अशी झाली भारतीय वायुसेनेची सुरुवात...

जसजसा काळ बदलत गेला, नवनवे संशोधन होत गेले तसतसा युद्ध प्रकार बदलत जाऊ लागला. युद्धात विमानांचा वापर मोठ्या खुबीने होऊ लागला. सैन्यदलात वायुसेना अतिशय मोलाची भूमिका निभावू लागली. पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंगच निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली होती. १९१८-३८ या एकवीस वर्षांच्या दोन जागतिक युद्धांच्या संधिकालात एकामागून एक लहान-मोठ्या राष्ट्रांनी हवाई दले स्थापण्यास सुरुवात केली. या काळात ब्रिटिशांनी हिंदुस्थानात ‘रॉयल एअर फोर्स’ ची (शाही हवाई दल) स्थापना केली. त्यात दोन स्क्वॉड्रन्स, ८० अधिकारी व ६०० सैनिक हिंदुस्थानात ठेवले होते (१९१८). १९२० पर्यंत स्क्वॉड्रन्सची संख्या आठपर्यंत गेली व १९२३-२४ मध्ये ती पुन्हा सहापर्यंत खाली आली. त्यांपैकी चार भूसेनेला पाठिंबा देणारी व दोन बाँबर स्क्वॉड्रन्स होती. सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या शिफारशीनुसार १९२८ मध्ये क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेत सहा हिंदी सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यावयाचे, असे ठर...