देश कोणी विकायला काढला होता?
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक व विशेषतः काँग्रेस पक्षाकडून सारखा आरोप होत असतो की त्यांनी देश विकायला काढलाय. त्याच बरोबर सत्य, परखड आणि देशहिताची बाजू मांडणाऱ्या आजच्या माध्यमांना गोदी मीडिया म्हणून हिणवलं जातं. पण देश कोणी विकायला काढला आणि गोदी मीडिया कोण होतं, याचं एकच उदाहरण काँग्रेस आणि विरोधकांची झोप उडवून देऊ शकतं. ज्या काळात सोव्हिएत रशिया बलाढ्य होता आणि त्याची केजिबी ही गुप्तचर यंत्रणा त्यांच्या काह्यातील देशांना वाळवी लावत होती, त्याच दरम्यान भारतात आलेल्या दोन केजीबी अधिकाऱ्यांनी (युरी बेझमेनोव्ह आणि व्हसिली मित्रोखिन) मोठे गौप्यस्फोट केले आहेत. बेझमेनोव म्हणतात की भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचे कितीही सांगितलं जात असलं, तरी भारत ही एक निरंकुश राज्यव्यवस्था होती जिच्यावर जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा एक अधिकार चालत होता. तसेच भारत आपल्या अलिप्ततावादाचा कितीही गजर करत असला तरी तो सोवियत रशियाचा अंकित झालेला देश होता. इंदिरा गांधींनी राज्यकारभार सांभाळाला त्या क्षणापासून त्या रशियाच्या खिशात होत्या. इंदिरा गांधींच्या काळात ...