पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संघाच्या भूमिकांचा त्रास कोणाला आणि का?

इमेज
पू. सरसंघचालक यांच्या मुंबईतील संत रविदास जयंती निमित्त भाषणावरून अनेक उलटसुलट चर्चा काल परवापासून सुरू झाल्या आहेत. खरेतर मोहनजी भागवत यांनी केलेले विधान हिंदू धर्माशी अतिशय पूरक आणि क्रांतिकारी असे आहे. ते म्हणाले जातीव्यवस्था आणि उच्चनीचता धर्माने किंवा देवाने केल्या नाहीत. समाजातील काही पंडित (विद्वान) लोकांनी तसा खोटा प्रचार केला. या विधानात आलेल्या पंडित नावामुळे गोंधळ झाला. परंतु संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल जी आंबेकर यांनी त्याची स्पष्टता करून पंडित म्हणजे विद्वान असा अर्थ अभिप्रेत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ब्राम्हण समाजातील संभ्रम दूर झाला. परंतु काही मंडळींनी हा वाद विनाकारण वाढवला आहे. या लोकांमुळे ब्राम्हण समाजाची बदनामी होत आहे. ब्राम्हण समाज संघाविरुद्ध आहे किंवा ब्राम्हण समजाला उच्चनीचता विरुद्ध बोललेले चालत नाही असा (गैर) अर्थ यातून काढला जात आहे.  वस्तुस्थिती तर अशी आहे की जे लोक संघाला आपली जहागीर समजत होते, ज्यांना समरसता, सर्वसमावेशक हिंदुत्व मान्य नाही किंवा जे कर्मठ, रूढीवादी आहेत त्यांनाच सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे त्रास झाला आहे....