एसटी कर्मचा-यांच्या व्यथा:

लेख प्रकाशन दि 20.10.2017 महाराष्ट्राची लालवाहिनी असलेली एस.टी. बस ऐन दिवाळीत आगारात तळ ठोकुन आहे. कारण या लालवाहिनीत प्राण ओतणा-या कामगारांनी सातवा वेतन आयोग लागु व्हावा यासाठी संप पुकारला आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाश्यांची चांगलीच फजिती झाली आहे. परंतु एसटी कामगारांचीही दिवाळी अजुन गोड झालेली नाही. घरादारापासुन दूर एसटी आगाराबाहेर संपकरी ठाण मांडून आहेत. त्यात राज्य सरकारने अजुनही या संपाविषयी सकारात्मकता आणि एसटी कामगारांच्या मागण्या व समस्या जाणुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही. उलट परिवहन मंत्र्यांचे "अजुन २५ वर्ष सातव्या वेतन आयोगासाठी विचार होऊ शकत नाही" असे बेजबाबदार विधान आगीत तेल ओतणारे ठरणार आहे. सरकारने एसटी कामगारांच्या मागण्यांकडे कानाडोळा केलेलाच आहे पण, विरोधीपक्षांनीही या कामगारांसाठी अजुन पर्यंत आवाज उठवलेला नाही हे विशेष. त्यामुळे एसटी कामगारांचा संप अधांतरी झाला आहे. पण, तरीही राज्यातील सर्व एसटी कामगार या संपात उतरलेले आहे आणि स्वत:च्या मागण्यांसाठी पुर्ण शक्तीनिशी लढा चालुच राहणार असे चित्र आहे. या संपामागे वेतनवाढ ...