पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरासे सकारात्मक...

 *कोण म्हणतं भारतीय दुसर्याच्या आनंदाने दुखी होतात?* 》केबीसीत (कौन बनेगा करोडपती) करोडो जिंकणा-याला निस्वार्थीपणे लोक डोक्यावर घेतात. ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात मानवता नाही?* 》महापुर, रेल्वे अपघात व इतर आपत्तीत लाखो मदतीचे हात पुढे येतात. ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात महिला सुरक्षित नाहीत?* 》आॅटोरिक्षापासुन रेल्वेत रात्री अपरात्री प्रवास करणा-या लाखो महिला आम्हाला दिसतात... ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारत सहिष्णू नाही?* 》विविध धर्माची, पंथाची, जातीपातीची व बहुविचारी माणसे असुनही भारतात शांतता असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे कोणीही कसेही विचार मांडू शकतो... ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात नितीमुल्ये नाहीत?* 》महापूर, भुकंप किंवा अपघात झाले तर मेलेल्यांच्या अंगावरचे दागिने व खिसेपाकिटाला हात न लावता त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणारे भारतीय दिसतात. ...केवळ बदनामी!  *कोण म्हणतं भारतात समानता नाही?* 》भारतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन स्त्रिया सर्व क्षेत्रात काम करतात. सर्वधर्मीय बांधव सर्वक्षेत्रात योगदान देतात....