पोस्ट्स

Featured post

भारताचा बांगलादेश होता होता राहिला का?

इमेज
भारताचा बांगलादेश होता होता राहिला का? जर मोदी सरकार 400 पार गेले असते तर काय झाले असते? ईव्हीएम वरून लोकांचा विश्वास का उडवला जात होता? ईव्हीएम वर कुऱ्हाडीने घाव का घातले जात होते? सुप्रीम कोर्टाच्या निकालाला सुद्धा मान्य न करणारी वक्तव्य का येत होती?  मोदी सरकार 400 पार गेले असते तर देशात सरकार, प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवरील विश्र्वासच उडवून लावायचा आणि मोठी अराजकता निर्माण करायची असा डाव होता का?  बांगलादेशमध्ये जे काही होतंय त्यामागे असलेली डीप स्टेट, मुस्लिम कम्युनिस्ट महायुती, अमेरिकेचा हस्तक्षेप, जॉर्ज सोरोस सारख्या वोक धनाढ्य लोकांचा पाठिंबा हे काय दर्शवते? ही सर्व परिस्थिती आज विचारात घेता जे होते ते चांगल्या साठीच होते असे म्हणणे योग्य ठरेल.  प्रभू श्रीरामाने अयोध्येत स्वतःवर पातक लावून घेतले पण भारत वाचवला आहे. मोदींच्या थोड्या अपयशातच मोठा विजय झाला आहे. येणारा काळ अनेक गूढ समोर आणणार आहे. पण मोदी 400 पार न गेल्यामुळे भारत विरोधी शक्तींना आपला डाव साध्य करता आलेला नाही. या सर्व परिस्थितीतून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे.  भारताचा शत्रू कोण आहे...

‘रिॲलिटी शो’ आणि काही गंभीर प्रश्न

इमेज
गेल्या काही दिवसात बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती विरोधी नरेटिव कश्या रीतीने चालवले गेले याची खूप चर्चा झाली. 1990 ते 2010 दरम्यान आलेले बरेच चित्रपट सेक्युलॅरिझम च्या नावाखाली कसे भारतीय संस्कृतीच्या विरोधी जनमानस तयार करत होते याची अनेक उदाहरणे समोर आली. पण चित्रपट, मालिका आणि विविध कलेच्या माध्यमातून समाजात केवळ भारत विरोधी, राष्ट्र विरोधी विष पेरले जात नव्हते तर भारतीय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीही प्रयत्न सुरू होते. मागील काही वर्षात साधारण 2001 पासून आलेल्या विविध रिॲलिटी शो, मालिका, अलीकडे आलेल्या बऱ्याच वेब सिरीज हेच नरेटिव घेऊन समाजाला (विशेषतः उच्चवर्गीय श्रीमंत वर्गाला) टार्गेट करताना दिसत आहे. समाज व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, व्यसनी, अंग प्रदर्शन आदी वैशिष्ट्य असलेल्या कलाकारांना प्रोत्साहित केले जात आहे. बिग बॉस, रोडिज, स्प्लिटविला, इंडीयन मॅच मेकिंग, सुपर मॉडेल ऑफ इयर अश्या विविध रिॲलिटी शो च्या माध्यमातून तरुणाईवर मॉडर्नयझेशन वोकिजमचा विकृत प्रभाव टाकला जात आहे.  रिॲलिटी शो हा एक फसवा आणि स्क्रीप...

देश कोणी विकायला काढला होता?

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक व विशेषतः काँग्रेस पक्षाकडून सारखा आरोप होत असतो की त्यांनी देश विकायला काढलाय. त्याच बरोबर सत्य, परखड आणि देशहिताची बाजू मांडणाऱ्या आजच्या माध्यमांना गोदी मीडिया म्हणून हिणवलं जातं. पण देश कोणी विकायला काढला आणि गोदी मीडिया कोण होतं, याचं एकच उदाहरण काँग्रेस आणि विरोधकांची झोप उडवून देऊ शकतं.  ज्या काळात सोव्हिएत रशिया बलाढ्य होता आणि त्याची केजिबी ही गुप्तचर यंत्रणा त्यांच्या काह्यातील देशांना वाळवी लावत होती, त्याच दरम्यान भारतात आलेल्या दोन केजीबी अधिकाऱ्यांनी (युरी बेझमेनोव्ह आणि व्हसिली मित्रोखिन) मोठे गौप्यस्फोट केले आहेत.  बेझमेनोव म्हणतात की भारत ही  जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचे कितीही सांगितलं जात असलं, तरी भारत ही एक निरंकुश राज्यव्यवस्था होती जिच्यावर जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा एक अधिकार चालत होता. तसेच भारत आपल्या अलिप्ततावादाचा कितीही गजर करत असला तरी तो सोवियत रशियाचा अंकित झालेला देश होता. इंदिरा गांधींनी राज्यकारभार सांभाळाला त्या क्षणापासून त्या रशियाच्या खिशात होत्या. इंदिरा गांधींच्या काळात ...

आग पुन्हा भडकली!

इमेज
हमास - इस्रायल युद्धात आता इराण ने उडी घेतलीय. काल इराण ने इस्रायल वर 200 मिसाईल डागल्या आहेत. त्यात इस्रायलचे किती नुकसान झाले याबाबत स्पष्टता नाही पण ह्या मिसाईल इस्रायलच्या राजधानी तेल अविव मध्ये डागल्या गेल्या आहेत  व तिथे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली असू शकते.  इस्रायलच्या आजूबाजूला सर्व इस्लामिक देश आहेत आणि सर्वांचे इस्रायल सोबत वैर आहे. कारण इस्रायल गैर इस्लामी देश आहे. म्हणजेच ही भूमी दारुल हरब  (मुस्लिमांसाठी युद्धाची भूमी) आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम देश इस्रायल विरोधात (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) उभे आहेत. त्यात प्रत्यक्ष इराण आणि लेबनॉन ने नुकतीच उडी घेतलीय.  आता चर्चा ही सुरू आहे की तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. जगभरात शांतीचा नारा देणाऱ्या इस्लामिक शक्ती हमास या दहशतवादी संघटनेला का जबाबदार धरत नाही व त्याच्याविरुद्ध का कारवाई करत नाही? ह्याच हमास मुळे हे युद्ध पेटले आहे. हमास ने गेल्यावर्षी इस्रायल वर रॉकेट हल्ले केले, शिवाय गुप्तपणे शिरलेल्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिला, बालके, पुरुष यांना ओलीस ठेवले. अनेकांच्या हत्या केल्या, त्याचे व्ह...