"लफडेबाज पाक...बंडलबाज चीन"



कधी पाक कधी सार्क कधी म्हणतो माझा इराक
 ट्रम्प मोदी वाईट तुला गोड होतो जुना बराक
सरड्यासारखे रंग तुझे 
कितीदा बदलशीन
चीन सांग पाकीस्तानसोबत निकाह कधी करशिन?

कधी कधी तुला लागती ओबोरचे डव्हाळे
पाक सोबत ग्वादारमधी करतो येडेचाळे
जरा लपुन जरा छपुन जग सारं पाहतं
पाकिस्तान अन् तुयं लफडं कुठे कुठे चालतं
नकट्या नाकाचा तोरा किती दावशिन
पाकिस्तानसोबत निकाह कधी करशीन...?

चीन तुझ्या प्रेमिकेला भारतानं छेडलं
मोदींच्या दौ-यांनी तुला रे पछाडलं
खरं कारण हेच तुला चिंतांनी वेढलं
म्हणुनच तू सैन्याला डोकलाममधी धाडलं
सांग रे सांग तू किती दिवस लपवशिन
पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...?

प्रेमिका तुझी भारी खरच मानलं तुला बुवा
अल्ला फादर गाॅड सांग घेतल्या कुणाच्या दुवा
बुरख्यामागची हसीना तिच तेवढी दिसत नाही
हाफीज आहे? अझर आहे की लखवी काही कळत नाही
सांग तुझ्या प्रेमीकेला मिठीत कधी घेशीन
*पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...?

माशुका चालु तुझी एवढा सल्ला ऐक
आंतरराष्ट्रीय लफडे तिचे सापडले आहे कैक
अमेरिकेनं सोडलं म्हणुन तुझ्या मागे लागली
संपत्ती पाहुनच ती गोड तुह्याशी वागली
विश्वास नशिन तं ट्रम्प तात्याले विचारशिन
*जाऊदे सांग पाकिसोबत निकाह कधी करशिन...?

कालच एक पत्र आलं प्रेमीकेचं तुझ्या
चीन म्हणे नकली नकटे आणि म्हणे खुज्या
भरवसा नाही म्हणे संसार टिकेल काय
शेवटी चायनिजच! गँरंटी मिळेल काय
एवढं सारं सांगुनही तू कुठे ऐकशीन?
सांग बरे पाकीसोबत निकाह कधी करशिन..?

असा तू अशी ती असे तुमचे संबंध
देव जाणे जुळतील बंध की होईल सारं बंद
थाटलाच जर संसार तर अपत्य होईल किती
हाँगकाँग, तिबेट, बलुचिस्तान किती रे गणती
ती बुरख्यात तू कोटात लय भारी शोभशीन

सांग तू पाकिसोबत निकाह कधी करशिन...?
पाकी बेटा तू सुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेव
गोड बोलुन नव-याला तुझ्या डोकलाममधून उठव
सांग त्याला भारत काय उगी आता नडू नकोस
गर्वाच्या फुग्यात बसुन हवेमध्ये उडू नको
जुना भारत जुनी नीती खोटी भीती दूर गेली
होती नव्हती तुझी प्रिती तीसुध्दा दूर झाली
कदाचित हनिमुन तुमचं जन्नतमधीच अशीन
सांग तू पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन..?

-कल्पेश गजानन जोशी (सोयगांवकर)
संपर्क - ८२७५२५७१३७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान