संविधानास धोका कोणापासून? आपल्या भारतीय संविधानाची ओळख ते काही अंशी लवचिक तर काही अंशी तटस्थ अशी असल्यामुळे काही संविधान प्रेमी(?) त्यास वाट्टेल तसं वळण देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यास विरोध केल्यास त्या व्यक्तीवर संविधानविरोधी किंवा मनुवादी अशी टीका करतात. खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महत प्रयासातून आपले संविधान तयार झाले आहे व ते करताना त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील सर्व धर्म व समाज तसेच चलिरितीचा विचार करून प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यासोबतच भविष्यात त्या त्या काळानुसार संविधानात आवश्यक ते बदल करता यावे यासाठी घटनादुरुस्तीची सोयही करून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेब किती द्रष्टे पुरुष होते हे यावरून लक्षात येते. परंतु आज मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी जेव्हा जेव्हा एखाद्या अनावश्यक विषयाला घटनेतून काढण्याचा किंवा आवश्यक त्या विषयाला घटनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा देशातील तथाकथित संविधानप्रेमी संविधान धोक्यात आहे किंवा लोकशाहीचा गळा घोटला जातोय अशी ओरड करतात. मग निमित्य तीन तलाक बिलचे असो किंवा गरीब सवर...