@विडंबन...जळत्या काश्मीरचे@
नमस्कार,
आताच हाती आलेल्या बातमीनुसार 'टम्मु हश्मिर'मधील परिस्थीती अजुन चिघळल्याचे सुत्रांकडून कळते. टम्मु हश्मीरमधील एका उग्र मुंगळ्याला (गुरहान बाणी) ठार केल्याच्या निषेधार्थ लाखोच्या संख्येने मुंगळे व काही लाल मुंग्या त्याच्या अंतयात्रेला उपस्थीत होत्या. तेथुनच परततानाच सगळ्यांनी हिंसात्मक कारवाया सुरु केल्या. पोलीसी मुंग्यांच्या चौक्या जाळायला सुरुवात केली. सैनिकी मुंग्यांच्या छावण्यांवर हल्ले होऊ लागले. दगडफेक, जाळपोळ व सैनिकी काळ्या मुंग्यांवर हल्ले सुरु झाले. काही सैनिकी मुंग्यांना लाथाबुक्यांनी तुडवलं गेलं, त्यांची डोळे फोडली, हातपाय मोडली व त्यांच्याजवळील बंदुकाही हिसकावून घेतल्या गेल्या. झालेल्या धुमश्चक्रीत काही मुंगळे व लाल मुंग्या यमसदनी पाठवल्या खर्या. पण बरेच सैनिक अतोनात जखमी झाले. या एकुणच घटनेमुळे मुंगळ्यांचा पुळका आलेल्या 'मुंगीधिकार आयोगाने' हंबरडा फोडीत कोर्टात धाव घेतली. "मुंगळ्यांनाही जीव आहे, त्यांच्यावरील हल्ले थांबवा आणि छर्र्याच्या बंदुकांचा (पॅलेट गन) वापर बंद करावा" अश्या त्यांच्या मागण्या होत्या. तर, "पोलीस आणि सैनिकी काळ्या मुंग्यांना जीव नाही का?" हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. संसदेतील मुंग्यांचे अनेक नेते त्या मुंगळ्यांसाठी टाहो फोडू लागल्या आहेत. सरकारची गळचेपी करत आहेत. सैनिकी मुंग्यांपेक्षा त्यांना मुंगळे जास्त प्रिय असल्याचे दिसुन येते. शिर मुंगीचं व धड मुंगळ्याचं असलेल्या या दुतोंडी हरामी नेत्यांना सरकारने चांगलेच खडे बोल सुनावले आहे.

१५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी काळ्या मुंग्यांच्या पंतप्रधानांनी मुंगळ्यांचे अड्डे असलेल्या 'ताकीस्तान'ला चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या भाषणामुळे ताकीस्तानातील स्थानिक 'गलुची' मुंगळ्यांनी ताकीस्तानविरुद्ध बंड ठोकले आहे. त्यामुळे बिंदूस्थानातील टम्मु हश्मीरमध्ये मुंगळ्याकरवी अस्थिरता निर्माण करणार्या ताकीस्तानची डोकेदुखी अजुनच वाढली आहे. ताकीस्तानातील गलूची मुंगळे ताकीस्तानातून आजादी मागत आहेत व ताकीस्तानचे झेंडे जाळुन बिंदूस्थानचे झेंडे फडकवत आहेत. शिवाय बिंदूस्थानी पंतप्रधानांचे फोटोही नाचवत आहेत. त्यामुळे ताकीस्तानला व मुंगळ्यांना चांगलीच मिरची झोंबत आहे..!
इकडे बिंदूस्थानी कोर्टाने मुंगीधिकार आयोगाच्या मागणीमुळे पॅलेट गनवर बंदी आणुन त्या ऐवजी 'पावा शेल्स' या तिखटाचा मारा करणार्या तंत्राचा उपयोग करण्यास सांगितले आहे. "त्यामुळे आता टम्मु हाश्मीरमधील सर्व आंदोलनकारी मुंगळ्यांना नागडे होऊन रस्त्यावर येण्याची विनंती आहे. अन्यथा आमच्या पावा शेल्स व्यर्थ वाया जातील." असे अनेकांनी खोचक मत व्यक्त केले आहे.
मुंगळ्यांवर पावा शेल्सचा उपयोग नाही झाला तर ती तिखटाची पूड कोणाच्या बुडाला पुसायची ते ही सांगुन द्या? हा प्रश्न स्थानिक बिंदूस्थानीं मुंग्यांकडून उपस्थीत करुन राग व्यक्त करण्यात आला आहे.! पावा शेल्समुळेही जर मुंगळ्यांना त्रास झाला तर फ्लावर शेल्स म्हणजेच 'फुलांचा मारा' हा पर्याय वापरण्यात येईल व त्यासाठी 'मुंगीधिकार आयोगवाल्यांना'च पाचारण केले जाईल. असे सुत्रांकडून कळते.
धन्यवाद...
-कल्पेश गजानन जोशी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा