"वेड्यांचा बाजार"..!
अहो राम गणेश...! काय हे तुमचे लिखाण. काय तुमचे साहित्य. काय तुमचे विनोद..! अहो... असे काय लिहिले तुम्ही? जे शब्द दिसायला आणि सुचायला तब्बल एक शतक उलटावे! मिस्टर इंडिया सिनेमा ऐकुन होतो. पण तुमची अक्षरंही आता 'मिस्टर इंडिया' व्हायला लागली वाटते..? इतक्या वर्षानंतर ती दिसली..! आणि लिहीलंय तरी काय आपण? तो दस्तरखुद्द छत्रपतींचा अपमान! संभाजी राजांची बदनामी! अहो राम गणेश...! तुम्हास कल्पना नव्हती काय.? तुम्ही लिहिताय ते काही दिवसानंतर तथाकथीत शिवभक्तांच्या वाचनात येईल. याचा जराही विचार केला नाही हो आपण. तशी तुम्हाला कशी कल्पना असेल म्हणा. तुम्हाला कुठं ठाऊक...उद्या असेही 'पक्ष' स्थापन होतील जे प्रसिद्धीसाठी पुतळ्यांची कापाकापी करतील. आपल्याला निदान राजकारणाविषयी जरी थोडं सज्ञान असतं तरी असं घडते ना. राजकारणात खुर्चीसाठी जिवंत माणसांचे गळे कापायला कमी करत नाहीत लोक. गोळ्या घालायला आणि विषप्रयोग करायलाही कचरत नाही. तेव्हा तुमच्या पुतळ्यावर राग काढणं म्हणजे खूप धारिष्ट्याचं काम आहे असं काही नाही हं..! असो... आम्हा साहित्य रसिकांना आणि तुम...