फडणवीसांच्या निमित्याने...

महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ अजून स्थापन होईना. आढावा बैठका घेण्यापलिकडे आणि स्थगिती देण्यापलिकडे मुख्यमंत्री महोदयांच्या हाती काही राहिलेले नाही. अश्या अस्ताव्यस्त व राज्य राम भरोसे सुरू असताना विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीत बिघाडी करण्याची भाजपला मोठी संधी आहे. अश्या स्थितीचा फायदा घ्यायचा सोडून भाजपवाले करताय काय? असा प्रश्न माझ्यासोबत अनेकांना नक्कीच पडत असणार. याचे उत्तर फडणवीसांनी झी 24 तास वर झालेल्या मुलाखतीतून दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची दैना झालेली असताना या संधीचा फायदा घ्यायचे सोडून (मग्रूर, अहंकारी, सत्तापिपासू?) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही सरकारला वेळ द्यायला तयार आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला विधानसभेत वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांनी लवकर मंत्रिमंडळ स्थापन करून राज्याचा गाडा हकण्यास सुरुवात करावी. मग मी तोफ डागणार. फडणवीस अगदी कसेही असले आणि त्यांच्या विषयी कोणी काहीही विचार करत असले तरी त्यांनी जी राजकीय नैतिकता दाखवली आहे, ती राजकारणात उतरू पाहणाऱ्या नवख्या पिढीसाठी नैतिकतेचे चांगले उदाहरण आहे. "धटाशी ध...