पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

इमेज
     निजामाची राजवट असलेल्या आणि 1947 ला स्वतंत्र न झालेल्या मराठवाड्यात आर्य समाज, हिंदू महासभा, स्टेट काँग्रेस व सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. लोक निजामाच्या सैन्याविरुद्ध आणि रझाकारांच्या विरुद्ध बंड करून उठले होते. हाती शस्त्र घेऊन भारताच्या अखंडत्वाचा आणि हैदराबादच्या मुक्तीचा संकल्प करण्यात आला होता. अश्या या क्रांती लढ्यात निजामी राजवट उलथवण्यासाठी धोपटेश्वर (ता. बदनापूर जि. जालना) येथील दगडाबाई शेळके यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्य प्रेरणेतून तसेच अन्य क्रांतिकारकांचे काम पाहून मुक्तिसंग्रामात उडी घेतली होती. त्याचवेळी मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सोयगांव येथील लढ्याचा इतिहासही अजरामर झाला.       दगडाबाईंनी 'बंदूक' आणि 'हातगोळे' चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एकदा निजाम सरकारच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. असे सांगितले जाते की त्यांनी पॅन्ट, शर्ट घालून बंदूकीसह घोड्यावर प्रवासही केला आहे. आपल्या नवऱ्याच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागल...