आपली संस्कृती विकृतीकडे जाते, तेव्हा आम्ही काय करतो?

* आपल्या संस्कृतीवर कोणी चुकीची टिप्पणी केली म्हणून आम्हाला सहन होत नाही पण, आम्ही कधी 'या' गोष्टींचा विचार करतो का? 👉🏼 'विवाहपद्धती' हा एक धार्मिक विधी आहे, पण आम्ही त्याला 'फॅमिली इव्हेंट' केला की नाही? 👉🏼विवाह विधीपेक्षा आम्ही बँड पार्टी, डीजे, अर्केस्ट्रा त्यासोबतच चमकोगिरी, पैश्याचा माज, चुलत्याची जिरवनं, हौस पूर्ण करणं यालाच महत्व देतो की नाही? 👉🏼लग्न लागताना मुहूर्ताची वेळ टाळून दोन दोन - तीन तीन तास उशिराने लग्न लावतो. का, तर वरातीत दारू पिऊन नाचणाऱ्या मित्रांच्या इच्छेसाठी. अन पुरोहिताला मात्र शॉर्टकट विधी उरकायला भाग पाडतो. 👉🏼लग्नात वरमाला घालण्याचं मोठं महत्व सांगितलं आहे. पण, वरमाला घालताना नवरदेवाचे मित्र त्याला खांद्यावर का उचलतात? हा चेष्टा मस्करीचा विषय असतो का? ही फालतुगिरी गपगुमान सहन करणारी उपस्थित पुरोहित, वयस्कर व ज्येष्ठ मंडळी याला जबाबदार आहे की नाही? 👉🏼लग्न विधी होत असताना उपस्थित मंडळी 'वर' आणि 'वधू'ला आशीर्वाद देण्यासाठी आणि ते जे सामाजिक व्रत स्वीकारत आहेत, त्यासाठीचे साक्षीदार असतात. ...