पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घटना एक, परिणाम अनेक

इमेज
          घटना एक, परिणाम अनेक    देश हळहळतोय खरा. राग व्यक्त होतोय खरा. पण राग व्यक्त होतोय कुणाविरुद्ध? हाती बंदूक व दारुगोळा घेऊन येणा-या आतंकवाद्यांविरुद्ध?      मग जरा थांबा. शत्रु केवळ हाती शस्त्र घेऊन आणि सिमा ओलांडून येणाराच असतो का? कदाचित असेलही. पण मग देशाला हादरवुन सोडणारा हल्ला आपल्या जवानांवर झाला. सारा देश शोकसागरात बुडालाय. हलोक श्रद्धांजली अर्पित करताय. पाकिस्तानचा निषेध व्यक्त करताय. अन् अश्या परिस्थितीत काही चक्क 'पाकिस्तान जिंदाबाद' बोलतात?? ज्यांनी हल्ला करविला त्या जैश ए महंमद आतंकवादी संघटनेचं कौतुक करतात?? '५६ इंच छातीच्या तुलनेत ४४ भारी पडलेत' असे विधान एनडीटीव्हीची पत्रकार निधी सेठी ही बया करते. काँग्रेसचे नवज्योतसिंग सिध्दू आतंकवाद्यांचा देश नसतो म्हणत पाकिस्तानचा बचाव करतात. फारुक अब्दुल्ला या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचे विधान करतात. पुण्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत असताना कुमार उपेंद्र सिंह नामक तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत...

पडद्यामागील मेंदू

इमेज
                  पडद्यामागील मेंदू      "काही नाही. जास्त चिंता करत बसू नका. हे काय नेहमीचेच झाले आहे. आततायी अहिंसा व सहिष्णुतेच्या बेडीत अडकलेल्या लाचार भारताच्या नशिबी हेच घडत राहणार आहे." चहाच्या टपरीवर सकाळी सकाळी एक आजोबा पेपर वाचत हताशपणे बोलत होते. त्यांचे बोलणे ऐकुन काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. कारण त्यांनी ना सरकारला दोष दिला ना विरोधी पक्षाला. त्यांनी भारतीय सेनेला व गुप्तचर विभागालाही दोष दिला नाही. त्यांनी देशाच्या मानसिक वर्मावर बोट ठेवले. म्हणुन हे कटू सत्य आजुबाजुच्या सगळ्याच ऐकणा-यांनी चहाच्या घोटाबरोबर पचवुन घेतलं.           पण, ही विचार करण्यासारखी बाब आहे, की आम्ही खरच किती अतिअहिंसावादी व अतिसहिष्णू झालो आहोत. पायाखाली किडे मुंगी चिरडून मेली तरी पाप समजणारे आणि थेंबभर रक्त पाहून चक्कर येणारे आम्ही अहिंसाप्रीय भारतीय सरेआम गळे चिरणा-या व बंदूकीच्या जोरावर माणसांच्या चिंध्या चिंध्या करणा-या आतंकवादी व नक्षलवाद्यांशी दोन हात करु शकणार आहोत क...