‘लोकमान्य Vs भाऊसाहेब’

आजकाल श्रेयवाद ही जणू नित्याचीच बाब झाली आहे. भूतकाळातील काही गोष्टीचा परस्पर संबंध लावून किंवा एखाद दोन उदाहरणावरून त्या व्यक्तीच्या आयुष्य भरातील कार्याचे अपवाद शोधायला सुरुवात होते आणि आपल्याला हवे तसे रंग त्या व्यक्तीच्या व्यक्तिरेखेला देता येतात व आपण किंवा आपली संस्था , संघटना कश्या इतरांपेक्षा वेगळया आहेत असा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न यातून साध्य केला जातो. आताचा नवीन मुद्दा म्हणजे ‘ गणेशोत्सवाचे जनक कोण ?’ हा. लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असण्याला काहींनी आक्षेप घेतला आहे. खरं तर या वर्षी टिळकांनी सुरू केलेल्या ‘ सार्वजनिक गणेशोत्सवाला ’ १२५ वर्ष पूर्ण झालेत. त्याचा उत्सव साजरा करणे दूरच पण श्रेयवाद मात्र फोफावला. तसे पहिले जाता ‘ सार्वजनिक ’ हा शब्दच मुळात सगळ्या शंका कुशंका दूर करतो. कारण गणेशोत्सवाचा इतिहास पाहायला गेले तर तो काही दीड-दोनशे वर्षापूर्वीचा नाही हे लक्षात ये...