पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कावेबाज पाकिस्तानला ओळखा

इमेज
@कल्पेश जोशी, औरंगाबाद पाकिस्तानी क्रिकेट टीमने यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगले प्रदर्शन करत सेमी फायनल पर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानची टीम मोठी तयारी करून मैदानात उतरली असल्याचं बोललं जात आहे, परंतु यावेळी पाकिस्तानने केवळ मैदानावरच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सायकॉलॉजीकल वॉरफेअर प्रमाणे काम सुरू केल्याचेही निदर्शनास येत आहे. म्हणजे एक टीम मैदानावर खेळत आहे तर दुसरी टीम विशेषतः सोशल मीडियावर भारतासोबत गेम खेळत आहे.  सायकॉलॉजीकल वॉरफेअर ही एखाद्या युद्धाच्या वेळी आखली जाणारी एक रणनीती आहे. ज्याद्वारे शत्रूच्या शक्तीस्थानाचे खच्चीकरण केले जाते. त्याची प्रतिमा खराब केली जाते. त्याचा (अप)प्रचार इतका करायचा की मग सामान्य माणसातही तीच चर्चा रंगते व त्यांच्याकडूनही शत्रूचे मोरल डाउन करण्यास अप्रत्यक्षपणे मदत होऊ लागते.   यंदाच्या टी20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानने हेच हत्यार उपसले आहे, व त्याचा मुख्य लक्ष्य आहे भारतीय संघ आणि विराट कोहली.  आयपीएल चे सामने झाले आणि टी20 वर्ल्ड कपची चर्चा सुरू होऊ लागताच सोशल मीडियात विराट कोहलीच्या संदर्भात बऱ्याच उलटसु...