"नोटबंदीची गुलाबी आठवण"

२०१७ या संपुर्ण वर्षात प्रसारमाध्यमात व जनसामांन्यात सर्वात जास्त चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे 'नोटबंदी'! एकीकडे शालेय विद्यार्थ्यांपासुन ते गावागावातील कट्यांवर, पारावर, पानटप-यांवर व सार्वजनिक ठिकाणी कधी नव्हे इतके अर्थतज्ञ आढळुन येऊ लागले. देशाच्या पंतप्रधानांच्या निर्णयातील चुका शोधणे म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा शहाणे असल्याचा अविर्भाव कित्येकांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. तर...काही जणांचा नोटाबंदीचा निर्णय कसा योग्य आहे, हे सोशल मिडियापासुन ते गल्लीगल्लीतील गप्पांमध्ये पटवुन देताना प्रयत्नांची शर्थ लागत होती. काहींना जुन्या नोटा परत करतानाचा त्रास होत होता, तर काहींना गुलाबी नवीन नोट पाहुन आनंद होत होता. नवीन येणा-या २०००च्या नोटविषयी तर सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या अफवा पसरत होत्या. पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाचा कुठे आनंद व्यक्त होत होता, तर कुठे शक्य तितकी अवहेलना केली जात होती. आनंद - दु:ख, उत्साह - यातना, भक्ती - द्वेष, समर्थन - निरोधन यांसारखा विरोधाभास नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रकर्षाने जाणवला. कारण एकच...'नोटबंदी'!! ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी भारता...