''काश्मीर - इस्लामीकरणाचा नवा बळी''
''सदगुणविकृतीच्या पार्श्वभागावर लाथ हाणुन काश्मीर प्रश्नाला वेळीच वेसण घालावे लागेल नाही तर त्यांचा हिरवा चाँद कश्मीरवर फडकवुन ते पुढे पंजाब व हिंमाचल बळकवण्यासाठी सिद्ध होतील आणि जी परिस्थिती आज कश्मीरमध्ये आहे तिच उद्या पंजाब हिमाचल भागात दिसुन येईल हे त्रिवार सत्य आहे!''
काल एक मित्र बोलता बोलता बोलुन गेला. म्हणाला..." देऊन टाकावं जम्मु कश्मीर एकदाचं पाकिस्तानला! काय होणार आहे? कायमचा ताण मिटेल. साली नेहमीची किटकिट बंद होईल!" कानात उकळतं शिसं पडावं तसे त्याचे ते बेजबाबदार शब्द खसकन कानात शिरले. सचिंत मन क्रोधीत झालं नि वाटलं सगळा राग आता याच्यावरच काढावा. पण भल्या मोठ्या कष्टाने राग गिळला. कारण दोष त्याचा नव्हताच! दोष होता तो रोज रोज जम्मु काश्मीरमधलं रडगा-हाणं ऐकुन वैतागलेल्या त्याच्या अज्ञानी मनाचा. दोष होता तो त्याच्या सदगुणविकृतीचा. विकृत औदार्याचा..! त्याचा जन्म झाल्यापासुन त्याने केवळ ह्याच जम्मु कश्मीरचा विवाद काय तो ऐकलाय. पाहिलाय. अनुभवलाय. पण त्याला हे ठाऊक नाही की या देशात असे अनेक 'जम्मु कश्मीर' पुर्वी होऊन गेले आहेत. ज्यांचं आज संपुर्ण इस्लामीकरण झालंय आणि आज जगात त्यांची ओळख 'इस्लामीक राष्ट्र' या ओळखीनेच होते.
भारतावर अनेक आक्रमणं झाली. ग्रीक, शक, कुशाण व हुणांसारख्या परकियांनी आक्रमणे केली. पण या ग्रीक शककुशाणादी आक्रमक प्रभुतींचा केवळ राजकिय काय तो उद्देश्य होता. सत्तेसाठी व साम्राज्य विस्तारासाठी होता. पण जेव्हा अरबांचे (इस्लामी) व यवनांचे (ख्रिश्चन) आक्रमण सुरु झाली तेव्हा साम्राज्य विस्ताराबरोबरच धार्मीक आक्रमण करणे हाही त्यांचा एक महत्वपुर्ण उद्देश्य राहिला. ज्या भागावर आपले राज्य प्रस्थापीत झाले तेथिल लोकांना निष्ठूरपणे बळजबरीने बाटवुन, गळ्यावर सुरे ठेऊन, प्रसंगी रक्तपात करुन, दहशत माजवुन मुस्लीम किंवा ख्रिश्चन करुन आपले संख्याबळ वाढविण्याचा आजपर्यंतचा त्यांचा उपदव्याप लपुन राहिलेला नाही. कधीकाळी त्या प्रांतावर पुन्हा गैरइस्लामी किंवा हिंदू राजाच्या अधिपत्याखाली राज्यारोहण व्हायचे तेव्हा तेथिल भुतकाळातील बाटवलेल्या लोकांचे वंशज कट्टर इस्लामी झालेले असायचे. तेच लोक त्या नवविराजीत हिंदू सम्राटाविरुद्ध बंड करुन उठायचे. विद्रोह करायचे. आणि त्या प्रांतावर एखाद्या मुस्लीम राज्यकर्त्याने पुन्हा आक्रमण केले असता त्याच्या मदतीला धावुन जायचे हा पायंडा तेव्हापासुन पाडलेला होता. मोहंमद बीन कासीमच्याहीआधी सातव्या शतकाअंती वायव्य भारतात अरबांचे (तुर्क) आक्रमण झाले होते व आजचा बलोचिस्तान म्हणुन ओळखला जाणारा भाग त्यांनी जिंकुन घेतला. इस्लामीकरणाची बाटवाबाटवी भारतात सुरु झाली ती इथुनच. पुढे इ.स.७११ साली 'कासीम'ने भारतावर वायव्येकडून हल्ला केला असता ह्याच पुर्वी बाटवून मुस्लीम केलेल्या हिंदूंनी कासीमला लढाईत मदत केली व हिंदूराजा दाहिर याचा पराभव झाला. सदगुणविकृती आणि सप्तबंद्यांनी पछाडलेला हिंदूसमाज हिरव्या अजगराच्या घश्यात गिळंकृत होण्यास येथुन सुरुवात झाली ती आजपर्यंत चालु आहे. आजचा अशांत अस्थिर व हिंसाचाराने धगधगणारा कश्मीर याला अपवाद नाही. काश्मीरमधील कट्टरतावादी व दहशतवाद्यांना सामील झालेले तेथिल नागरीक (?) भारतीय सैनिकांवर हल्ले करतात. दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारतीय लष्करापासुन त्यांना संरक्षण पुरवतात. त्यांना पळुन जाण्यास मदत करतात. इसिसचे झेंडे फडकवतात आणि कश्मीरला इस्लामीक स्टेट करु असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल जाते. याचे कारण म्हणजे त्यांच्या या कारवायांना विरोध करतिल किंवा लष्कराला मदत करतिल असे स्थानिक विरोधक (गैरइस्लामी) तेथे शिल्लक नाही आणि 'मानवाधिकार' व 'सर्वधर्मसमभाव' या सदगुणविकृतींना तोडण्याची किंवा तित दुरुस्ती करण्याची देशातील वैचारीक शक्तींची हिंमत नाही.
पुर्वी जेव्हा परकिय आक्रमणे आणि त्यातही विशेषत: म्लेंक्ष (मुस्लीम) आक्रमणे झाली तेव्हा शत्रुने करावा त्यापेक्षा जास्त घात समाजातल्या सदगुणविकृती आणि सप्तबंद्यांनीच काय तो केला. शत्रुवर दया दाखवणे, आततायी अहिंसा, अतिसहिष्णुता, दया, परोपकार आणि औदार्य या काही सदगुणविकृती तेव्हाही प्रचलित होत्या. यामुळे हिंदूंचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. आज याहुन वेगळी परिस्थिती ती काय? सप्तबंद्यांपैकी काही बंद्या नाहिश्या जरुर झाल्या पण सदगुणविकृतींची भरच काय ती पडत गेली. 'सर्वधर्म समभाव हा सदगुण आहे' हे बोधामृत आज प्रत्येक हिंदूला आईच्या दूधासोबतच पाजले जाते. परंतु या वाक्याचे मर्म त्याला कोणीही विशद करुनच दाखवत नाही. मतपेढीसाठी सगळेच राजकिय पक्ष आज मुसलमानांचे लांगुलचालन करतात याहुन लोकशाहीधारीत आधुनिक सदगुणविकृती काय असु शकते. भारतभूची रक्षा करणा-या वीर जवानांवर काश्मीरी कट्टरवादी मुसलमान हल्ले करतात. त्यांना जीवे मारतात. एवढेच काय तर भारतीय सैन्यात असलेल्या देशभक्त 'उमर फय्याज' यांचीही ते लोक निर्घुण हत्या करतात. कारण ते धर्मांधता झुगारुन इस्लामीक स्टेट संकल्पना मान्य न करता भारतासाठी (गैर इस्लामी राष्ट्रासाठी) लढतात म्हणुन! मग यासाठी काॅलेजातील तरुणांसमवेत तरुणीही जवानांवर दगडफेक करतात. पुरुषांनी हिंसाचार केला तर मानवाधिकार कायद्याच्या नावाखाली त्यांना अभय द्यायचे आणि स्त्रियांनी केला तर केवळ त्या स्त्रीया आहेत म्हणुन त्यांच्या अपराधावर पांघरुण घालायचे हा कुठला न्याय? चावायला आलेला साप ठेचायचाच असतो मग तो नाग असो वा नागिण. एवढेही न कळण्याइतपत आमची न्याय व्यवस्था आणि कायदेपंडीत सुन्न झाले आहेत? ही संपुर्ण देशहितासाठी दुर्दैवाची बाब आहे. हिंसाचार करणा-यांचा कळवळा या तथाकथीत मानवप्रेमींना येतो मग भारतीय जवानही मानवच आहेत. त्यांच्यातही स्त्री पुरुष आहेत याचा त्यांना का विसर पडतो?
कश्मीरप्रश्नी विचार करायला गेले तर एकच गोष्ट लक्षात येते. कधीकाळी भारताचा अविभाज्य भाग असलेला आजचा इराक, इराण, बलुचिस्तान, अफगाणीस्तान, बांग्लादेश, पाकिस्तान आज इस्लामीक स्टेट झाले आहेत. कधीकाळी त्या भागात बहुसंख्य हिंदू नांदत होते. परंतु तिथे त्या त्या काळी झालेल्या मुस्लीम आक्रमणांमुळे आणि इस्लामीकरणाच्या बाटवाबाटवीमुळे तो प्रदेश मुस्लीम बहुसंख्य झाला आणि वेळ येताच त्या प्रदेशाचा लचका तोडला गेला. कारण 'धर्मांतर हेच राष्ट्रांतर' हेच त्यांचे मुळसुत्र होते व आहे. इराकपासुन पाकिस्तानपर्यंत कालांतराने याच सुत्रानुसार इस्लामीक स्टेट निर्माण झाले. आता पाळी आहे ती जम्मु कश्मीरची! त्यातही कश्मीरचा काही भाग (POK) आपल्याच अतिसहिष्णु विचारांमुळे पाकिस्तानच्या घश्यात पडलेला आहे. पुन्हा एकदा 'शांतताप्रीय' या सदगुणविकृतीमुळे जम्मु कश्मीर पाकिस्तानला देऊन टाकले तर परिस्थिती एकदम शांत होईल, दहशतवादी शस्त्रे खाली टाकतील, हुर्रीयत नेते प्रेमऴ होतील, कश्मीरस्थित तरुण तरुणी दगडफेक बंद करुन हातात पुष्प घेऊन तुमचे स्वागत करतिल असे काही एक होणार नाही. तर त्यांचा हिरवा चाँद कश्मीरवर फडकवुन ते पुढे पंजाब व हिंमाचल बळकवण्यासाठी सिद्ध होतील आणि जी परिस्थिती आज कश्मीरमध्ये आहे तिच उद्या पंजाब हिमाचल भागात दिसुन येईल हे त्रिवार सत्य आहे! कश्मीर पाकिस्तानला देऊन टाका व एकदाची डोकेदुखी बंद करा असे कुणाला वाटत असेल त्यांनी ही गोष्ट आपल्या अंत:करणात चांगली ठसवुन घ्यावी. कारण "मुसलमानांचे हे धर्मवेड नाही तर ती एका अढळ सृष्टीक्रमाला अनुसरुन अंगिकारलेली राष्ट्रीय संख्याबळ वाढविण्याची परिणामकारक पद्धती होती व आहे!" हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाक्य सारे गुपीत खोलुन जाते. आजच्या कश्मीरप्रश्नाचे हेच ज्वलंत कारण आहे. राक्षसी हिंसाचाराला सवाई राक्षसी प्रत्याचार करणे, कपटाला सवाई कपटाने झोडणे हाच त्याचा रामबाण उपाय आहे..!! इतिहासात घडून गेलेल्या चुकांची जर पुन्हा पुनरावृत्ती होत असेल तर आजही देशावर अनेक कासीम चालुन आले आहेत. वेळीच पायबंद घातला नाही कर विजय त्यांचाच निश्चीत आहे.
-कल्पेश गजानन जोशी
सोयगांवकर
सोयगांवकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा