पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*‘फादर’लेस अमेरिका आणि भारत*

इमेज
@कल्पेश जोशी एखाद्या कुटुंबात ‘आई’ किंवा ‘वडील’ दोघांपैकी एक जरी नसेल, तरी त्या कुटुंबावर किती संकटे येतात आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यावर किती प्रतिकूल परिणाम होतो, याची भारतीय समाजाला जाणीव आहे. तरीही अशी कल्पना केली, की एखाद्या देशात वडील नसलेली अर्ध्याहून अधिक कुटुंबे होऊ लागली आहेत, तर आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण ही परिस्थिती सद्य स्थितीत ओढवली आहे बलाढ्य अश्या अमेरिका देशात. *_2021 मध्ये एका संस्थेने केलेल्या संशोधनानुसार अमेरिकेत वडील नसलेल्या कुटुंबांची संख्या 24.7 मिलियन (2.4 कोटी) इतकी झाली आहे, जी अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 33% टक्के आहे. अमेरिका सध्या या कौटुंबिक - सामाजिक समस्येमुळे प्रचंड तणावात आहे. अमेरिकेतील लोकांसमोर ही गंभीर समस्या उभी राहिली आहे आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होतच आहे. केवळ अमेरिकाच नाही तर एकूण पाश्चात्य देशात कमी अधिक प्रमाणात ही समस्या वाढीस लागली आहे. अमेरिकेची ही व्यथा डेव्हिड ब्लंकेनहॉर्न या लेखकाने ‘फादरलेस अमेरिका’ या पुस्तकातही विस्तृतपणे मांडली आहे._* पाश्चात्य देशात पूर्वी पती-पत्नी शेवटपर्यंत एकमेकाच...