सेना, मनसे आणि 'ते'

शरद पवार म्हणतात महाविकास आघाडीत मुस्लिमांच्या सांगण्यावरून सहभागी झालो. अशोक चव्हाण सांगतात महाविकास आघाडीत मुस्लिम समुदायाच्या आग्रहावरून सहभागी झालो. हुसेन दलवाई म्हणतात आम्ही सोनिया गांधी व पक्ष श्रेष्ठींना शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा कसे वेगळे आहे हे समजावून सांगितले. CAA व NRC च्या मुद्द्यावर आपल्यापासून दूर गेलेले अल्पसंख्याक समुदायाचे मत पुन्हा आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी खुलेआम त्यांच्या मोर्चांना व आंदोलनाला पाठिंबा देत आहे. हिंदूंच्या विरोधात गेल्यामुळे आपली सत्ता कोसळेल व भविष्यात फटका बसेल याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चिंता वाटत नाही. आपल्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शिवसेना नाराज होईल आणि त्याचा परिणाम सत्तेवर होईल याचीही चिंता काँग्रेस राष्ट्रवादीला वाटत नाही. एवढी बेफिकिरी येण्यामागे या तिघाडी सरकारमध्ये काय ठरलं आहे? असा कोणता मुद्दा आहे की ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर एवढी विश्वास (?) ठेवून आहे. असे अनेक प्रश्न आज जनतेला पडत असतील. कारण एकीकडे शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी नाराज होईल याची पार चिंता वाटते. त्यासाठी त्यां...