागेत शिरत होती तेव्हा, किती छान कुरळे कुरळे केस आहे हो यांचे म्हणुन काही नादान दूधखुळे भारतीय त्यांच्या सर्वांगावरून कुरवाळीत त्यांच्या प्रेमात तल्लीन झाले होते. जर पोरस व दस्यूसारखा जागृत गुराखी नसता, तर याच मेंढरांनी आपल्या भूमीवरील समृद्धी कधीच चरवण करीत गिळंकृत केली असती. तथापी अंबुजसारखे राजे व सरदार म्हणवणा-या सुपरगांडू औलादींनी या मेंढरांच्या लेंड्या शेतीसाठी फारच पोषक असतात, म्हणुन त्यांच्या शौचाचीही जिकिरीने काळजी केली असती, यात आश्चर्य नाही? आपला परकियांची तळवे चाटण्याचा गुण त्यांनी काही केल्या सोडला नसताच.
अगदी इ.स.पुर्व काळातील गोष्टी तरी का काढाव्या उकरून? आमच्याजवळ त्यांच्या चाटूपणाचे यथेच्छ पुरावे नाही ना. आणि हल्ली पुरावे नसले तर बापाचे बापपण धोक्यात येईल इतकी भयानक प्रयोगवादी नसली निर्माण होऊ लागल्या आहेत. १०-१० वर्षाचा कालावधी जनगणनेसाठी दिला तो सांगा कुणाच्या पथ्यावर पडला? देशातील हिंदूंना सुशिक्षीत म्हणुन लोणी लावायचं आणि तुम्हीच विवेकी विचारी असून जे काही विज्ञानवादी व पुरोगामी विचारनिर्णय करायचे ते तुम्हालाच असा वरून मसालादेखील लावायचा, हा प्रकार अजुन किती दिवस चालवायचा? एखादं कारटं समजदार आहे म्हणजे त्याने स्वत:च्या अंगावरची कापडंही एक दिवस असमंजस म्हणवल्या गेलेल्या कारट्यास द्यायची आणि पुन्हा लोणी लावुन नागडं व्हायला प्रेरित करायचं हा धंदा देशातील तथाकथीत महासमंजस 'गुलाम'प्रभुती प्रवृत्तींना आता सोडावा लागेल. किती दिवस हिंदूंनीच सहन करायचं? हिंदूंना शहाणं म्हणुन म्हणुन अस्तित्व संपायची वाट पहायची काय? एकीकडे कधीकाळी ७ टक्के असलेल्या मुसलमानांची संख्या २५ टक्क्यावर पोहचते. हिंदूंची मात्र लोकसंख्या त्या तुलनेने दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. शहाणं बाळ म्हणवुन हिंदूंनाच नेहमी लोकसंख्या नियंत्रणाचे डोस पाजायचे. आणि मुस्लीम समाज काय तर अशिक्षीत राहिला, मागास राहिला म्हणुन त्यांच्याविषयी सहानुभूतीचे डोंगर उभे करायचे ही नाटकं या देशातील राज्यकर्ते किती दिवस चालवणार?
आसाममध्ये मुस्लीम ३५ टक्क्यावर येऊन पोहचतो. त्यातही ४० लाखावर लोकसंख्या ती परकिय बांग्लादेशी मुसलमानांची. याच ४० लाखाचे २ कोटी व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? पुढची जनगणना येईस्तोवर तोही आकडा सहज पार झालेलाच असेल. आधीच लोकसंख्येचा प्रचंड बोजा या देशावर असताना अजुन ४० लाख उरावर घेण्यात तमाम बांग्लादेशप्रेमी भारतीय नेत्यांना काय सुख मिळते काही कळत नाही. त्यात काँग्रेसचे गुलामसाहेब म्हणतात, नेपाळमधून येणारी माणसं भारतात राहतातच ना? ते इथे व्यवसाय करतातच ना? मग बांग्लादेशींनी काय पाप केले? गुलामसाहेब या प्रश्नांची संसदेत सरबत्ती करताना अजिबात कचरत नाहीत. याच गुलामसाहेबांच्या घरात झाडूपोछा करणारा येतो, बगिचा फुलवणारा माळी येतो, स्वयंपाकास कुकी येतो; या सर्वांना साहेब ते दररोज घरी येतात किंवा तिथेच राहतात म्हणुन ते आपल्या घरावर हक्क सांगू लागल्यास सहन करतिल काय? याच सर्व नोकरादी मंडळींच्या भविष्यातील अपत्यांनी आपल्या गुलाम साहेबांच्या घरावर हक्क सांगितल्यास ते त्यांना कुरवाळतील काय? मग १२५ कोटी लोकांच्या भारतहाऊस मध्ये अनधिकृत लोक सर्रास शिरताय, हिंसाचार करताय, आतंकवादी बनताय, जिहादी बनताय एवढेच काय तर भारतीय मुसलमानांसही बदनाम करताय मग त्यांची वकिली करावीच का व कश्यासाठी?? बांग्लादेश मधून होणारी ही जिहादी आयात निव्वळ कामधंद्यासाठी नाही, तर देशाचे रक्त शोषण्यासाठी आलेली गोचीड गोमाशीरुपी वावटळ आहे. अश्या घटनांचा देशाला यापुर्वीही कित्येकदा अनुभव आलेला असताना गुलाम नबी आझाद परकियांच्या समर्थनार्थ बोलतात म्हणजे भारतातील 'आझाद' अजुनही 'गुलाम'च असल्याचा हा सज्जड पुरावा आहे!
✍🏻कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com
(लेख नावासहित शेअर करु शकता)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा