सायबर संकट!

सायबर संकट! काळ बदलतो तसे लढण्याचे प्रकारही बदलत जातात. फार पुर्वी मानव दगडी हत्याराचा वापर करी, त्यानंतर धातुची शस्त्रे तयार झाली. युद्धे व लढायांत तलवारसारख्या शस्त्रांचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. कालांतराने दारुगोळा व बंदूकीसारखे शस्त्रास्त्रे उदयास आली. एकंदरीत काय तर काळानुरुप लढाया व शस्त्रास्त्रे रुप बदलत आहे. म्हणुनच काय ते आज सायबर युद्धाचा किंवा सायबर शस्त्राचा धोका मानवाच्या डोक्यावर आ वासुन उभा आहे. यास कोण, कधी, कुठे, कसा बळी पडेल सांगता येत नाही. 'पाकिस्तानची संकेतस्थळं हॅक झाली' किंवा 'अमेरिकेची संकेतस्थळं हॅक झाली' अश्या बातम्या सर्वश्रुत आहेच. कधी कधी काही संकेतस्थळांवर 'व्हायरस हल्ला' झाल्याच्याही बातम्या येतात. त्यातच मोबाईल हॅकींगचे प्रकार जास्त. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशलमिडिया साईट्सही आजकाल हॅक...