पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेंदुर्णीला थडग्यांचा वेढा

इमेज
#सोयगांव - #शेंदुर्णी रस्त्यावर लिहा तांडा फाट्याजवळ ही कबर/ थडगं आहे. जेव्हा मी शेंदुर्णी येथे शाळेत जायचो (साधारण 2008 पूर्वी) तेव्हा इथे काहीच नव्हते. किमान मला तर तसे आठवत नाही.  अकरावी बारावीत जात असताना इथे पहिल्यांदा हिरवा झेंडा लावलेला पाहिलेलं मला आठवतं. दोन तीन वर्षापूर्वी इथे कबर स्पष्ट दिसू लागली, त्यावर हिरवी चादर पाहीली.  आत्ता दोन दिवसापूर्वी पाहिले तेव्हा या थडग्याला तारेचे कंपाऊंड झालेले दिसले. मागील 12 ते 15 वर्षात या थडग्याची झालेली वाढ माझ्यासाठी कुतूहलाचा विषय आहे. तथाकथित दर्गे आणि कबरी अश्याच निर्माण होत असाव्यात.  विशेष म्हणजे शेंदुर्णी येथून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आता थडगे झाले आहेत हेही एक आश्चर्य. फक्त सोयगाव रस्ता अपवाद होता, आता तोही पूर्ण झाला. शेंदुर्णीचे कबरी–स्तान करण्यासाठी कोणत्या बाबाचे आशीर्वाद आहेत हे शेंदुर्णीकर चांगले जाणतात.  - कल्पेश जोशी

कम्युनिस्टांचा राष्ट्रद्रोह: संस्थानातील पापे

इमेज
@कल्पेश जोशी  हैदराबाद मुक्ती लढ्यात कम्युनिस्टांनीही योगदान दिले, त्यांनी शेतकरी आंदोलन केले, कामगार चळवळ उभी केली, कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवल्या, काही कथित कम्युनिस्ट नेत्यांनी निजामास विरोध केला, कोणी काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिला अश्या नानाविध तर्काच्या आधारावर कम्युनिस्टांना हैदराबाद मुक्ती लढ्यात हिरो ठरवण्याचा प्रयत्न आजवर झाला आहे. काही दिग्गज लेखकांनी व अभ्यासकांनी आपली सर्वसमावेशक, तटस्थ भूमिका दाखवण्यासाठी कोणाला दुखावणे टाळले असेल. परंतु हैदराबाद मुक्ती लढ्यात योगदान म्हणून वरीलपैकी एकही तर्क लागू पडत नाही. स्वतःचा पक्ष किंवा संघटना मोठ्या करण्यासाठी ते प्रयत्न असू शकतात. हैदराबाद संस्थान मुक्त होण्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिक, लाखो नागरिक रक्ताचे पाणी करत होते, नरकयातना भोगत होते. पण याचवेळी कम्युनिस्ट गिधाडे स्थानिक नागरिकांचे लचके तोडण्यासाठी आसुसले होते. कम्युनिस्टांनी मुक्ती लढ्याच्या अशांत व अस्थिर परिस्थितीचा रक्तरंजित क्रांती घडवून आणण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केलेला दिसून येतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर आजतागायत कम्युनिस्टांनी ए...